Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Pregnancy :
Pregnancy is a beautiful phase of every women's life; with little precaution this journey can be memorable. Hellodox wishes happy nine months with expert advice on yoga, exercise, meal plans, natural care and home care. Get the best pregnancy care tips and charts on HelloDox.

पावसाळा आला की मोसम तर चांगला होतोच पण त्यासोबत आजारांचा धोका ही वाढून जातो. तसेच मच्छरांमुळे आजारपण येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या मोसमात यांच्यापासून बचाव करणे फारच गरजेचे आहे. डासांचा बचाव करण्यासाठी लोक काही घरगुती उपचारांसोबत नवं नवीन तंत्रज्ञान वापर देखील करतात. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की मच्छर काही लोकांना जरा जास्तीत चावतात.

कोणत्या लोकांना मच्छर जास्त चावतात -

- बर्‍याच रिपोर्ट्सनुसार मच्छर एक खास ब्लड ग्रुप असणार्‍या व्यक्तींना जास्त चावतात आणि रिसर्चमध्ये समोर आले आहे की मच्छर 'ओ ब्लड ग्रुपकडे जास्त आकर्षित होतात.

- बर्‍याच वेळा लोक आणि रिसर्चनुसार असे मानण्यात आले आहे की ले गेले आहे की जे लोक जस्त बियरचे सेवन करतात त्यांना जास्त मच्छर चावतात. पण अद्याप
पूर्णपणे कुठल्याही रिसर्चमध्ये याची पुष्टी झालेली नाही आहे.

- ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना मच्छर जास्त चावतात, कारण घामामध्ये लॅक्टिक ऍसिड, यूरिक ऍसिड, अमोनिया इत्यादी असतात, ज्यामुळे मच्छर जास्त आकर्षित होतात.

- गर्भवती स्त्रिया इतर महिलांच्या तुलनेत जास्त खोल श्वास घेतात आणि या दरम्यान त्यांच्या शरीरातील तापमान जास्त होतो. यामुळे गर्भवती स्त्रियांना डास जास्त चावतात.

- फीमेल अर्थात मादा मच्छराला जिवंत राहण्यासाठी आइसोल्युसिनची गरज असते. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात आइसोल्युसिन जास्त असत, त्यांना डास जास्त त्रास देतात.

टेक्नॉलॉजीच्या विश्वात सतत काहीना काही नवीन सुरू असतं. ज्यामुळे आपली कामे सोपी होतात. अशाच एका वेगळ्या टेक्नीकचा वापर ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. या टेक्नीकचा वापर महिलांना प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. या टेक्नीकची सध्या वेगवेगळ्या स्तरातून प्रशंसा केली जात आहे. चला जाणून घेऊ कशाप्रकारे महिलांना प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदना कमी केल्या जातात.

ब्रिटनमध्ये वेल्सच्या एका रूग्णालयात गर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी एक पाऊल उचललं गेलंय. येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांना व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट वापरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामागे मुख्य उद्देश हा आहे की, गर्भवती महिलांचं प्रसुती कळांवरून लक्ष हटवले जावे किंवा त्यांची वेदना कमी करावी.

त्यासाठी हे हेडसेट सात मिनिटांसाठी गर्भवती महिलेला घालण्यास सांगितले जातात. यादरम्यान व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटमध्ये त्यांना उत्तर ध्रुवाची लायटिंग, समुद्रात पोहणे, मंगल ग्रहाची सफर आणि पेंग्विंगसोबत असल्याची जाणीव होते. तसेच त्यांना मन शांत करणारं संगीतही ऐकवलं जातं.

आता अशी चर्चा आहे की, हा उपाय वेल्सच्या सर्वच हॉस्पिटलमध्ये लागू केला जाऊ शकतो. कार्डिफच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या हेडसेटवर रिसर्चही झाला आहे. यादरम्यान असं आढळलं की, वीआर हेडसेट घातल्याने गर्भवती महिला प्रसुतीवेळी शांत राहिल्या.

पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं. वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.

गरोदर स्त्रीयांसाठी नाजूक असलेल्या या काळामध्ये इंफेक्शन झाल्यास आईसोबतच गर्भावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न,डास यांच्यामुळे पावसात अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोपासून अगदी हेपिटायटीसचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या इंफेक्शनपासून बचावण्यासाठी काही एक्सपर्ट टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

गरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी ?
हात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. नियमित हात स्वच्छ केल्याने इंफेक्शनचा धोका कमी होतो. WHO च्या अहवालानुसार, सुमारे 40-60 सेकंद हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. नकळत आपला अनेक ठिकाणी स्पर्श होत असतो. त्यामुळे बॅक्टेरियाचे इंफेक्शन वाढते.

गरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. अशावेळेस खाण्याची इच्छा नसते. त्यावेळेस नेहमीचं जेवण जेवण्याऐवजी अनेकजण फळांच्या सेवनावर अधिक भर देतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फळं विकत घेताना काळजी घ्या. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.

कच्च्या भाज्यांचे सलाड आहारात घेताना काळजी घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका

साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. पावसात भिजून घरी पोहचल्यानंतर पाय नीट स्वच्छ करा. पायांतील बोटांमधील भागही स्वच्छ करा.

गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. या काळात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासोबतच गर्भाची काळजी घेणं गरजेचे असते. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हितकारी आहे.

गरोदरपणाच्या काळात डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

डाळिंबाचे फायदे -
गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.


गरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकर बळावण्याची शक्यता असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळावतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.

गर्भाच्या हाडांना मजबुती देण्यासाठी गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांसपेशींनादेखील मजबुती मिळते.

गरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास प्रसुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासही मदत होते.

'थ्री इडियट्स' सिनेमातील क्लायमॅक्सचा सीन त्यामध्ये शक्कल लढवून करण्यात आलेली प्रसुती हे चित्रपटापुरता ठीक आहे. मात्र वास्तवामध्ये अशा स्थिती हाताळणं अत्यंत अवघड आणि धोकादायक असतं. काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात एका महिलेची युट्युब व्हिडिओच्या मदतीने प्रसुती करण्याच्या प्रयत्नामध्ये तिचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित ?
पूर्वीच्या काळी अत्याधुनिक डॉक्टर सेवा, हॉस्पिटल्स उपलब्ध नसल्याने अनेकजण घरच्या घरीच प्रसुती करत असतं. मात्र आता जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये आणि प्रसुतीमध्येही अनेक गुंतागुंत वाढली आहे.

तज्ञाच्या सल्ल्यानुसार अगदीच अपवादात्मक स्थितीशिवाय तज्ञांच्या मदतीशिवाय प्रसुती करणं आरोग्याला धोकादायक आहे. काही कारणास्तव प्रवासादरम्यान प्रसुती करावी लागल्यास तात्काळ नजीकच्या हॉस्पिटल्सची मदत घ्यावी.


जीवावर कशी बेतू शकते घरगुती प्रसुती ?
प्रसुती कशी होईल? किंवा त्यादरम्यान रक्तस्त्राव किती प्रमाणात होईल? याचा आधीपासून कोणालाच अंदाज असू शकत नाही. त्यामुळे घरगुती प्रसुती धोकादायक ठरू शकते. अति रक्तस्त्राव झाल्यास किंवा मानसिक दबाव आणि ताणामुळेदेखील जीव गमावण्याची शक्यता असते.

कधी दिला जातो सिझेरियनचा सल्ला?
आजकाल प्रसुतीकळांचा त्रास आणि लांबणारी प्रसुती टाळण्यसाठी अनेकजणी सिझेरियन प्रसुतीची निवड करतात. मात्र यासोबतच बाळाचं डोकं मोठं असल्यास, आईला किंवा बाळाला काही धोका असल्यास, बाळ नैसर्गिकरित्या बाहेर येण्याची शक्यता कमी असल्यास सिझेरियन पद्धतीने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

नैसर्गिक प्रसुती स्त्री आणि बाळाच्याही आरोग्याला फायदेशीर असल्याने त्यासाठी सुरूवातीपासूनच प्रयत्न करणं अधिक फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात आणि व्यायामात सकारात्मक बदल करणं फायदेशीर ठरते.

Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Renu Vatkar
Dr. Renu Vatkar
MDS, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Sapna Mahajan
Dr. Sapna Mahajan
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Hellodox
x