Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Exercise :
Do you know the benefits of exercise? Exercise is any bodily activity that maintains and enhances you physical fitness and overall health and wellness. So what are you waiting for? Start preparing exercise charts suitable for you under guidance of experts on HelloDox Health App.

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. पण पावसाळ्यामध्ये मात्र अनेकांना जिमला जाणं शक्य होत नाही. तर अनेकदा जॉगिंग करणंही शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्सून वर्कआउट टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमची वेळ वाचण्यासोबतच तणावही दूर होण्यास मदत होते.

पावसाळ्याचं आनंददायी वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तसेच पावसाळ्यातील आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची सर्व समस्यांपासून सुटका होते. खाली सांगितलेल्या मान्सून स्पेशल वर्कआउट टिप्स तुम्हाला पावसाळ्यात फिट आणि फाइन ठेवण्यासाठी मदत करतील.

मानसून वर्कआउट टिप्स (Monsoon workout tips)

प्लॅन करा

मान्सूनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करणं आवश्यक आहे. तसेच वर्कआउट करण्यासाठी खास नियमावली करणंही फायदेशीर ठरेल. त्यानुसार तुम्ही कमीत कमी 45 मिनिटांचा अवधी वर्कआउट करण्यासाठी राखून ठेवणं गरजेचं असतं.

स्ट्रेचिंग

पावसाळ्यामध्ये जिममध्ये जाणं शक्य झालं नाही तर, घरच्या घरी स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाला सुरुवात करू शकता. त्यामुळे शरीराचा वॉर्मअप होण्यास मदत होते. त्यानंतर 5 मिनिटांसाठी स्पॉट जॉगिंग करा. जॉगिंग जाल्यानंतर 15 मिनिटांसाठी कार्डियो एक्सरसाइज करू शकता. त्यामुळे हृदयाची गती वाढून शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.

सोपे व्यायामाचे प्रकार करा

शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या, पायऱ्यांची चढ-उतार, उड्या मारणं आणि जंपिंग जॅक यांसारखे व्यायाम तुम्ही करू शकता. असं केल्याने शरीराचे सांधे मजबूत होण्यासोबतच शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.

स्क्वाट वाढवतील लवचिकता

20 स्क्वाट, 20 लंग्स आणि 20 पुशअप्स आलटून-पालटून 3 ते 4 वेळा करा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे सेट 2 ते 4 वेळा पुन्हा करू शकता.

घरी डंबेल्स असणं ठरतं फायदेशीर

जिममध्ये एक्सरसाइज करण्याव्यतिरिक्त काही व्यायाम उपकरणं घरी ठेवणं फायदेशीर ठरतं. डंबेल्स, स्किपिंग रोप, रेसिटेंस ट्यूब इत्यादी. याव्यतिरिक्त जमिनिवर करण्यात येणाऱ्या प्लांक, क्रंचेज आणि लेग रेज यांचाही अभ्यास करा.

योगाभ्यास ठरतो फायदेशीर

योगाभ्यास तुम्ही घरात किंवा घराच्या बाहेरही करू शकता. योगाभ्यासातील काही सोप्या आसनांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. तसेच योगाभ्यासामुळे श्वसनासंबंधातील समस्यांपासूनही सुटका होते.

टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

फिटनेससाठी जिममध्ये जाणं कोणतीही नवीन गोष्ट नाही. परंतु याबाबत अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच मनात येतात. त्यातील एक कॉमन प्रश्न म्हणजे, अनोशापोटी किंवा रिकाम्यापोटी एक्सरसाइज करावी की नाही? आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणर आहोत. जाणून घेऊया अनोशापोटी एक्सरसाइज केल्याने होणारे फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टींबाबत...

रिकाम्यापोटी एक्सरसाइज करण्याचे फायदे :
काहीही न खाता एक्सरसाइज करण्याचे काही फायदे आहेत. जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारे लाभदायक ठरू शकतं.

1. फॅट लवकर बर्न करण्यासाठी होते मदत
रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने शरीरामध्ये असणारे फॅट्स लवकर बर्न होण्यासाठी मदत होते. अने तज्ज्ञांच्या मते, यादरम्यान आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते. अशावेळी शरीर फॅट्स बर्न करून एनर्जी प्रोड्यूस करतं.

2. पचनक्रिया सुधारते
रिकाम्यापोटी एक्सरसाइज केल्याने शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फास्टिंग दरम्यान वर्कआउट केल्याने वजन कमी होतं आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

3. शरीराची ऊर्जा वाढवतं
अनोशापोटी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट्स वेगाने बर्न होण्यास मदत होते. एवढचं नाही तर शरीर लो ब्लड लेव्हलमध्ये काम करण्यासाठी तयार होतं. यामुळे तुमची वर्कआउट करण्याची क्षमता वाढते.

4. डोकं शांत राहतं
काहीही न खाता वर्कआउट केल्याने शरीरामध्ये ग्लूकोज कमी होतं. याची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर Hypoglycemia प्रोड्यूस करतं. जे मेंदूसाठी फायदेशीर ठरतं.

रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने होणारं नुकसान :
ज्याप्रमाणे रिकाम्यापोटी व्यायाम करण्याचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे असं करण्याचे काही तोटेही आहेत.

1. वर्कआउट करण्याची क्षमता कमी होते
अनोशापोटी वर्कआउट केल्याने शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण कमी होते. यानंतर शरीरकडे फॅट्स बर्न करून ऊर्जा प्रोड्यूस करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. त्यामुळे याचा वर्कआउट करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. परिणामी तुम्हाला लगेच थकवा जाणवतो.

2. Muscles कमी होतात
बरेच दिवस अनोशापोटी व्यायाम केल्याने तुमच्या Muscles कमी होतात. त्यामुळे अनेकदा तज्ज्ञ यापासून बचाव करण्यासाठी एक्सरसाइज करण्याआधी 30 मिनिटं आधी प्रोटीन खाण्याचा सल्ला देतात.

3. After burn ची समस्या होऊ शकते
काहीही न खाता वर्कआउट केल्याने After burn ची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शरीर एक्सरसाइजनंतरही अधिक कॅलरी बर्न करू लागतं आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

जिम जाणाऱ्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, जिमला जाण्याआधी काही खावं किंवा खाऊ नये? सगळ्यांनाच शरीराला पोषण आणि वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळावी असं वाटत असतं. पण अनेकदा चुकून अशा काही गोष्टी खाल्ल्या जातात की, त्याचा आपण आजारी पडू शकतो किंवा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असते. अनेकांना हे माहीत असतं की, जिमला जाण्याआधी काय खावं, पण अनेकांना हे माहीत नसतं की, जिमला जाण्याआधी काय खाऊ नये. तर आज आम्ही तुम्हाला जिमला जाण्याआधी काय खाऊ नये हे सांगणार आहोत.

दूध आणि दुधापासून तयार पदार्थ

वर्कआउट करण्याआधी दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ जसे की, दही आणि लस्सी इत्यादींपासून दूर रहावे. दूध हे कॅल्शिअमचं मोठं स्त्रोत आहे. पण दुधात लॅक्टोजही असतं. त्यामुळे वर्कआउटआधी दुधाचं सेवन केल्याने आतड्यांना नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ वर्कआउट करण्यापूर्वी सेवन करू नये.

तळलेले-भाजलेले पदार्थ

जिममध्ये जाण्याआधी तळलेले किंवा भाजलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यांमध्ये अतिरिक्त फॅट असतात जे आतड्यांवर दबाव टाकतात. याने तुम्हाला डायरिया, पचनाची समस्या आणि आतड्यांसंबंधी समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे वर्कआउटआधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.

फ्लॉवर

फ्लॉवर किंवा ब्रोकलीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, पण यात सल्फरही असतं. ज्यामुळे काही लोकांना गॅसची समस्या होत असते. त्यामुळे वर्कआउटआधी फ्लॉवर किंवा ब्रोकलीचं सेवन करू नका.

सोडा

जिममध्ये जाण्याआधी सोडा किंवा त्यापासून तयार पदार्थांचं सेवन करणे टाळावे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. सोड्यामुळे गॅसची समस्या होते. याने तुम्हाला वर्कआउट करताना अडचण येऊ शकते.

गोड पदार्थ टाळा

जिमला जाण्याआधी गोड पदार्थ खाणेही टाळावे. कारण यात असलेल्या एक्स्ट्रा शुगर, फॅट आणि बटरमुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला वर्कआउट करताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वर्कआउटआधी कधीही गोड पदार्थ खाऊ नये.

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं. यामुळे एक्सरसाइज करणं आवघड होतं. जास्त घाम आल्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. अशावेळी जर एक्सरसाइज केली तर तुम्ही आजारीही पडू शकता. काही लोक जास्त उकाड्यामुळे एक्सरसाइज करण्याचं टाळतात. यामुळे त्यांची फिटनेस खराब होते. फिट रहायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइजही गरजेची आहे. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यातही आरामात एक्सरसाइज करू शकता.

सकाळी एक्सरसाइज करा

प्रयत्न करा की, तुम्ही सकाळी 6 वाजताच तुमचं वर्कआउट करून घ्याल. बाहेरील तापमान 8 ते 9 वाजेपर्यंत फार गरम होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून एकसरसाइज करून घ्या. त्यामुळे दिवसभराची सर्व आवश्यक काम आटपू शकता.

एक्सरसाइजनंतर आंघोळ करू नका

काही लोक एक्सरसाइज केल्यानंतर लगेच बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात. परंतु एक्सरसाजनंतर काही वेळ आराम करणं गरजेचं असतं. जेणेकरून शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होईल. जवळपास एक तासानंतर आंघोळ करणं ठिक आहे.

पाणी भरपूर पिणं असतं गरजेचं

उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना फार घाम येतो. एक्सरसाइज करताना मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. त्यानंतर एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करताना मध्येच तहान लागली तर पाणी प्या. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही.

एनर्जी ड्रिंक पिणं टाळा

व्यायाम करताना एनर्जी ड्रिंकचं सेवन करणं शक्यतो टाळा. एनर्जी ड्रिंक्समध्ये ग्लूकोज अधिक असतं. जे शरीरामध्ये जाऊन एनर्जीमध्ये कनवर्ट होतं. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी किंवा बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी एक्सरसाइज करत असाल तर शरीरामध्ये जमा झालेल्या फॅट्सऐवजी शरीर एनर्जी ड्रिंक्समधून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करतात. त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइजचा पूर्ण फायदा मिळणार नाही. तुम्ही एनर्जी ड्रिंकऐवजी पाणी पिऊ शकता.

सैल कपडे परिधान करा

जिम असो किंवा घर, कधीही टाइट कपडे वेअर करून वर्कआउट करू नका. सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिदान करा. कपडे शरीराला चिकटल्यामुळे प्रचंड उकडतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना सैल आणि घाम लवकर सुकेल असे कपडे वेअर करा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.

अनेकजण आपल्या धावपळीच्या दिनक्रमामधून थोडासा वेळ सकाळी वॉक घेण्यासाठी काढतात. अशातच वातावरणातील वाढता उकाडा वाढल्यामुळे सकाळी वॉकसाठी जाणं नकोसं वाटतं. अशातच उन्हाळ्यामध्ये सकाळी वॉक घेण्याऐवजी संध्याकाळी वॉक घेणं जास्त सोयीस्कर असतं, असा विचार आला किंवा असं कोणी सांगितलं तरि अनेकजण त्या व्यक्तीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात. पण खरचं संध्याकाळची वेळ फिरण्यासाठी व्यवस्थित ठरते का? बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांचा दिनक्रम पूर्णपणे बदलून गेला आहे. सध्या लोक सकाळी उठल्यानंतरही ऑफिस किंवा आपल्या कामाचा विचार करतात. त्यामुळे ते दिवसभरामध्ये कोणतंही वर्कआउट करू शकत नाहीत.

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनातून याबाबत एक खुलासा करण्यात आला होता की, संध्याकाळी 6 ते 7 ची वेळ शरीराचा वर्कआउट करण्यासाठी सर्वात उत्तम असते. जाणून घेऊया याबाबत काही खास गोष्टी...


एक्सरसाइजसाठी उत्तम वेळ

जर तुम्ही दिवसभराच्या कामानंतर थकला असाल आणि हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं तुमच्यसाठी शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही वॉक करू शकता. यामुळे तुम्ही स्वतःला अगदी सहज फिट आणि हेल्दी ठेवू शकता. एवढचं नाही तर यामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते.

आराम मिळतो

दिवसभर कम्प्यूटरवर काम केल्यामुळे मसल्सला एक्सरसाइज करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. परंतु, इव्हनिंग वॉकमार्फत तुम्ही असं करू शकता. ज्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी अर्ध्या तासासाठी संध्याकाळच्या वेळी वॉक घेणं आवश्यक असतं.

शांत झोप

शरीराचा थकवा घालवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शांत झोप गरजेची असते. तुम्हाला शांत झोप मिळण्यासाठी संध्याकाळी घेतलेला वॉक फार फायदेशीर ठरतो. कारण यामुळे तुम्हाला तणाव जाणवत नाही.

पचनसंस्था सुरळीत होण्यासाठी

जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर वॉकसाठी जाता. त्यावेळी तुम्हाला खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी मदत होते. दरम्यान एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की, जेवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी वॉकसाठी जा.

रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी

तुम्हाला कदाचित याबाबत माहिती नसेल की, संध्याकाळी वॉक केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. दरम्यान संध्याकाळी वॉक घेतल्याने शरीरातील सर्व अवयवांचा आराम होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यासाठी मदत होते.

Dr. Shilpa Jungare Tayade
Dr. Shilpa Jungare Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 8 yrs, Pune
Dr. Smita Darshankar
Dr. Smita Darshankar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Ravindra Borade
Dr. Ravindra Borade
BAMS, Allergist Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. S K  Toke
Dr. S K Toke
DNB, Pulmonologist General Physician, 11 yrs, Pune
Hellodox
x