Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Sleep Disorder :
Sleep Disorder involves conditions related to quality, timing and amount of sleep. It affects badly on your health. Do not worry! Read how to treat sleep disorders without taking medicines. You can also ask your queries on Hellodox App and get suggestions from Medical Experts.

दिवसभर काम आणि थकवेनंतर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे की झोपण्या अगोदर कोणत्या वस्तूंचे सेवन केले पाहिेजे आणि कोणते नाही. आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहो ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि काही वस्तूंचे सेवन केल्याने तुमची झोप उडू शकते.

या पदार्थांमुळे येते चांगली झोप

1) चेरी- चेरी त्या नॅचरल वस्तूंमधून एक आहे ज्यात मेलाटोनिन केमिकल असतो. हे केमिकल तुमच्या बॉडीतील इंटर्नल क्लॉकला कंट्रोल करतो आणि तुम्हाला चांगली झोप देण्यास मदत करतो.

2) दूध- दुधात एमिनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असतो जो मेंदूत रासायनिक सेरोटोनिनचा अग्रदूत असतो.

3) जैस्मिन राईस- यात भरपूर प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असतो, ज्याचा अर्थ असा आहे की शरीर हळू हळू पचन करून हळू हळू रक्तात ग्लूकोज निर्माण करतो.

या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा
1) वाइन- दारू तुमच्या सिस्टममध्ये लवकर मेटाबोलाइज होते आणि अस्वस्थतेचे कारण बनते. झोपण्याअगोदर दारूचे सेवन नाही केले पाहिजे.

2) कॉफी- यात कॅफीन असत जे सेंट्रल नर्वसला उत्तेजित करते. झोपताना कॉफीचे सेवन करणे टाळावे.

3) डार्क चॉकलेट- चॉकलेटमध्ये फक्त कॅलोरीच नव्हे तर कॅफीन देखील असत. उदाहरणासाठी, 1.55 औंस हर्शे मिल्क चॉकलेटमध्ये किमान 12 मिलीग्राम कॅफीन असत.

आजची जनरेशनला रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय आहे. पण यामुळे त्यांना दिवसभर, थकवा, सुस्ती आणि कमजोरी वाटत असते. तुमच्या जवळपास देखील कोणाला असे होत असेल तर यासाठी वॉट्सएप, फेसबुक किंवा स्मार्टफोनला दोष देण्याआधी पोटॅशियमचा स्तर नक्की चेक करायला पाहिजे. कारण शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरात पोटॅशियमची कमतरतेला हायपोक्लेमिया म्हणतात. निरोगी राहणे आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला रोज 47000 मिलीग्राम पोटॅशियमची गरज असते. कारण पोटॅशियम हृदय, मेंदू आणि मांसपेशींच्या कार्यप्रणालीला व्यवस्थितरूपेण चालवण्यास मदत करतो. शरीरात पोटॅशियमची कमतरतेमुळे हायपोकॅलीमिया आणि मानसिक आजार होण्याचा धोका असतो. आम्ही तुम्हाला याच्या कमतरतेचे काही संकेत सांगत आहोत, ज्याच्या कमीमुळे होणार्‍या समस्येला तुम्ही सोप्यारित्या ओळखू शकता.

अनिद्रेची समस्या
जर तुमच्या शरीरात देखील पोटॅशियमची कमी असेल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. अशात अनिद्रेची समस्या असल्यास डॉक्टरकडून चेकअप करवणे आवश्यक आहे.

तणाव

अधिक तणाव किंवा डिप्रैशनअसणे देखील पोटॅशियमच्या कमतरतेचे संकेत आहे. एवढंच नव्हे तर पोटॅशियमची कमीमुळे होणारा ताण मानसिक समस्येचे कारण देखील बनू शकतो.

मूड स्विंग
जेव्हा शरीरात याची मात्रा कमी होऊ लागते तेव्हा हा मेंदूच्या कार्यक्षमतेला देखील प्रभावित करतो. यामुळे तुमचा मूड स्विंग अर्थात विचारांमध्ये बदल येऊ लागतात.

दिवसभर थकवा जाणवतो
शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेच एक लक्षण थकवा देखील आहे. यामुळे तुम्ही थोडे देखील चालले की थकून जाता. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात उपस्थित कोशिकांना काम करण्यासाठी पोटॅशियम आणि खनिज लवणांची गरज असते पण याची पूर्ती न झाल्याने शरीरात थकवा येतो.

ऍसिड वाढणे

पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीरात ऍसिडची मात्रा वाढून जाते, ज्यामुळे शरीरात सुस्ती, थकवा आणि कमजोरी जाणवते.

ब्लड प्रेशर अनियंत्रित होणे

पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. तसेच हे शरीरात सोडियमची मात्रेला कमी करून ब्लड प्रेशराला देखील कंट्रोलमध्ये आणतो. अशात याची कमी झाल्याने ब्लड प्रेशराचे वाढणे किंवा कमी होणे हा त्रास सुरू होऊ शकतो.

झोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्‍या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्‍या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तो तुमच्या हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो आणि ते अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी झोप आणि हृदयासंबंधी हालचालींवर केलेल्या 74 अध्ययनांच्या समीक्षेनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक दिवसातून दहा तास झोप घेतात, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता आठ तास झोपणारांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढते. या अध्ययनांमध्ये 33 लाख लोकांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता. उशिरापर्यंत म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍या लोकांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज म्हणजे ह्रदयासंबंधी आजार होण्याचा धोका 50 टक्के जास्त दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सात तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांमध्ये अकाली मृत्यू वा हृदयाचा धोका आढळून आला नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी घातक का असते, हे अद्याप शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. मात्र कमी झोप व जास्त झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, यावर ते सहमत आहेत.

झोप ही गोष्ट प्रत्येकालाच अत्यंत प्रिय असते. त्यामुळेच मग सुट्टीच्या दिवशी अगदी तासन्‌ तास अंथरुणात लोळत राहणे अनेकांची सवय असते. मात्र तुम्हाला हे माहितीय का? की, शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपल्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. झोप या विषयावर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अनेकदा कामाच्या धावपळीत आठवड्याभरात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचाच परिणाम हा आरोग्यावर होत असतो. झोपेवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज सहा किंवा सात तास झोपतात त्यांच्या तुलनेत पाच किंवा त्यापेक्षा कमीतास झोपणार्‍यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका हा अधिक असतो.

तसेच सुट्टीच्या दिवशी जे लोक अधिक तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचं आयुष्य वाढण्यास मदत होते. मात्र ज्याप्रमाणे पाच तासांपेक्षा कमी तास झोपणं जसं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. तसेच पुरेशा झोपेपेक्षा जास्तीची झोप घेणंही महागात पडू शकतं. स्वीडनध्ये जवळपास 40,000 लोकांचा या संशोधनासाठी अभ्यास केला गेला.

Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Renu Vatkar
Dr. Renu Vatkar
MDS, Pune
Hellodox
x