Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Exercise :
Do you know the benefits of exercise? Exercise is any bodily activity that maintains and enhances you physical fitness and overall health and wellness. So what are you waiting for? Start preparing exercise charts suitable for you under guidance of experts on HelloDox Health App.

वर्कआउटचे वेगवेगळ्या पद्धती लोक आजकाल करु लागले आहेत. बराचवेळ ते जिममध्ये घालवू लागले आहेत. पण मांसपेशींसाठी वर्कआउट करत असाल तर पायऱ्या चढणे सर्वात चांगला पर्या आहे. ६ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे की, १ तास जिममध्ये घाम गाळण्याने तुम्हाला जितका फायदा मिळतो, तितकाच तुम्हाला १५ मिनिटे पायऱ्या चढल्याने मिळू शकतो. सर्व्हेनुसार, तुम्ही जर रोज केवळ एका माळ्यावर पायऱ्यांनी घरी किंवा ऑफिसला जात असाल तर ही एक्सरसाइज तुमच्या अर्धा किलोमीटर ट्रेडमीलवर चालण्यासारखीच होईल. जर तुम्ही २ ते ३ वेळा पायऱ्या चढलात आणि उतरलात तर तुम्हाला यानंतर जिम जाण्याचीही गरज पडणार नाही.

इंस्टंट एनर्जी

पायऱ्या चढल्याने लगेच एनर्जी मिळते, जी जिममध्ये ५ ते ७ मिनिटे एक्सरसाइज करण्याच्या बरोबर असते. इतकेच नाही तर पायऱ्या चढण्या-उतरण्याने हृदय आणि फुफ्फुसांसाठीही फायदेशीर ठरतं. तज्ज्ञ सांगतात की, पायऱ्या चढणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे. इतकेच नाही तर संपूर्ण शरीराच्या फिटनेससाठीही पायऱ्या चढणे फार फायदेशीर आहे. यानंतर तुम्हाला सांधेदुखी, हाडांचं दुखणं अशा समस्या होत नाहीत.

हार्मोन्स होतात सक्रीय

पायऱ्या चढण्या-उतरण्याने एड्रेनलिन हार्मोन सक्रीय राहतात. या हार्मोन्समुळे हृदयाच्या मांसपेशीपर्यंत ब्लड सर्कुलेशन आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यासाठी फार फायदा होतो.

पायऱ्या वर चढून जाताना शरीराचा ७०-८५ डिग्री असा अँगल तयार होतो. अशाप्रकारे शरीराचं वाकणं एक चांगली आणि फायदेशीर कार्डियो एक्सरसाइज आहे. याद्वारे एका तासात जवळपास ७०० कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही ट्रेडमिलवर धावाल तर तुम्ही एका तासात केवळ ३०० कॅलरी बर्न करु शकता.

मानसिक आरोग्याला फायदा

पायऱ्या चढण्याची एक्सरसाइज केल्याने मसल्समध्ये फॅट जमा होत नाही आणि शरीर व्यवस्थित शेपमध्ये राहतं. याने तणाव दूर करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यासही मदत मिळते. असं नियमीत केल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळते. तसेच रोजची कामे करण्यासाठी फोकस करण्यासही मदत होते.

सवय करा

अनेकदा लोक पहिल्याच दिवशी जास्त पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना जास्त थकवा आणि पायांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन दिवस ३ ते ४ मजले पायऱ्यांनी चढून जाण्यापेक्षा हळूहळू ही संख्या वाढवा. पायऱ्या चढण्याची ही सवय तेव्हाच फायदेशीर ठरु शकते, जेव्हा तुम्ही हे नियमीत कराल. १५ दिवस किंवा एक महिना करुन ही एक्सरसाइज सोडली तर तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे या एक्सरसाइजला रुटीनचा भाग करा.

कोणत्या वयातील लोकांनी करावी एक्सरसाइज

ही एक्सरसाइज १२ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत कुणीही करु शकतात. यात व्यक्तीला त्यांची पूर्ण एनर्जी लावावी लागते. तसेच यासाठी ना तुम्हाला पैसे खर्च करावे लागत ना कोणत्या साहित्याची गरज पडत. फिट राहण्यासोबतच या एक्सरसाइजचा फायदा हा आहे की, ही एक्सरसाइज हृदयरोग आणि डायबिटीजचे रुग्ण सहजपणे करु शकतात. हृदयरोगाने ग्रस्त लोकांना जड एक्सरसाइज न करण्याचा सल्ला दिला जातो, पण हळूहळू पायऱ्या चढणे कोणत्याही रुग्णांसाठी परफेक्ट एक्सरसाइज आहे.

सध्या मुंबईकरही डिसेंबर महिन्यातील हवीहवीशी वाटणारी थंडी अंगावर घेत सकाळी ल लवकरच आपल्या कामाला सुरुवात करताना दिसत आहेत. कामाला जायची घाई नसेल तर काही जण घरीच आपल्या शरीराला थोडा ताण देत व्यायाम करून आपला आळस झटकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शारीरिर थकव्यासोबत मानसिक थकवाही अनेकांना जाणवतो... हा थकवा दूर करायचा सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम... पण, काही जणांना थंडीच्या दिवसांत जीममध्ये जाण्याचं सोडाच घरीही व्यायाम करण्याचा कंटाळा आलेला दिसतो... आणि अर्थातच त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. पण, तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर त्याचा परिणामही तुमच्या चेहऱ्यावर आणि उत्साहात दिसून जाणवेल.

पण, मग व्यायाम करण्याचा अ्नेक जण कंटाळा का करतात? आणि हा कंटाळा कसा टाळता येईल? हे पाहुयात...

- व्यायाम करतानाही तुम्ही तोच तोच व्यायाम करत असाल तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही कल्पकतेनं तुमच्या व्यायामाच्या प्रकारांत मजा आणू शकता... रुटीनमध्ये थोडा बदल ठेवा... चालायला जात असाल तर कधी जॉगिंग करून बघा. जाण्याचा रस्ता बदला. जिममध्येही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामप्रकार ट्राय करा. एखाद्या दिवशी तुम्ही फक्त डान्स करा.


- व्यायामामागे एखादी प्रेरणा असायला हवी. व्यायामाचे नेमके उद्दिष्ट असायला हवे. समोर व्यायामाचे नेमके उद्दिष्ट नसेल तर कंटाळा येणारच. त्यामुळे तुम्ही व्यायाम का करताय, हे ठरवा. वजन कमी करायचं असेल तर ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला एखाद्या हिरोइनसारखी फिगर हवी असेल तर त्याबद्दल विचार करा. तुमच्यासमोर ध्येय असेल तर तुम्ही ते साध्य करण्यासाठी प्रयत्न कराल.

- व्यायामासाठी सोबत शोधा. एखाद्या मैत्रिणीला पटवून तिला जीम जॉईन करायला सांगा. दोघी एकत्र गेलात तर व्यायामालाही मजा येईल आणि एकमेकंच्या सोबतीने व्यायामही सुरू राहील. वॉकला जाताना तुम्ही कोणाला तरी सोबत नेऊ शकता. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला वेळ असेल तर त्याच्यासोबतही तुम्ही व्यायामाला जाऊ शकता.

आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, अगदी छोट्या छोट्या गोषींतूनही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता. जसे की, सायकल चालवणे. तुम्ही जर नियमितपणे सायकल चालवत असाल तर, तुम्ही मिळवू शकता आरोग्यदाई भरपूर फायदे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे.

हृदय: नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

झोप: ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक उत्कृष्ठ उपाय आणि व्यायामही आहे. शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.


कॅन्सर : फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.

लठ्ठपणा: जर तुमचे वजन वाढत असेल. तर तुम्ही नियमितपणे सायकल चालवा फायदा होईल.

गर्भावस्था: गरोदर स्त्रीने गर्भावस्तेच्या अगदी सुरूवातीच्या काळात जर सायकल चालवली तर चांगला व्यायम होतो. त्यामुळे प्रसुतीकाळात होणारा त्रास कमी होतो.

बुद्धी: नियमित सायकल चालवल्याने शरीराला व्यायम मिळतो पण, आपल्या विचारांनाही चालना मिळते. त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर राहते. विचारांच्या कक्षा रूंदावतात. बुद्धी वाढते असा दावा संशोधक करतात.

रोगप्रतिकारक क्षमता: सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

आपली शरीरयष्टी चांगली दिसावी यासाठी अनेक तरुण व्यायामशाळेत घाम गाळत असतात. नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप, योग्य आहार यामुळे ते काही महिन्यात चांगली शरीरयष्टी कमावतात पण यावरच त्यांचं समाधान होत नाही. आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.

आहाराकडे लक्ष

बॉडीतील नसं दिसतायत का ? यावरूनही चर्चा करणारे अनेकजण असतात. सिनेमांमध्येही हिरोने टी शर्ट काढल्यावर त्याच्या शरीरावरील नसं दिसतात. त्यामुळे या तरुणांची इच्छाशक्ती अधिक दृढ होते. अस शरीर कमावण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेच आहे. याबद्दल आपण जाणून घेवूया...

सोडियम सेवन वर्ज्य

सोडियमचे सेवन शरीरात वॉटर रिटेंशनच कारण बनतं. वॉटर रिटेशनमुळे आपल्या नसं अस्पष्ट दिसतात. त्यामुळे जेवणातही कमी मीठाचा उपयोग करणं गरजेच आहे.

स्नायू बनवा

शरीरयष्टी कमावताना तुमच्या आहारासोबतच तुम्हाला स्नायूंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्नायू हे प्रोट्युडिंग वेन्स तयार करतात.

खूप पाणी प्या

शरीरात मुबलक पाणी गेल्यास स्नायू हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्याचा खूप फायदा होतो. शरीरातील पाणी टॉक्सिंसला फ्लश करते यामुळे बाइसेप्सच्या नस स्पष्टपणे दिसतात.

एकाच जागी सतत बसून राहणे हे सर्वच दृष्टीने हानिकारक आहे. आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे की तुम्ही चालू लागला की तुमचे दैवही चालू लागते, धावू लागला की धावू लागते आणि तुम्ही बसला की तुमचे दैवही बसकण मारते! आरोग्याबाबात तर ही गोष्ट अक्षरक्ष: सत्य आहे.

आता ब्रिटिश संशोधकांनी म्हटले आहे की चालण्याने केवळ आरोग्यच सुधारत नाही तर आयुर्मानही वाढते. तुम्ही दरररोज 25 मिनिटे चालतात, तर तुमे आयुष्य सात वर्षांनी वाढते. हृदय रोगाचे सध्या प्रमाण खूपच वाढलेले असून 50 ते 60 वयोमानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ब्रिटनमध्ये तर हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रत्येक सात सेकंदात या देशात एकाचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे चालणे, असे या संशोधकांनी सांगितले. यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी मध्ये या संशोधकांनी आपला संशोधनावर अहवाल सादर केला. या संशोधकांनी 30 ते 60 वयोगटांतील 69 व्यक्तींची तपासणी केली. त्यांना दररोज चालण्याचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले.

Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Pramod Bhimrao Patil
Dr. Pramod Bhimrao Patil
BAMS, 10 yrs, Pune
Hellodox
x