Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Vaginal Related :
Adopt hygiene and stay away from vaginal disorders! Common problems faced by women include reddening, inflammation, itching and wetness around the vaginal area. You can overcome these problems with basic precautions and natural care. Read HelloDox tips and remains aware about natural cares for vaginal disorders.

If you happen to be a garlic lover who loves to gorge on everything garlicky, then it's time for you to get a reality check! Garlic is one of the most common ingredients in Indian kitchens, and is being consumed for more than thousand years now. It is not only used for cooking, but is often considered as a medicine as well. There are various varieties of garlic and the most popular ones are hardneck and softneck. Garlic helps to prevent many diseases because of its medicine properties. However, like everything has its own pros and cons, so does garlic. Here in this article, we have shared some side effects of having excess garlic. Read on to know more.

Foul Odor

Lack of personal hygiene might not just be the only cause of foul odor, as consumption of garlic can break the deal too! There are various chemicals in garlic that contribute to bad breath. So before you think of gorging on your favourite garlic bread, make sure you have a mouth-refreshing spray handy as garlic breath can be quite embarrassing.

Skin Rashes

Eating excess garlic may lead to skin irritation and rashes. Garlic contains an enzyme called alliinase, which is usually the cause of skin rashes. It is quite often advised to wear hand gloves while cutting garlic, as the same enzyme present in it can cause rashes and itchiness.

Headache

Garlic if taken in its raw form may trigger headache as well. It doesn't cause headache on the spot but can trigger the process. As per various studies, consuming raw garlic might stimulate the trigeminal nerve to release neuropeptides that goes to the membrane covering of the brain and triggers headache.

Could Aggravate Vaginal Infection

It is of utmost importance for women to take proper care of their vaginal health. One of the crucial things to keep in mind while suffering from vaginal infection is to avoid eating garlic as it can aggravate the yeast infection by irritating the tender tissues of the vagina.

May Cause Vomiting And Heartburn

According to various observational studies, consuming raw garlic bulbs in excess amounts may lead to vomiting and even heartburn. So to avoid this, you can always limit the intake of garlic.

During pregnancy, it is recommended to avoid the use of any self-treatments or over-the-counter medications to relieve vaginal itching. This can be risky for your well-being. Immediately see your healthcare provider to test for any sexually transmitted diseases or infections (STDs or STIs), which can be the cause behind vaginal itching.

Vaginal Itching Due to pH Changes

If you are experiencing vaginal itching due to normal pH changes of the vagina that occur during pregnancy, you can take a number of self-help treatments, which are efficient in relieving the itching by reducing the PH of the vagina. Here are certain ways in which you can reduce pH of the vagina:

1.Take baking soda baths. For this, prepare a paste of baking soda and water. Apply the paste on the itchy areas and wash after a few minutes. This will lower vaginal pH, giving you relief from itching

2.Having sexual intercourse is another remedy to relieve vaginal itching due to increased pH of the vagina. Male sperms are low on PH levels, thus, intercourse is recommended. But consult a doctor before having sex

3.Some women find cold compresses helpful in relieve vaginal itchingCan Over-the-counter Creams Help in Relieving Vaginal Itching?

4.Doctors do not recommend use of hydrocortisone creams as they contribute to the breakdown of the skin, increasing the itching

5.Lidocaine gel, which is a pure anaesthetic, proves to be good for relieving vaginal itching

6.Women who experience genital yeast infection sometimes use one of the over-the-counter yeast infection creams. These creams can quickly relieve the itch, as well as the other
symptoms of vaginal yeast infections

Some women use a yeast infection cream externally once or twice a day to relieve vaginal itching

How you can Prevent Vaginal Itching?

Good hygiene is the key to remain free from vaginal problems. Always keep your vaginal area clean and dry

After a bowel movement, wipe from front to back to prevent bacteria from entering the vagina
Stay away from vaginal douches

Use only fragrance-free soaps and laundry detergents
Wear loose clothes as tight clothes do not let air pass to the crotch

Avoid wearing nylon panties, wear cotton panties, especially white oness

Do not wear underwear at night as this increases airflow to the vagina

Avoid taking bubble baths or using other fragrant products on your crotch. These can cause irritation in the vagina and urinary tract. Take warm water bath instead.

- Garlic: Garlic can destroy any infection easily. It contains many antifungal, antibacterial properties which soothe the infection naturally. In fact, raw garlic has the ability to fight candida bacteria easily. So, eat 3-4 cloves of garlic for the entire day. You can eat them raw, or cook whatever you feel better.

- Papaya: It is a very helpful food when it comes to soothing the yeast infection naturally. The leas and the seeds of papaya can kill the bacteria like candida, nix etc. Moreover, papaya has a lot of vitamin C which will be great for your health and soothes many infections.

- Oregano herb: Your favourite pizza/pasta seasoning hern oregano can be great to prevent yeast infection. It can prevent many types of fungi, including Candida albicans, which is the cause of around 90% of yeast infections. Other than that, this herb comes under healing herbs which are important for your entire health.

- Coriander: It is a great plant which has benefited compounds on its leaves, seeds and in the stem also. It is a great source of are a good source of fibre, copper, iron, manganese, and magnesium which all are important to kill any bacteria inside your body and to soothe the infected area.

- Olive oil: It has antifungal, antibacterial properties which can kill candida and other bacteria very easily. It has oleuropein which stimulates your immune system’s own response to a Candida albicans infestation. But make sure you use extra virgin olive oil on your cooking.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे आणि जास्त आढळणारे प्रकार म्हणजे बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास (एकपेशीय जीव) यामुळे होणारे योनिदाह. योनिमार्गात काही जैवरासायनिक कारणांमुळे सतत आम्लता असते. या आम्लतेमुळे योनिमार्गात सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. एका विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या (लॅक्टोबॅसिलस) कायमच्या वस्तीमुळे अशी आम्लता राहते. गरोदरपण, बाळंतपणानंतरचा काही काळ, पाळी कायमची थांबल्यानंतरचा काळ हे कमी आम्लतेचे असतात म्हणून या तीन काळात जंतुदोष होऊ शकतो. बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास शिवाय आणखी काही जंतू विशिष्ट परिस्थितीत योनिमार्गात वाढू शकतात. परमा (गोनोरिया) या लिंगसांसर्गिक रोगजंतूमुळे कधीकधी योनिदाह होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग, ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया, मधुमेह, इत्यादी कारणांनी इतर जंतुदोष होऊ शकतात.

रोगनिदान :
- शक्यतो या दाहाचे नेमके कारण व प्रकार ओळखणे आवश्यक असते. कुस्को योनिदर्शकाच्या तपासणीत हा स्राव दिसून येतो. योनिदर्शकाच्या चमच्यासारख्या भागावरही हा स्राव आपोआप येतो, तो तपासावा.
- अंगावरून पाणी जाणे (प्रदर) व खाज सुटणे ही योनिदाहाची प्रमुख लक्षणे आहेत. याला कधीकधी दुर्गंधी (विशेषतः ट्रायकोमोनास प्रकारात) येते. आतून तपासणी केल्यावर योनिदाहाचा प्रकार समजू शकतो.
- बुरशीजन्य योनिदाहात दह्यासारखा चिकट जाड स्राव येतो व आतली त्वचा सरसकट लालसर दिसते.
- ट्रायकोमोनास प्रकारात हा स्राव हिरवट-पिवळट, दुर्गंधीयुक्त, फेसकट असतो व खाजही भरपूर असते. यात आतल्या त्वचेवर बहुधा मोहरीइतके लालसर रक्ताळलेले ठिपके असतात. कधी कधी लघवीस जळजळ होते. या योनिदाहाबरोबर (ट्रायकामोनास) इतर जंतुदोषही आढळण्याची शक्यता असते.
- याशिवाय इतर प्रकारचे जंतुदोष म्हणजे शरीरात इतर ठिकाणी ‘पू’ निर्माण करणारे किंवा अन्नमार्गातील जिवाणू असतील तर ओळखणे जरा अवघड जाते. अशा प्रकारचे इतर ‘जंतुदोष’ बाळंतपणानंतर किंवा जखमांबरोबर येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगावरून पांढरे-पिवळे स्राव जाण्याची तक्रार असेल तर आतून तपासणी केल्याशिवाय निष्कर्ष काढू नये. स्राव/पाझर जाण्यामागे योनिदाह सोडून इतरही कारणे असतात, उदा. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग, गर्भनलिकांचे जंतुदोष, इ. अंगावरून स्राव म्हणजे योनिदाह असे समीकरण करणे चुकीचे आहे. गरज वाटल्यास डॉक्टरकडे पाठवून निश्चित निदान करता येईल.

उपचार
योनिदाहाचा प्रकार ठरवून उपचार करावेत.
योनिदाह बुरशीजन्य किंवा अन्य जंतुदोषांमुळे असेल तर जेंशन (व्हायोलेट) औषध बोळयाने आतून आठवडाभर दिवसाआड लावल्यास आराम पडतो. मात्र जेंशन हे सौम्य औषध आहे.
- ट्रायकोमोनास हे कारण असेल तर पोटातून .मेझोलच्या गोळया (1000 मि. ग्रॅ. डोस फक्त 1 दिवस ) घेणे हाच चांगला उपाय आहे. हा प्रकार फक्त औषध लावून बरा होत नाही. पण इतरही जंतुदोष असतात म्हणून जेंशन औषध लावणे हे योग्य ठरेल.
- दोन्ही प्रकारांत आतून लावण्यासाठी प्रोव्हिडोन आयोडिन हे औषध काही प्रमाणात उपयोगी ठरते.
- घरगुती उपचार: योनिधावन करून योनिमार्गात थोडे वर लसणाची पाकळी ठेवल्यास (रोज 2-3 दिवस) बुरशीदाह बरा होतो. लसणाऐवजी आठवडाभर रोज दही आतून लावण्यानेही आराम पडतो.
- ट्रायकामोनास योनिदाह असल्यास योनिधावन करून, कडुनिंब पाला कुटून त्याची ओली पुरचुंडी (स्वच्छ कापडात) रात्री योनिमार्गात थोडी वर ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी पुरचुंडी बदलावी. याने लवकर आराम पडतो.
- योनिदाह वारंवार होत असल्यास लघवीची साखरेसाठी तपासणी करून मधुमेहाची शक्यता तपासली पाहिजे.
- इतर काहीही त्रास, ओटीपोटात गाठ दुखरेपणा असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
- ट्रायकोमोनास, बुरशी यांमुळे होणारा योनिदाह लिंगसांसर्गिक असल्याने जोडीदाराची तपासणी व उपचार होणे आवश्यक असते. नाहीतर आजार जोडीदारांमध्ये फिरत राहील.

होमिओपथी निवड :
एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब,सीना, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, -हस टॉक्स, सेपिया, सिलिशिया, सल्फर

योनिद्वाराची खाज सुटण्याची कारणे :
योनिद्वारावर खाज सुटण्याची कारणे अनेक असतात. त्यात मुख्य आंतरिक गट म्हणजे योनिमार्गातून येणा-या स्राव व दाह यांमुळे येणारी खाज. दुसरा गट म्हणजे खुद्द योनिद्वाराचे आजार.
- आंतरिक आजार : आतून बाहेर पसरलेली खाज, उदा. योनिदाह, गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग, लिंगसांसर्गिक रोग, इत्यादींमुळे होणारी योनिद्वाराची खाज.
- योनिद्वाराचे आजार : यांमध्ये खरूज, गजकर्ण, उवा, आतडयातल्या जंतूंमुळे (सूतकृमी) गुदद्वार व योनिद्वारावर येणारी खाज, जखमा (उदा. बाळंतपण किंवा लैंगिक संबंधामुळे तयार होणा-या जखमा), केसांच्या मुळाशी तयार होणा-या गाठी, वावडे, मधुमेहामुळे येणारे जंतुदोष, इत्यादी निरनिराळे आजार आढळतात.
यासाठी योनिद्वाराची आणि योनिमार्गाची तपासणी केल्यावर बहुधा ताबडतोब आजार समजतो. मधुमेह तपासणीसाठी मात्र लघवीतील आणि रक्तातील साखरेसाठी तपासणी करावी.

उपचार :
- रोगनिदान झाल्यानंतर मूळ आजारावर (उदा. खरूज असल्यास खरजेचे गॅमा मलम) उपचार करावेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या साबणपाण्याने योनिद्वाराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. केस काढून टाकल्यावर स्वच्छता ठेवणे व औषध लावणे सोपे जाते.
- कडुनिंबाच्या काढयाने सकाळी व रात्री झोपताना धुऊन स्वच्छता केल्याने किरकोळ कारणे बरी होतात.



गरोदरपणाच्या काळात योनिमार्गातून स्त्राव होणं

गरोदरपणाच्या काळात दिवसेंदिवस जसा काळ पुढे सरकतो. तशी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात शरीरातून पांढरे पाणी बाहेर टाकले जाते. शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. या काळात पेल्व्हिक भागाला होणारा रक्तपुरवठाही अधिक असतो. त्यामुळे पांढर्‍या रंगाचा गंध रहित स्त्राव वाहतो. मात्र हा स्राव करडा किंवा पिवळसर रंगाचाआढळल्यास ते इंफेक्शन असू शकते. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात कोणत्याही प्रकारचे स्त्राव आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1. पांढर्‍या रंगाचे गंध विरहीत स्त्राव : गरोदरपणाच्या काळात शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने पांढर्‍या रंगाचा स्त्राव होतो. अशा स्वरूपाचा स्राव होणे सामान्य आहे. हा स्राव होणे म्हणजे योनीमार्गातील शुष्कता नसल्याचे संकेत देतात. यामुळे योनिमार्गाजवळ जळजळ,खाज येण्याचा त्रास होत नाही.
2. करड्या रंगाचा स्राव : गरोदरपणाच्या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे शरीरात बॅक्टेरिया साचून राहण्याचे प्रमाण वाढते. अति प्रमाणात बॅक्टेरिया साचल्यास चांगले आणि घातक बॅक्टेरिया या मधील संतुलन बिघडते. परिणामी यामधून काही इंफेक्शन निर्माण होते. या समस्येला बॅक्टरिअल वाजिनोसिस म्हणतात. अशाप्रकारचा स्त्राव आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. पांढरा- पिवळसर स्त्राव : योनिमार्गामध्ये यिस्ट इंफेक्शन असल्यास पांढरा- पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. बॅक्टेरियाप्रमाणेच योनिमार्गामध्ये कॅण्डिडा नामक यीस्ट आढळतात. मात्र शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्यास या यीस्टची देखील वाढ होते. परिणामी पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. या स्त्रावासोबत जळजळ, खाज, वेदना वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. रक्त पडणे : हा एक महत्त्वाचा संकेत आहे. तुम्ही गरोदर असल्यास स्पॉटिंगच्या 10-15 दिवसांनंतर इम्प्लांटेशन ब्लीडींग होते. त्यामुळे तुम्ही गरोदर असल्याची खात्री करून घ्या.

पांढरे पाणी जाणे हे एक लक्षण आहे. प्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. (रक्तप्रदर म्हणजे अंगावरून रक्त जाणे.) पण बोली भाषेत रक्त नसलेल्या अनेक स्रावांना-श्वेतप्रदर-अंगावरून पांढरे पाणी जाणे, असेच म्हणतात. स्रावांचा रंग पाण्यासारखा पांढरट किंवा पिवळसर असू शकतो. काही आजार नसतानाही असे पाणी जाऊ शकते. ही तक्रार ब-याच स्त्रिया करतात. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

पाणी जाण्याची कारणे
1. वयात येणे, गरोदरपण, स्त्रीबीज सुटताना पाझर, इत्यादी सामान्य शारीरिक कारणे. यात आजाराचा संबंध नसतो.
2. गर्भाशय, गर्भनलिका, इ. अंतर्गत अवयवांच्या आजारांमुळे (जंतुदोष, कर्करोग, इ.) होणारे पाझर.
3. निरनिराळया जंतुदोषांमुळे होणारे योनिदाह (बुरशी, जिवाणू, ट्रायकोमोनास, परमा,इ.)
4. मधुमेहामुळे होणारा जंतुदोष
5. पांढ-या पाण्याच्या तक्रारींमागे किती विविध प्रकारची कारणे असतात हे यावरून लक्षात येईल. पाणी जाणे म्हणजे केवळ योनिदाह आहे म्हणून उपचार करून सोडू नये. रोगनिदान आणि योग्य सल्ला जास्त महत्त्वाचे आहेत.

जिवाणूबदल आणि पांढरे पाणी योनिमार्गात नेहमी काही सहजिवाणू वस्तीला असतात. यांच्यामुळे आम्लता होऊन सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. हे जिवाणू प्राणवायू पण सोडतात, त्यामुळे इतर जंतू मरतात. मात्र काही कारणांनी हे सहजिवाणू कमी होऊन इतर प्रकारचे नवे जंतू शिरून वाढू शकतात. यामुळे खरे म्हणजे योनीदाह होत नाही, केवळ पाझर वाढतात. खाज किंवा आग होत नाही. हे जंतू लिंगसांसर्गिक पध्दतीने पसरत नाहीत. असे जंतू असलेल्या निम्म्या स्त्रियांना फारसा त्रास पण होत नाही. या पाहुण्या जंतुंमुळे होणारा पाझर - पांढरट, दुधाळ, पातळ व योगिमार्गात त्वचेला लागून आढळतो. याला मासळीसारखा वास असतो आणि हा अल्कली गुणधर्माचा असतो.(लिटमस टेस्ट केल्यास तांबडा लिटमस निळा होतो) यामुळे फारच झाले तर योनिद्वाराशी सौम्य खाज असू शकते. यासाठी सोपा उपचार म्हणजे क्लिंडामायसीन मलम आतून लावणे. याऐवजी क्लिंडामायसीन नावाच्या योनीमार्गात बसवायच्या गोळया मिळतात. ही गोळी झोपताना रोज एक योनिमार्गात ठेवणे हा एक पर्याय आहे. आणखी पर्याय म्हणजे लक्टील नावाचे एक मलम 7 दिवस रोज आतून लावल्यास योनिमार्गात आम्लता निर्माण होते व जंतूंची वाढ थांबते. मात्र उपचार थांबवल्यावर काही जणींना हा त्रास परत होण्याची शक्यता असते.

योनीदाह आणि अंगावरून पांढरे जाणे
अंगावरून पांढरे जाणे ही बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते. काही वेळा हा आजार असतो तर काही वेळा आजारनसतो. निरोगी अवस्थेत योनीमार्गात रहिवाशी जिवाणूंमुळे लॅक्टीक आम्ल असते. या आम्लामुळे इतर जिवाणू व जंतू वाढू शकत नाहीत. सामान्यपणे पांढरे पाणी गर्भाशय मुखातील ग्रंथीतून किंवा योनीमार्गातील ग्रंथीतून पाझरते. या स्त्रावामुळे योनीमार्ग आपोआप स्वच्छ आणि रोगजंतूरहित राहतो. सामान्यपणे हे स्त्राव कमीअसल्याने लक्षात येत नाहीत. स्त्राव जास्त असेल तर त्याची तक्रार होते. पांढरे पाणी जाण्याची तक्रार कोणत्याही वयात आढळते. म्हातारपणातही हा त्रास होऊ शकतो. आता आपण या जिव्हाळयाच्या त्रासाबद्दल माहिती घेऊया.

योनीमार्गातले नैसर्गिक स्त्राव :
स्त्रीबीज सुटताना, शरीर संबंधात किंवा गरोदरपणात निसर्गत: पाझर वाढतात. यामुळे आपोआप स्वच्छता राहते आणि रोगजंतू वाहून जातात. काही स्त्रियांना चक्क कपडाही वापरावा लागतो. पण हे पाणी स्वच्छ असेल, घाण वास नसेल आणि वेदना नसेल तर काळजी करू नका.

अंगावरून रोगट स्त्राव :
पांढऱ्या पाण्याबरोबर दुर्गंध, तांबूस पिवळी किंवा हिरवी छटा, ताप, ओटीपोटात वेदना असेल तर हा आजार असतो. यापैकी काही लिंगसांसर्गिक आजारपण असू शकतात. रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गात आम्लता घटल्याने रोगजंतू वाढू लागतात. इथे अशा काही आजारांची माहिती दिली आहे.
- खराब रोगट गर्भाशयमुख : यामुळे सौम्य वेदना आणि सळसळ-खाज जाणवते. शरीरसंबंधांच्या वेळी विशेष त्रास होतो. स्त्राव तांबूस असतो. उपचारांनी हा आजार बरा होतो.
- योनीमार्गात रोगजंतू वाढून दुर्गंधयुक्त हिरवट स्त्राव आणि खाज येते.
- योनीमार्गात बुरशीलागण होऊन दह्यासारखा स्त्राव आणि खाज येते. योनीमार्गाचा अंतर्भाग लालभडक दिसतो. बुरशीरोधक गोळी योनीमार्गात 2-3 दिवस ठेवा. याने हा त्रास कमी होतो.
- एकपेशीय योनीदाह : यात हिरवट स्त्राव येतो. योनीमार्गात आत लालसर ठिपके दिसतात. हे स्वत: प्रत्येक स्त्रीला आरशाने तपासता येते. यासाठीपण योनीमार्गात गोळी ठेवावी लागते.
- परमा : हा लिंगसांसर्गिक आजार झाल्यावर योनीमार्गात वेदना, पिवळट पू,ताप आणि लघवीला जळजळ होते. जोडीदारालापण हा त्रास आधी असू शकतो किंवा नंतर होतो.
वेळीच उपचार न केल्यास हे दुखणे ओटीपोटात जाऊ शकते.
- ओटीपोटातील जंतूलागण : ओटीपोटात म्हणजे जननसंस्थेत जंतूलागण झाल्यामुळे ताप, दुखणे, दुर्गंधयुक्त स्त्राव हा त्रास होतो. वेळीच उपचार न केल्यास कायमचे दुखणे होते. पुढेपुढे गर्भनलिका सुजून वंध्यत्व येऊ शकते. लैंगिक संबंधावेळी ओटीपोटात दुखणे ही याची विशेष खूण आहे.
- अधर्वट किंवा दुषित गर्भपात झाल्यास तांबूस आणि दुर्गंधयुक्त पाणी येते,ताप आणि वेदना होतात. त्यासाठी ताबडतोब उपचार घ्यावे लागतात.
- गर्भाशयमुखाचा कर्करोग असल्यास स्त्राव तांबूस किंवा लाल येतो. यावर जंतूलागण झाल्याने दुर्गंध आणि पूमिश्रित पाणी येते.

प्राथमिक आणि वैद्यकीय उपचार
- नैसर्गिक स्त्राव असेल तर काळजीचे कारण नसते. स्वच्छता मात्र पाळावी.
- केवळ योनीदाह असेल तर योनीमार्गात ठेवण्याच्या गोळयांचा उपचार पुरतो. आवश्यक वाटल्यास तोंडाने एफ.एस.ए.3 या गोळयांचा उपचार करावा. वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
- लिंगसांसर्गिक आजाराची शक्यता वाटल्यास वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा.
- स्त्राव तांबूस असेल तर वेळीच तपासणी करायला पाहिजे.

Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. DUSHYANTSINH RAUL
Dr. DUSHYANTSINH RAUL
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 5 yrs, Pune
Dr. AMITRAJ MHETRE
Dr. AMITRAJ MHETRE
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Hellodox
x