Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
क्लॅमिडीया
#रोग तपशील#क्लॅमिडीया



सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज (एसटीडी) म्हणजे लैंगिक आजार. आपण आजपर्यंत असे ऐकले आहे की, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच लैंगिक आजार होतात. मात्र एका संशोधनात असे आढळले आहे की, लैंगिक संबंध न ठेवताही लैंगिक आजाराची लागण होऊ शकतो. जाणून घेऊया की लैंगिक आजार होण्याची कारणे कोणती आहेत आणि कोणत्याप्रकारचे आजार होतात ते.

* काय आहेत कारणे
ज्या व्यक्तीला लैंगिक आजाराची लागण झाली आहे, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास हा आजार निश्चित होतो. शिवाय ओरल सेक्स केल्यानेही या आजाराची लागण होऊ शकते. ओरल सेक्समध्ये जरी संपूर्ण शारीरिक संबंध ठेवले जात नाहीत तरीदेखील संक्रमण होण्याचा धोका निश्चित असतो. ओरल सेक्स करताना पार्टनरच्या शरीराच्या इन्फेक्टड भागाशी संबंध आल्यास gonorrhoea, chlamydia, herpes, hepatitis इत्यादी बॅक्टरीया, व्हायरस यांची लागण होते. त्याचप्रमाणे गुप्त भागात शेव्ह केल्याने त्वचेवर ब्रेक्स येतात आणि इन्फेकशनचा धोका वाढतो.
शिवाय अस्वच्छ टॉयलेट मधून अशा प्रकारचं इन्फेकशन पसरू शकतं. स्वच्छतागृहामध्ये इन्फेकशन पसरवणारे किटाणू, वस्तू असेल आणि ती जर ब्रेक्स असलेल्या त्वचेच्या संपर्कात आली तर लैंगिक आजाराचे इन्फेकशन होऊ शकते.

कोणते आजार होऊ शकतात ?
* एचआयव्ही
ओरल सेक्समुळे एचआयव्ही होण्याची शक्यता जरी कमी असेल तरी याबाबत दुर्लक्षित राहून चालणार नाही. इन्फेक्टड रक्ताशी संबंध आल्यास, इन्फेक्टड इंजेकशन्स किंवा सुया वापरल्यास, टॅटू करताना असुरक्षित सुई वापरली गेल्यास एचआयव्ही होण्याचा धोका असतो. प्रेग्नसीमध्ये एचआयव्ही झालेल्या आईकडून बाळाला तसंच ब्रेस्टफीडिंग करताना बाळाला हा रोग होऊ शकतो. हा व्हायरस अधिक काळ माणसाच्या शरीराच्या बाहेर राहत नाही. शरीरातील ज्या द्रवात याची उत्पत्ती होते ते सुकल्यावर हा व्हायरस पटकन मरतो. त्यामुळे हा आजार किटाणूंपासून होत नाही. आणि तापाच्या व्हायरस सारखा तो पसरत ही नाही.

* गोनोरीया आणि क्लॅमिडीया
गोनोरीया आणि क्लॅमिडीया याप्रकारचे इन्फेकशन साधारणपणे ओरल सेक्स किंवा शारीरिक संबंधांमुळे पसरते. गरोदरपणात या इन्फेक्शनची लागण आईला झाली असेल तर बाळाला होऊ शकते. शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केल्यास तसेच ओरल किंवा व्हेजीनल सेक्स करताना डेंटल डॅम्स वापरल्यास हे इन्फेकशन होण्याचा धोका कमी होतो.

*
हेरपेस हा व्हायरस एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यास पसरतो. तसंच ओरल सेक्स, टूथब्रश, जेवणाची ताट, ग्लास इन्फेक्टड व्यक्तीसोबत शेअर केल्याने हा आजार होतो. आईमुळे बाळाला हा आजार होऊ शकतो. काही साध्या सवयी आपल्याला या आजारापासून दूर ठेवतील. उदा. स्वच्छता राखणे व पाळणे, हात स्वच्छ धुणे, इत्यादी.

* हेपिटायटिस
हेपिटायटिस बी हा आजार अतिशय गंभीर असून इन्फेक्टड व्यक्तीच्या रक्त, सेमेन किंवा योनीतून येणाऱ्या द्रवाशी थेट संबंध आल्यास होतो. शिवाय हेपिटायटिस ए हा आजार इन्फेक्टड व्यक्तीशी अतिशय घनिष्ट संबंध आल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास होतो.
इन्फेक्टेड व्यक्तीचे रक्त, सेमेन किंवा योनीतून येणाऱ्या द्रवाशी थेट संबंध आल्यास हेपिटायटिस बी आजार होतो. हा आजारदेखील अतिशय गंभीर आहे. हा आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांचा सारखा जवळून संबंध येत असतो. घरातील इन्फेक्टड वस्तू यामुळे हा आजार होऊ शकतो. तसंच असुरक्षित इंजेकशन्स आणि रक्ताची देवाणघेवाण यातूनही हे इन्फेकशन पसरण्याची संभावना असते.
हेपिटायटिस सी हा आजार रक्ताची देवाणघेवाण करताना इन्फेक्टड रक्त शरीराला मिळाल्यास हा आजार पसरतो. आईमुळे बाळाला होऊ शकतो. औषधोपचार करताना झालेल्या असुरक्षित इंजेकशन्स मुळे तसंच इंजेकशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे हा आजार होऊ शकतो.
हेपेटशयटिसला आळा घालण्यासाठी योग्य लसीकरण करणे गरजेचे आहे. हे लसीकरण लहान मुले आणि मोठी माणसे दोघेही करु शकतात. शिवाय स्वच्छ पाणी, टॉयलेटवरून आल्यावर स्वच्छ हात धुणे, सुरक्षित सेक्स करा

Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Dr. Arati Bayas-Pawar
Dr. Arati Bayas-Pawar
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 12 yrs, Pune
Dr. Anamika Ghodke
Dr. Anamika Ghodke
BDS, Dental Surgeon Dentist, 4 yrs, Pune
Dr. Mahesh Yadav
Dr. Mahesh Yadav
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Sivasubramanian Pachamuthu
Dr. Sivasubramanian Pachamuthu
MD - Allopathy, Dermatologist, 6 yrs, Dharmapuri