Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
मानदुखी
#रोग तपशील#गर्भाशयाच्या वेदनामानदुखी हा सर्वत्र आढळणारा एक सामान्य त्रास. काही लोक म्हणतात, की आयुष्यात एकदाही मानदुखी झाली नाही, असा माणूस सापडणं शक्य नाही.

डॉक्टर मला बाकी काही त्रास नाही; पण ही मानदुखी कितीही गोळ्या घेतल्या, तरी कमी होत नाही, अभ्यंकर काकू सांगत होत्या. आता माझ्या वयाची पन्नाशी आली. मला ना ब्लड प्रेशर आहे ना थायरॉइड; पण ही मानदुखी मी किती वर्षं सहन करते आहे, हे मला आठवतही नाही, एका मध्यमवयीन गृहिणीचे हे प्रातिनिधीक उद्गार. मानदुखी हा सर्वत्र आढळणारा एक सामान्य त्रास. काही लोक म्हणतात, की आयुष्यात एकदाही मानदुखी झाली नाही, असा माणूस सापडणं शक्य नाही. यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला, तरी मानदुखी अत्यंत सार्वत्रिक आहे, हेही तितकंच खरं. या त्रासाचं सर्वांत महत्त्वाचं कारण शरीर घडतानाच तयार झालं आहे. ते म्हणजे मानेच्या मणक्याची रचना. शरीराच्या सर्व मणक्यांपैकी सर्वाधिक हालचाल मानेच्या मणक्यांमध्येच होते. जिथे हालचाल जास्त, तिथे घर्षण आणि घर्षणामुळे झीज जास्त, हे अध्याहृतच आहे. या झीजेमुळे मणक्यातील चकत्या सरकणं, मणक्याचे सांधे झिजणं या गोष्टी मानेच्या मणक्यांना सर्वाधिक बाधित करतात.
नैसर्गिक रचना, हेच या मानदुखीचं एकमेव कारण नाही. इतरही अनेक गोष्टी त्यास हातभार लावत असतात.

कामाचं स्वरूप- गृहिणी, शेतमजूर, विद्यार्थी अशा नानाविध कार्यगटातील आणि वयोगटातील व्यक्तींना मानदुखी असू शकते. वाकून काम करणं, वजन उचलणं, पाठीवर ओझं वाहणं, सलग अनेक तास चालणं, संगणकावर सलग काम करणं, इत्यादी गोष्टी मानेचे मणके आणि स्नायूंवर ताण पाडतात. ही सर्व कामं दैनंदिन जीवनाचा आणि व्यवसायाचा भाग असल्यानं टाळणं अशक्य असतं. त्याची परिणती म्हणजे मानेच्या मणक्याची झीज लवकर सुरू होते.
व्यायामाचा अभाव- व्यायामाकडे दुर्लक्ष, स्थूलतेमुळे स्नायूंमध्ये वाढणारं मेदाचं प्रमाण हा मानदुखीला हातभार लावणारा सर्वांत मोठा घटक. मान दुखणं म्हणजे, जे काम तुम्ही करत आहात, ते सहन करण्याची क्षमता मानेच्या स्नायूंमध्ये नाही, असं सांगण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. त्यामुळे जोपर्यंत स्नायू बळकट होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही गोळी किंवा मलम हा मानदुखीवरील अंतिम उपाय असू शकत नाही.

जीवनसत्वांचा अभाव- खाण्याच्या सवयी, वातानूकुलीत जीवनशैली यामुळे अनेक व्यक्तींमध्ये 'बी१२' आणि 'ड' जीवनसत्वाचा अभाव असतो. ही जीवनसत्वं हाडांची मजबूती, नसांची कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक असतात. शाकाहारी जेवणामुळे 'बी १२'ची कमतरता, 'ड' जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं कोवळं ऊन न मिळाल्यामुळे मानदुखीला हातभार लागतो.दुचाकीवरचा प्रवास- भारतीय रस्त्यांबद्दल फार काही न बोलणंच बरं. खाचखळग्यांतून दुचाकीवरून केलेला प्रवास म्हणजे मानदुखीला आमंत्रण. दुचाकीवरून दररोज खूप अंतर कापणं, दुचाकी चालवताना सदैव हादरे बसणं, दूर अंतर कापताना मधे विश्रांती न घेणं, या गोष्टी मानेच्या मणक्यासाठी धोकादायक असतात. दैनंदिन जीवनातील काही गोष्टी टाळता येण्याजोग्या नसतात. दिवसभर झोपून राहता येत नाही. काही साध्या गोष्टींची काळजी घेऊन मानदुखी टाळता येऊ शकते. मणक्यांच्या सर्जनना दाखवून मानेचा त्रास गंभीर स्वरूपाचा नाही, याची खात्री करणं. एक्स रे, एमआरआय इत्यादी तपासण्यांमुळे चकती सरकणं, मज्जारज्जूवर दाब असे त्रास तत्काळ ओळखता येतात. कदाचित ते साधी मानदुखी म्हणून दुर्लक्षिले जाऊ शकतात. असे काही त्रास असल्यास ते इंजेक्शन अथवा सुरक्षित अशा मणक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे बरे होऊ शकतात.

नियमित व्यायाम, फिजिओथेरपीद्वारे मानेचे स्नायू बळकट करणं, हा रामबाण म्हणावा इतका महत्त्वाचा उपचार आहे. नियमित व्यायामामुळे स्नायूंमधील मेदाचं प्रमाण कमी होतं. या स्नायूंमध्ये ताण देणारी कामं करण्याची ताकद येते. कामाच्या जागेचा कार्याभ्यास- कामाच्या ठिकाणी केलेले नाममात्र कार्यबदल मान किंवा पाठदुखी घालवू शकतात. संगणकाचा पडदा डोळ्यांच्या सम उंचीवर असणं, त्यासाठी खाली वा वर पाहावं न लागणं, खाली न वाकता गुडघ्यावर बसून वजन उचलणं, अभ्यास करताना टेबल-खुर्चीचा वापर करणं, शिक्षकांनी फळ्यावर लिहिताना हात खूप उंच न करता मानेच्या पातळीवरून लिहिणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रवास करावा लागत असल्यास मध्ये विश्रांती घेण्यास विसरू नये.
आहारातील पथ्य- जितकं जास्त वजन, तितकी जास्त मान आणि पाठदुखी. वजनावर नियंत्रण ठेवणं, जेवणात 'डी३' आणि 'बी१२' जीवनसत्व असणाऱ्या घटकांचं प्रमाण वाढवणं, अति मांसाहारामुळे वाढणाऱ्या युरिक अॅसिड या सांधेदुखीस कारणीभूत घटकाचं प्रमाण वाढू न देणं, आहारातील कॅल्शिअमचं प्रमाण कायम ठेवणं या प्रमुख बाबी मानदुखीला हातभार लावणाऱ्या घटकांचं बऱ्याच प्रमाणात निर्दालन करू शकतात.

मानदुखीवर करा हा आरामदायी व्यायाम
हलका व्यायाम मानदुखीसाठी फायदेशीर असतो. यामुळे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत मिळते. या व्यायामामुळे स्नायूंचा रक्तप्रवाह वाढेल आणि स्नायू दुखण्याचेही थांबेल. अशा प्रकारे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

- टिल्ट स्ट्रेच - खुर्चीवर रिलॅक्स होऊन बसा. आता डाव्या हाताने डोक्याला मागच्या बाजूने आधार देत उजव्या खांद्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करा.

- चिन टक स्ट्रेच - खुर्चीवर बसूनच हनुवटी खालच्या बाजूने झुकवत छातीकडे घेऊन या. डोक्याला वरून आधार देत असे करा.

- साइड टू साइड रोटेशन - खुर्चीवर सरळ बसा आणि आता हळूहळू आपला चेहरा उजव्या बाजूने फिरवा. यानंतर चेहरा डाव्या बाजूने फिरवा. चेहरा बळजबरीने फिरवल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे शक्य होईल तेवढाच फिरवावा.

हे लक्षात ठेवा - वर दिलेल्या सर्व व्यायामाच्या दोन स्टेप्स करा आणि प्रत्येक सेटमध्ये 12 रिपिटेशन्स करा. तसेच प्रत्येक पोझिशनमध्ये 20 सेकंदांपर्यंत होल्ड करा.
Dr. Nirnjn P.
Dr. Nirnjn P.
MD - Allopathy, Diabetologist Physician, 9 yrs, Pune
Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune