Health Tips
Sleep Disorder :
Sleep Disorder involves conditions related to quality, timing and amount of sleep. It affects badly on your health. Do not worry! Read how to treat sleep disorders without taking medicines. You can also ask your queries on Hellodox App and get suggestions from Medical Experts.
Published  

सावधान! अपुर्‍या झोपेुळे गंभीर आजार

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

झोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्‍या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्‍या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.

Published  

नऊ तासांपेक्षा जास्त झोप घातक

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तो तुमच्या हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो आणि ते अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी झोप आणि हृदयासंबंधी हालचालींवर केलेल्या 74 अध्ययनांच्या समीक्षेनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक दिवसातून दहा तास झोप घेतात, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता आठ तास झोपणारांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढते. या अध्ययनांमध्ये 33 लाख लोकांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता. उशिरापर्यंत म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍या लोकांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज म्हणजे ह्रदयासंबंधी आजार होण्याचा धोका 50 टक्के जास्त दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सात तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांमध्ये अकाली मृत्यू वा हृदयाचा धोका आढळून आला नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी घातक का असते, हे अद्याप शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. मात्र कमी झोप व जास्त झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, यावर ते सहमत आहेत.

Published  

शनिवार, रविवार भरपूर झोपा; आयुष्य वाढवा

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

झोप ही गोष्ट प्रत्येकालाच अत्यंत प्रिय असते. त्यामुळेच मग सुट्टीच्या दिवशी अगदी तासन्‌ तास अंथरुणात लोळत राहणे अनेकांची सवय असते. मात्र तुम्हाला हे माहितीय का? की, शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपल्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. झोप या विषयावर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अनेकदा कामाच्या धावपळीत आठवड्याभरात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचाच परिणाम हा आरोग्यावर होत असतो. झोपेवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज सहा किंवा सात तास झोपतात त्यांच्या तुलनेत पाच किंवा त्यापेक्षा कमीतास झोपणार्‍यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका हा अधिक असतो.

तसेच सुट्टीच्या दिवशी जे लोक अधिक तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचं आयुष्य वाढण्यास मदत होते. मात्र ज्याप्रमाणे पाच तासांपेक्षा कमी तास झोपणं जसं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. तसेच पुरेशा झोपेपेक्षा जास्तीची झोप घेणंही महागात पडू शकतं. स्वीडनध्ये जवळपास 40,000 लोकांचा या संशोधनासाठी अभ्यास केला गेला.

Published  

शांत झोप हवी आहे, मग हे करून बघा

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे देखील गरजेचे आहे. आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. झोप न लागण्याची अनेक कारणे असतील पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होवून त्याचा समस्या उद्भवू लागतात.
अपुऱ्या झोपेमुळे कामावर देखील परिणाम होतो.


अधिक चांगले काम करण्यासाठी शांत झोपेची गरज असते. कारण त्यामुळेच मन शांत, प्रसन्न राहतं व शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
म्हणून शांत झोप येण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरतो. हा उपाय अतिशय सोपा आहे. खसखस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावर थोडी भाजून घ्या. त्यानंतर खसखस ग्राईंड करून घ्या.
मग कोमट दुधात जायफळ आणि खसखस पावडर घाला. नीट मिक्स करून दूध प्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागण्यास मदत होईल

Published  

झोप येत नाही?

Dr.
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda Ayurveda Family Physician 4 Years Experience, Maharashtra
Consult

आपल्यापैकी ब-याच जणाांना रात्री काही केल्या झोप येत नाही.
दिवसभराच्या कामाने मन-शरीर थकलां असलां तरी झोप मात्र लागत नाही, मग whats app, fb, you tube असतांच साथीला.....झोप येईपयंत किंवा वा सकाळपर्य़ंत...! झोप लागली नाही की मग दुसरा दिवस डोकां जड होणां, चिडचिड होणां, कामात लक्ष न लागणां यात जातो. रात्र झाली की मग पुन्हा आपण, घड्याळ आणि mobile/ laptop.

खरां तर निद्रा अर्थात झोप हा आयुष्याच्या तीन महत्वाच्या आधाराच्या खांबाांपैकी एक. झोप पुरेशी घेतली जाणां- न जाणां यावर आरोग्य, बुद्धि, आकलन होणे, शक्ती, पुनरुत्पादन क्षमता या गोष्टी अवलांबून आहेत. त्यामुळे झोप न लागणे या गोष्टीकडे पुरेशा गाांभीयााने लक्ष दिले पाहीजे.
वेळेवर झोप यावी यासाठी पुढील उपाय अवश्य करावेत -

१) रात्री म्हशीचे दूध तूप घालून प्यावे. ( रात्रीचे जेवण आणि दूध यात कमीत कमी तासदीड्तासाचे अंतर हवे.)

२) जेवणात दही, तूप यांचा आवर्जून समावेश करावा. (दही रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणात, नाश्त्याला दह्याचा समवेश केल्यास त्याबरोबर खडीसाखर, तूप, मुगाचे वरण, आवळा याांपैकी काहीतरी असावे.)

३) सवा शरीराला नियमित मसाज करावा. यासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बला तेल इ. वापरावे. उपलब्धता नसल्यास तीळाचे तेलही चालेल.

४) डोक्याला आवर्जून तेल लावून मसाज करावा. पाण्याचा तळवयांनाही मसाज करावा.

५) आवडीचे सुगंध , अत्तरे वापरावीत.

६) झोपण्याची जागा प्रसन्न, शांत असावी. गादी-उशी पुरेशी आरामदायी असावी.

७) ठराविक वेळी TV, mobile, tab, laptop बंध करुन कामाच्या- ताणाच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.

हे सर्व उपाय नियमित करूनही महिन्याभरात उपयोग न झाल्यास वैद्यांचा सल्ल्याने शिरोधारा , शिरोपिचु, नेत्रतर्पण व गरजेनुसार औषधोपचार करावे.

Dr. Abhinandan J
Dr. Abhinandan J
BAMS, Ayurveda Family Physician, 1 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 12 yrs, Pune
Dr. Chetana  Mahajan
Dr. Chetana Mahajan
DHMS, Homeopath, 22 yrs, Pune
Dr. Shubham Hukkeri
Dr. Shubham Hukkeri
BPTh, 1 yrs, Mumbai City
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Hellodox
x
Open in App