Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

दारू पिणे चांगले नाही हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो तसेच यात आढळणारे रसायन शरीराला कमजोर करतात. परंतू हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल की दारूने अनेक समस्या दूर होऊ शकतात. लहान-सहान आजार बरे करण्यात दारू उपयोगी ठरते.

रबिंग अल्कोहल ज्याला आइसोप्रोपिल अल्कोहल आणि शल्यक स्पिरिट नावाने ओळखली जाते, ही शरीरावर घासल्याने अनेक फायदे होतात. हे एक प्रभावी, अँटीसेप्टिक, बॅक्टिेरियारहीत आणि क्लीनिंग एजेंटच्या रूपात काम करते.

पिंपल्स दूर करण्यासाठी
त्वचेवरील घाण स्वच्छ करून कापसाच्या बोळ्यात दारू घेऊन पिंपल्सवर लावा. अल्कोहलचे प्रमाण कमी असावे कारण याने स्किन ड्राय होऊ शकते.

ड्राय लिप्स
हिवाळ्यात तर ओठ फाटू लागतात आणि इतर मोसमातही अनेकदा ड्राय लिप्सची समस्या उद्भवते. कित्येकदा तर ओठातून रक्त येऊ लागतं. अशात नमीसाठी अल्कोहल घासणे करणे योग्य ठरेल.

कान स्वच्छ करण्यासाठी
अल्कोहलने कानातील घाणदेखील स्वच्छ करता येते. व्हाईट व्हिनेगर आणि रबिंग अल्कोहल मिसळून या मिश्रणाचे दोन थेंब कानात घालावे.

नखाची फंगस दूर करण्यासाठी
नखांची फंगस दूर करण्यासाठी अल्कोहलमध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याने नखांची हलकी मालीश करावी. नंतर 15 ते 20 मिनिटासाठी असेच राहू द्या. नंतर पाण्याने नखं स्वच्छ करून घ्या.
उवांची समस्या दूर करण्यासाठी

केसांमध्ये उवा असणे फारच लज्जास्पद आहे परंतू दारूने ही समस्याही सोडवली जाऊ शकते. एका टबमध्ये पाणी भरून त्यात थोडी दारू मिसळावी. डोकं उलट करून त्यात केस सोडून 5 ते 10 मिनिट सोडावे. आपल्या केसातील उवा मरून जातील. नंतर शैंपूने केस धुऊन टाकावे. उवांपासून सुटकारा मिळेपर्यंत ही प्रक्रिया आठवड्यातून किमान एकदा तरी अमलात आणावी.

सॅनेटाइझरचे काम
ज्या प्रकारे साबण किंवा पाण्याविना सॅनेटाइझरने हात स्वच्छ होतात याच प्रकारे रबिंग अल्कोहलचा उपयोग केला जाऊ शकतो. याने हात चोळल्याने हाताचे बॅक्टिेरिया नष्ट होतात.

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.

फळांचे सरबत :- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- सर्वांचा रस काढून घ्या. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्या. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयत्यावेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते. त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.

खस सरबत :- साखर आणि पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इन्सेस आणि रंग घाला. पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.

अननसाची लस्सी
साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, वेलची पूड, किंचित साखर
कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .

कैरीचे पन्हे :
कैरीची साले काढून किसून घ्या. थंड पाण्यात कुस्करून गाळून घ्या. त्यात साखर वेलचीपूड टाका. किंचित मीठ आणि बर्फ घालून प्यायला द्या

चिंचेचे सरबत !
वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी आणि चिंच काढून घ्यावी. चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप आणि जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.

आपले वय जसे वाढत जाते तसे शरीर थकत असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक असते. वयोमानानुसार आहारात बदल केल्यास तुमचे आरोग्य नक्कीच जास्त चांगले राहू शकते. वयानुसार शरीराच्या गरजा, त्याना आवश्यक असणारे पोषण हे वेगवेगळे असते. २० व्या वर्षी खात असलेले पदार्थ आपण ६० व्या वर्षी खाऊ शकूच असे नाही. त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले पाहूयात…

वय वर्षे २०

या वयात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली असते. त्यामुळे या वयात आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्याच तर हे तरुण त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. या काळात हाडे आणि मांसपेशी वेगाने तयार होत असल्याने या काळातील आहार अतिशय महत्त्वाचा असतो. या वयात आपले शरीर सूपर अॅक्टीव्ह असल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट यांची आवश्यकता असते. त्यामुळे दाणे, सुकामेवा, फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक यांचा आहारात आवर्जून समावेश ठेवावा.

वय वर्षे ३०

या वयात करीयर, नोकरी, लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या व्यक्तीवर आलेल्या असतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिकही अनेक बदल होतात. या काळात आपण जीवन स्थिरस्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. या काळात आपले प्राधान्यक्रम बदललेले असल्याने आपल्यावर बरेच ताण असतात. अशा काळात शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारे अंडे, शहाळे, ऑलिव्ह ऑईल, पालेभाज्या, फळे, कमी स्निग्धता असलेले दुग्धजन्य पदार्थ खावेत.

वय वर्षे ४०

या काळात आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा आपण गाठलेला असतो. जीवनातील बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. यानंतर आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिझम, लोहाची कमतरता, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे दुखणे अशा तक्रारी कमी जास्त प्रमाणात सुरु झालेल्या असतात. या काळात व्यक्तीची पचनशक्ती काही प्रमाणात बिघडलेली असते. तसेच वजन नियंत्रणात राखणे हे एक आव्हान झालेले असते. त्यामुळे या काळात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर सगळ्या भाज्या खाव्यात. तसेच आहारात लसूण, कांदा, हळद, ऑलिव्ह ऑईल असे हृदयाला तंदुरुस्त ठेवणारे पदार्थ खावेत. ओमेगा ३ या काळात अतिशय उपयुक्त ठरते.

वय वर्षे ५०

मागची इतकी वर्षे धावपळ केल्यानंतर या काळात शरीर बोलायला लागलेले असते. या काळात हाडे आपले अस्तित्त्व दाखवायला लागतात. तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्यानंतर अचानक जळजळायला लागते. दात दुखतात, केस पांढरे होतात. त्यामुळे या काळात आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात फायबर, झिंक, प्रोटीन, व्हीटॅमिन बी, अंडी, कडधान्ये जास्त प्रमाणात खायला हवे. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे.

युटिलिटी डेस्क: मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते. हे पिण्याचे खुप फायदे आहे मात्र यामध्ये आढळणारे पोषकांमुळे हे काही लोकांनी प्यायलाच हवे.

आयुर्वेदिक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, मोसंबीचा उपयोग पोषक आहाराच्या रूपामध्ये होतो. 15 दिवसांपर्यंत फ्रिजच्या बाहेर ठेवले जावू शकते. हे लिंबूच्या प्रजातीचेच फळ आहे. मात्र, हे त्याहून अनेक पट्टींने लाभदायक मानले जाते. या ज्यूसला जर कमीत कमी साखरेशिवाय किंवा विना पाण्याविना घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. साखर टाकल्याने त्यामधील कॅलोरीजची क्वांटिटी वाढते. पोटदुखी, त्वचा संबधी आजार, सांधेदुखी ने पिडित लोकांनी प्यायला हवे. याने अपचनाचा विकारही दुर पळवला जावू शकतो.

मुंबई : पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.

हे आहेत पालकाचा रस पिण्याचे फायदे
पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.

पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.

त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.

गर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.

पालकाचा रस बनवण्याची कृती
पालकाचा रस बनवण्यासाठी पालक आणि पुदिन्याची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात पाणी, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.

Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Udaya Sahoo
Dr. Udaya Sahoo
MBBS, General Medicine Physician General Physician, 49 yrs, Khordha
Dr. Jalpa Desai
Dr. Jalpa Desai
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 6 yrs, Pune
Hellodox
x