Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कांजिण्यांचा आजार
#रोग तपशील#विषाणूजन्य संक्रमण#व्हायरल तापकांजिण्यांचा आजार

कांजिण्या सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात; पण त्या मुलांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. मुलांमध्ये या आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. फेब्रुवारी, मार्च महिना आला की, कांजिण्या झालेली मुलं बालरोग तज्ज्ञांकडे येण्यास सुरुवात होते.

कांजिण्या सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात; पण त्या मुलांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. मुलांमध्ये या आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. शाळकरी मुलांमध्ये (५ ते १५ वर्षं वयोगट) सर्वांत जास्त प्रमाणात कांजिण्या येताना दिसतात. नेमका हा परीक्षांचा काळ असल्यामुळे कांजिण्या झालेल्या मुलांच्या परीक्षा बुडू शकतात. प्रौढ व्यक्तींमध्ये कांजिण्या आल्यास त्या तीव्र स्वरूपात येतात.

कांजिण्या हा आजार एक प्रकारच्या सूक्ष्म विषाणूमुळे होतो. व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस असं त्याचं नाव आहे. शरीरातील उष्णता बाहेर पडल्यामुळे कांजिण्या होतात, अशी एक चुकीची समजूत आहे. ती डोक्यातून काढून टाकायला हवी. हा साथीचा आजार आहे आणि तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला संपर्कामुळे किंवा श्वासावाटे हवेतून जलद पसरतो. विषाणूंचा शिरकाव शरीरात झाल्यापासून साधारण १० ते १५ दिवसांत आजाराची लक्षणं दिसू लागतात. मुलाला प्रथम थोडा ताप येतो. डोकंदुखी होऊ शकते. तापाच्या पहिल्याच दिवशी अंगावर पुळ्या दिसू लागतात. हळुहळू त्या पाण्यानं भरतात. प्रथम त्या छाती, पोट आणि पाठीवर येतात. नंतर त्या चेहरा आणि हातापायांवर पसरतात. या पुळ्यांना खाज सुटते. आधी आलेल्या पुळ्या थोड्या सुकू लागतात, तोपर्यंत नवीन पुळ्या अंगावर इतरत्र येऊ लागतात. या पुळ्या डोक्यात, केसात, कानात, घशात आणि डोळ्यातही येतात. चार-पाच दिवसांत पुळ्या कोरड्या पडू लागतात. त्यावर काळ्या रंगाच्या खपल्या धरतात. पुढे चार-पाच दिवसात त्या खपल्या पडून जातात. कांजिण्या दिसायच्या आधीपासून ते खपल्या धरेपर्यंत हा आजार एका मुलाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो.

कांजिण्या आल्यानंतर त्या मुलाला संसर्गाच्या भीतीनं इतर मुलांमध्ये मिसळू दिलं जात नाही; परंतु कांजिण्या दिसण्यापूर्वीच हे विषाणू श्वासावाटे एका मुलाकडून दुसरीकडे पसरतात. त्यामुळे भावंडं आणि रोजच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींना आजारी मुलांपासून दूर ठेवून फारसं काही साध्य होत नाही. गोवर आणि गालगुंडाप्रमाणे या आजारातही नव्यानं संपर्कात येणारे मित्र, पाहुणी मुलं यांच्यापासून आजारी मुलाला दूर ठेवावं. म्हणजे त्यांना संसर्ग होणं टळेल.

कांजिण्यांचा आजार हा तसा फार गंभीर नसला, तरी त्रासदायक नक्की आहे. ताप येणं, खूप खाज सुटणं, डोकं दुखणं, अंगभर फोड या लक्षणांमुळे रुग्ण वैतागून जातो. शिवाय नेमकी परीक्षेच्या काळात ८-१० दिवस शाळा बुडते, ती वेगळीच. काही मुलांमध्ये क्वचित प्रसंगी गंभीर दुष्परिणामही आढळतात. उदा. छातीत न्यूमोनिया होणं, कांजिण्यांमध्ये मोठे फोड होणं, अगदी क्वचित प्रसंगी मेंदूला सूज येऊन आकडी येणं.

उपचार
कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके अँेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.

तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.

पर्यायी उपाययोजना
कांजिण्यामुळे आलेला ताप इतर त्रास यावर पर्यायी उपाय योजना करण्यात येते. थंड किंवा कोमट पाण्याने स्नान. पाण्यात रोल्ड ओटस घातल्याने त्यामधील बीटा ग्लुकॅन हे विद्राव्य तंतू पाण्यात विरघळतात. या विद्राव्य तंतूमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोल्ड ओटसची पुरचुंडी पाण्यात सोडून ठेवल्यास त्यातील विद्राव्य पदार्थ पाण्यात उतरतो. या पाण्याने खाज कमी होते. खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर अंगावर लावतात. कॅलँडुला नावाचे होमिओपॅथीमधील एक औषध खाज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय एमेटिक ( ॲोन्टिमोनियम टार्टारिकम) पॉयझन आयव्ही आणि गंधकयुक्त औषधांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.

अनुमान
बहुतेक रुग्णामध्ये कांजिण्या आठवड्याभरात बरी होते. कांजिण्या बरी झाल्यानंतर फारशी काळजी घ्यावी लागत नाही. कांजिण्या झाल्यानंतर वीस टक्के पन्नाशीच्या पुढील व्यक्तीमध्ये दीर्घ मुदतीचे परिणाम शरीरावर शिल्लक राहतात. हर्पिस जातीच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे वॅरिसेला झोस्टर विषाणू कांजिण्या ब-या झाल्या तरी शरीरातून संपूर्णपणे कधीच जात नाही. विषाणू चेता पेशीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतो. दीर्घ काळानंतर तो पुन्हा कार्यरत हो ऊन त्या वेळी त्याचे रूपांतर शिंगल्स नावाच्या आजारामध्ये होते. प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. अत्यंत वेदनाजन्य या आजारास हर्पिसया नावानेओळखले जाते. या आजारात चेतांचा दाह होतो. चेतादाहाबरोबर ताप , चेहरा आणि अंगावर पुरळ अशीही लक्षणे दिसतात. हा त्रास सुमारे दहा दिवस होतो. ज्याठिकाणी चेता दाह शिंगल्स मुळे झालाआहे तेथे महिनोन महिने किंवा वर्षे आजारोत्तर वेदना होत राहतात. सध्या शिंगल्स वर दोन प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. व्हॅल्ट्रेक्स आणि फॅमव्हिर. लक्षणे दिसण्यास प्रारंभ केल्यानंतर 96 तासामध्ये ही औषधे दिल्यास हर्पिस विषाणूचे विभाजन थांबते. प्रतिकार यंत्रणा क्षीण झालेल्या रुग्णामध्ये यांचा उपयोग कसा करता येतो यावर पुरेसे संशोधन झाले नाही. फॅमव्हिर अठरा हून लहान व्यक्तीस देता येत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
व्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन ‘ व्हीझीआयजी’ या नावाचे प्रथिन सध्या कांजिण्या प्रतिबंधक लस म्हणून उपस्थित आहे. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती क्षीणझालेल्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसायला लागल्यापासून 96 तासाच्या आत व्ही झी आयजी इंजेकशन दिल्यास याचा परिणाम दिसून येतो. 96 तासानंतर हे प्रथिन दिल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही. नुकत्याच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून व्हीझीआयजी गॅमा ग्लोब्युलिन प्रथिन मिळविले जाते. व्हॅरिवॅक्स ही सौम्य विषाणू लस आहे. कांजिण्यापासून 85% संरक्षण देण्यात हे सक्षम आहे. गंभीर प्रकारच्या कांजिण्यापासून 100% प्रतिबंध या लसीने झाल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी एखादा पुरळ एवढीच प्रतिक्रिया शरीराची असते. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या सूचनेनुसार ही लस सर्व बालकाना 12-18 महिन्यात दिली पाहिजे. (अति संवेदनक्षम बालकांचा अपवाद सोडून) मीझल्स-मम्स- रुबेला लसीकरणाच्या वेळी ही लस दिलीतर योग्य. भारतात पोलिओट्रिपल च्या वेळी. बारा वर्षापर्यंत च्या मुलाना नक्की कांजिण्या आधी झाल्या होत्या की नाही याची खात्री झाली नसेल तर कांजिण्याची लस देता येते. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य सेवक आणि जननक्षम माताना कांजिण्या होण्याची शक्यता अधिक असल्याने कांजिण्याची लस घेणे श्रेयस्कर ठरते. अशा पासून इतराना रोगप्रसार होण्याची शक्यताही अधिक असते. यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करावा.

बारा वर्षांच्या मुलाना कांजिण्याची लस एकदा देणे पुरेसे ठरते. त्याहूनमोठ्या मुलाना आठ आठवड्यानी आणखीएक डोस द्यावा लागतो. सन 2000 मध्ये एका दिन शाळेमध्ये पसरलेल्या कांजिण्याच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली होती. कारण या साठीमध्ये सर्व मुलाना एकदा कांजिण्याची लस दिलेली होती. त्यामुळे 2002 पासून आणखी एकदा लस देणे सुरू झाले. लसीकरणाचे शुल्क वैद्यकीयविमा कंपन्यानी नाकारल्याने अठरा वयापर्यंतच्या मुलांचा लसीकरणाचा खर्च आता अमेरिकन शासन करते. ज्याना कांजिण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत अशाना व्हेरिवॅक्स दिले जात नाही. जुनाट मूत्रपिंडाच्या –वृक्काच्या आजाराने ग्रस्त असलेल्याना ही लस देणे अपायकारक आहे अशी समजूत होती. पण अशाही मुलाना 2003 पासून ही लस सुरक्षित ठरली आहे. ही माहिती महत्त्वाची ठरण्याचे कारण वृक्क रोपणकेलेल्या रुग्णामध्ये कांजिण्याचा आजार जीवघेणा ठरत होता.

व्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही. लसीकरणानंतर तीन महिन्यानी स्त्रियानी गर्भधारणेचा प्लॅन करावा. कांजिण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेंव्हा कांजिण्या ऐन भरातअसतो त्यावेळी लसीकरण करावे असा सल्ला दिला जातो. अशावेळी कांजिण्यापासून योग्य प्रतिबंध होतो. अमेरिकन सांसर्गिक रोग सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रौढाना कधीही कांजिण्या झाल्या नाहीतअशा सर्व प्रौढानी कांजिण्याची लस घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रारंभीच्या काळात लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्द्ल पालकाना शंका होत्या. जसे अधिक राज्यानी आपापल्या शाळेमधील मुलाना लस देण्याबद्द्ल आग्रह धरल्यानंतर लसीकरणाचा विरोध दूर झाला. 2001 मधील कांजिण्या लसीच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता आणखी एकदा तपासली गेली. सहा वर्षाच्या संशोधनानंतर कांजिण्या हा पहिला मानवी हर्पिस विषाणू लसीकरणाने आटोक्यात आल्याचे सिद्ध झाले. आधी संशय व्यक्त केल्याप्रमाणे लसीकरणानंतर शिंगल्स चा धोका असल्याचे वाटत होते. पण आता अशा रुग्णांची संख्या घटत असल्याचे घ्यानात आले आहे.

रोगलक्षणे
विषाणुची लागण झाल्यानण्तर सुमारे दोन आठवडयानंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.

ताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात.

उपचार
हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे ताप नियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, निमसुलाईड, व इत्यादी वापरले जातात.

प्रतिबंधात्मक उपाय
आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे.
प्रतिबंधक लसीकरण करून घेणे.

Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Sushant Bagule
Dr. Sushant Bagule
BAMS, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Kamlesh Manikhedkar
Dr. Kamlesh Manikhedkar
BDS, Dental Surgeon, 9 yrs, Pune
Dr. Sayali Khare - Pendse
Dr. Sayali Khare - Pendse
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 3 yrs, Pune