Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Exercise :
Do you know the benefits of exercise? Exercise is any bodily activity that maintains and enhances you physical fitness and overall health and wellness. So what are you waiting for? Start preparing exercise charts suitable for you under guidance of experts on HelloDox Health App.

मुंबई : काही विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलांच्या उंचीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या वयाच्या टप्प्यावर मुलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलांच्या शरीराच्या वाढीकडे नीट लक्ष देणं गरजेचे ठरते.

मुलांची उंची वाढण्यासाठी काय कराल ?
कॅल्शियम घटक
मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या आहारत कॅल्शियम घटकांचा मुबलक प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे. कॅल्शियममुळे हाडांचा विकास होतो. याकरिता आहारात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

व्यायाम
व्यायाम आणि प्रामुख्याने योगाभ्यास केल्यानेही वजन आणि उंची दोन्ही वाढवणं शक्य आहे. लटकण्याचा व्यायाम करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. सोबतच भुजंगासन केल्यानेही उंची वाढण्यास मदत होते.

वाकून बसणं, चालणं टाळा
वाकून बसणं किंवा चालणंदेखील टाळा. यामुळे शरीराचा बांधा झुकलेला दिसतो. चालताना, बसल्यावर झुकून बसणं, चालणं टाळा. ताठ राहिल्यानं व्यक्तिमत्त्वही उठावदार दिसतं सोबतच शरीराची उंची उत्तम दिसते.

योग्य प्रमाणात खाणं
उंची वाढण्यासाठी शरीरात ग्रोथ हार्मोन्सची वाढ होणंही गरजेचे आहे. याकरिता नियमित आणि थोड्या थोड्या वेळानं खाणं गरजेचे आहे. दिवसातून किमान 5-6 वेळेस खाणं आवश्यक आहे.

अश्वगंधा
तुम्हांला उंची वाढवायची असेल तर आहारात अश्वगंधाचे सेवन करणं आवश्यक आहे. अश्वगंधामध्ये अनेक मिनरल्स घटक असतात, त्याच्या नियमित सेवनाने उंची वाढायला मदत होईल.

संतुलित आहार
नियमित संतुलित आहाराच्या सेवनामुळे उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे कितीही जंकफूड खाण्याचा मोह होत असला तरीही त्यावर आवर घाला आणि आहारात नियमित संतुलित जेवणाचा समावेश करा.

व्हिटॅमिन डी
उंची वाढवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशातून शरीराला नैसर्गिक स्वरूपात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. सकाळ - संध्याकाळ किमान 20-30 मिनिटं कोवळ्या उन्हात फिरा.

आवळा
उंची वाढवण्यासाठी आवळ्याचं नियमित सेवन करणं आरोग्यदायी ठरते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराचा विकास होण्यास, उंची वाढण्यास मदत होते.

लंडन : व्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील लंडन येथील किंग्ज महाविद्यालय येथील संशोधकांनी विविध ४९ अभ्यासातून मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण केले.

व्यायाम केल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो का यासाठी अभ्यासात मानसिकरीत्या निरोगी व्यक्तींचा समावेश करण्यात आला. अभ्यासात २६६,९३९ व्यक्तींचा समावेश होता. यात ४७ टक्के पुरुषांचा समावेश असून त्यांचा सरासरी ७.४ वर्षे अभ्यास करण्यात आला. माहितीचे विश्लेषण केल्यानंतर व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये भविष्यात नैराश्य विकसित होण्याची शक्यता कमी असते.

विविध भौगोलिक क्षेत्रातील (उदा. युरोप, उत्तर अमेरिका) युवा आणि वृद्धांमध्ये नैराश्य आल्यास व्यायामाचा त्यावर संरक्षणात्मक परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी होतो हे जाणून घेण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचे मेटा-विश्लेषण करण्यात आले आहे, असे ब्राझीलमधील ला सॅले विद्यापीठातील फेलिप बॅरेटो शूच यांनी सांगितले.

जे लोक नियमित व्यायाम करतात किंवा शारीरिकदृष्टय़ा जास्त सक्रिय असतात त्यांच्यामध्ये नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले असल्याचे शूच यांनी सांगितले. हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ सायकियाट्री या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एक दशलक्ष चतुर्थाश लोकांवर केलेल्या विश्लेषनात शारीरिकदृष्टय़ा सक्रिय लोकांमध्ये भविष्यात नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी असल्याचे सातत्यपूर्ण पुरावे आमच्यासमोर आले आहेत. व्यायामाचा सगळय़ाच वयोगटातील लोकांवर नैराश्याविरुद्ध संरक्षणात्मक परिणाम होतो.

धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात सध्या सर्वात आवश्यक असूनही मागे राहणारी कोणती असेल तर ती म्हणजे व्यायाम.

उठल्यावर आवरुन ऑफीसला पोहचतानाच अनेकांच्या नाकात दम येत असेल तर ही जिम करणार कधी. रात्री ऑफीसमधून सुटण्याच्या वेळाही उशीराच्या असल्याने व्यायामाला वेळ नाही ही सर्रास केली जाणारी तक्रार. यावर मार्ग काढण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या ऑफीसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी जिम उपलब्ध करुन दिली.

त्यामुळे वेळेची तक्रार करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय तयार झाला हे नक्की. आता दिवसभरात आपल्याला जमेल त्या वेळात २० मिनिटे जरी व्यायाम केला तरी चालतो असे सांगणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

पण अशाप्रकारे जिममध्ये केलेला व्यायाम आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतो का हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

ऑफिसमधल्या जिममुळे आरोग्य चांगले होण्यास मदत होत नाहीच पण पैसेही विनाकारण वाया जातात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली असून पाहूयात ऑफिसमधल्या जिमबाबतची तथ्ये…

– या सर्वेक्षणासाठी एकूण ३३०० कर्मचाऱ्यांचा अभ्यास कऱण्यात आला. या कर्मचाऱ्यांची त्यांच्या तब्येतीनुसार तसेच त्यांना हव्या असलेल्या व्यायामप्रकारा ६ गटामध्ये विभागणी करण्यात आली होती.

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी पोटाचा वाढता घेर किंवा लठ्ठपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांसाठी महत्त्वाची समस्या असणाऱ्या या लठ्ठपणावर मात करण्यासाठी मग वेगवेगळे उपाय अवलंबले जातात. आहारात केलेले बदल, जिमला जाणे, बाजारात मिळणारी सप्लिमेंटस वापरणे असे उपाय अवलंबले जातात. पण जीवनशैलीत काही ठराविक गोष्टींचा अवलंब केला तरीही वाढलेल्या कॅलरीज घटण्यास मदत होते. पाहूयात कोणत्या गोष्टीं केल्यास त्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात…

व्यायाम करा

व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज जळण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळ विशिष्ट व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना शरीरावर वाढलेली चरबी घटविण्यासाठी अशाप्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असते. तुमचे स्नायू जितके कमजोर असतील तितकी तुम्हाला अधिक व्यायाम करण्याची आवश्यकता असते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

न्याहरी चुकवू नका

सकाळची न्याहरी करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. अनेकदा कामाच्या गडबडीत किंवा ऑफीसला जाण्याच्या घाईत ती करणे राहून जाते. पण असे केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही खाण्यापेक्षा सकाळची न्याहरी सर्वात जास्त महत्त्वाची असते.

भरपूर चाला

चालणे हा शरीरात वाढलेल्या कॅलरीज घटविण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतो. नियमित चालल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि घामाद्वारे कॅलरीज शरीराबाहेर पडायला मदत होते. म्हणून नियमितपणे अर्धा तास चालणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. विशेष करुन रात्रीच्या जेवणानंतर रोज अर्धा तास चालणे खाल्लेले अन्न पचण्यास मदत करते, त्यामुळे नकळत कॅलरीज जळण्यास मदत होते.

पुरेसे पाणी प्या

शरीराचे सगळे कार्य सुरळीत चालण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. पाण्यामुळे रक्ताभिसरण तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते. शीतपेये पिणे म्हणजे शरीरात पाणी जाणे असे होत नाही, त्यामुळे पाणी कॅलरीज जळण्यासाठी आवश्यक असतात. यामुळे शरीरात तयार झालेल्या टॉक्सिन्सचा विनाश होण्यास मदत होते.

वेळेवर झोपा

रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही रात्री वेळेत झोपल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे रात्री लवकर झोपावे. ‘लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे’ अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे.

Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Nikhil N  Asawa
Dr. Nikhil N Asawa
MDS, Implantologist Prosthodontist, 6 yrs, Pune
Dr. Mahendra Sahu
Dr. Mahendra Sahu
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Hellodox
x