Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Breast Related :
Breast health begins with a sense of what's normal for your breast. Breast health includes concerns about breast lumps, breast pain or nipple discharge. For Breast health you can consider doing regular breast self-exams. So be 'breast aware' by following expert’s articles on Hellodox Health App.

स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सर हा आजार दुर्धर असल्याने तसेच त्यावरील उपचारही प्रचंड वेदनादायी असल्याने रूग्ण केवळ त्याच्या नावानेही घाबरतात. मात्र आता ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी केमोथेरपीचीही गरज नसल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

काय आहे नवे संशोधन ?
स्तनांच्या कर्करोगासंदर्भात आरोग्यक्षेत्रात एक दिलासादायक बातमी आहे.अमेरिकेत झालेल्या एका महत्वाच्या संशोधनानुसार ७० टक्के रुग्णांमध्ये केमोथेरीपी थेरपीशिवाय कर्करोग बरा होणं शक्य होणार आहे. ऑन्को टाईप डीएक्स नावाच्या टेस्टनं महिलेला झालेला कर्करोगाची स्थिती ओळखता येते. या टेस्टमध्ये जर सकारात्मक निकाल आले, तर स्तनांच्या कर्करोगाने महिलेला केमोथेरपी न घेताच कर्करोग बरा होऊ शकणार आहे. अमेरिकेतली एका कॅन्सर इन्स्टिट्युटनं केलेलं संशोधन इंग्लंडच्या प्रसिद्ध न्यू इंग्लंड जर्नल ऑफ इन्स्टिट्यीटूनं छापलंय. तुम्ही कॅन्सरच्या उपचारांसाठी मुंबईत आलाय ? मग या ठिकाणी टाटा मेमोरियलतर्फे केली जाते रूग्णांची राहण्याची सोय.

स्तनांचा कॅन्सर ही आजच्या युगातली महिलांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. गरोदर असताना किंवा गर्भारणपणानंतर वर्षभरात स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. प्रमाण कमी असलं तरी या व्याधीकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही. गरोदरपणातल्या स्तनांच्या कॅन्सरबाबत...

गरोदरपणात तसंच त्यानंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. यामुळे स्तन कॅन्सर विकसित होण्यास पोषक वातावरण तयार होतं. मोठ्या वयातल्या गरोदरपणामुळे ही समस्या उद्भवू शकते. 32 ते 38 या वयोगटातल्या गरोदर
स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

लक्षण : गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरमध्ये तीच लक्षणं आढळून येतात. पण गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होत राहतो. गाठीही येतात. त्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होत नाही आणि उपचारांना उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो.

काळजी : गरोदरपणात स्तनांची नियमित चाचणी करायला हवी. स्तन तसेच काखेत आलेल्या काठीकडे दुर्लक्ष करू नये. अल्ट्रासाउंड, एमआआय चाचणीद्वारे गाठींच निदान करून घेता येईल. गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरवर वेळेत उपचार करून घेणं गरजेचं आहे. घरात स्तन कॅन्सरचा इतिहास असेल तर स्तनांची वेळोवेळी तपासणी करून घ्यायला हवी. गरोदरपणातला स्तन कॅन्सर योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो. गरज आहे ती वेळेत निदान होण्याची.

जागतिक स्तनपान १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट असा साजरा केला जातो. सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे आई व मुलाच्या आरोग्याला होणारे फायदे याविषयी अधिक जाणून घेऊ..
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे तिचे मातृत्व. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशु साठी अमृतासमान असते. आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक

आई आणि मुलाच्या
आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही.

ककून फर्टिलिटी IVF कन्सल्टंट, डॉ. राजलक्ष्मी वालावलकर यांच्या मते, स्तनपानाने मिळणारे दूध हे
नक्कीच एक उत्तम पोषणमूल्ये असणारे आहे जे नवजात शिशुला अन्य कोणत्याच बाहेरील दुधातून मिळू शकणार नाही. स्तनपान हे आईच्याआरोग्यासाठी हि लाभदायक आहे.

स्तनपानाचे मातांना होणारे फायदे
1. स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते:
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता हि आपल्या नवजात शिशुला पुरेसे स्तनपान करू शकते का हा केवळ प्रश्नच आहे. परंतु ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते . काही स्तनपान करणाऱ्यामातांना दुग्धपान करताना संप्रेरकातील बदलामुळे (harmonal changes)त्यांच्या मासिक पाळी उशिराने येणं यांसारख्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रॉगन सारख्या संप्रेरकाचीकमतरता निर्माण होते. अंतिमतः स्तनामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास सुरुवात होते. गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात स्तनातील पेशीमध्ये बदल होत असतात. या पेशींमधील बदलामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फारकमी होते.

2. बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास तसेच गर्भधारणेआधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते:

गर्भवती मातांचें शरीर हे गर्भधारणेच्या काळात अधिकाधिक चरबी साठवून ठेवत असते कारण शरीरामध्ये दूध निर्माण होण्याच्या कालावधीमध्ये जास्त कॅलरीज साठवून ठेवण्याची गरज असते. अशा वेळी स्तनपान करणाऱया मातांना त्यांच्याशरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अधिक मदत होते याउलट बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

3. स्तनपानाने आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास अधिक मदत होते:
स्तनपानावेळी आई आणि बाळामधील अंतर हे सर्वात कमी असते. मूल हे आईच्या इतके जवळ असते कि ते सहज आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ओळखू शकते. प्रक्रियेतून बाळामध्ये शांती आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागते. स्तनपानकरताना संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे सुद्धा आई आणि बाळ यांच्या नात्यात दृढता आणणारे ठरतात. ऑक्सिटोसिन हे एक प्रेम वाढवणारे संप्रेरक(love harmone)असून यामुळे स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांचे मूल यांच्यामध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध निर्माण करण्यास मदत करतात.

स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे:
१) उत्तम पोषणाचा स्रोत: स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्व, प्रथिने, आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीचप्रतिबंधात्मक द्रव्ये (antibodies)असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गांपासून, ऍलर्जी यांसारख्याना रोगांना प्रतिकार करणे शकय होते. तसेच या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता फारकमी होते.

२) स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा व विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमता हि उंचावते: स्तनपानाचा अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान वेगाने व कुठलाही स्पर्श न करताही अचूकपणे करण्यासाठी एक वेगळी पद्धत रोपड येथील आयआयटीच्या वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. या तंत्रात स्तनांपासून परावर्तित होणाऱ्या अवरक्त किरणांच्या मदतीने अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोगाच्या गाठी शोधता येतात.

इन्फ्रारेड थर्मोग्राफी नावाचे हे तंत्रज्ञान वेदनारहित, वेगवान असून त्यात शरीराला छेदही द्यावा लागत नाही. ही पद्धत मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड, मॅग्नेटिक रेझोनन्स (चुंबकीय सस्पंदन) या तंत्रांना पूरक आहे, असे विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक रवीबाबू मुलावीसाला यांनी सांगितले.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफीचा वापर केला जात असला तरी त्याला मर्यादा आहेत. त्यात, दाट स्तनांमधील गाठी शोधणे अवघड असते.

दाट स्तनांमध्ये चरबी कमी व ग्रंथींच्या उती मांसल स्तनांपेक्षा जास्त असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत मॅमोग्राफीला मर्यादा येतात. ग्रंथींच्या भागातील गाठी त्यात कळणे अवघड असते कारण ग्रंथी व गाठीचा भाग यातील घनतेत फरक असतो. मॅमोग्राफीत त्यामुळे गाठ ओळखणे अवघड होते. त्याऐवजी रेडिओलॉजी तंत्राने तेच काम सोपे व अचूक होते.

मुलावीसाला यांनी सांगितले की, मॅमोग्राफीत शरीर हानिकारक आयनीभवन असलेल्या प्रारणांना सामोरे जावे लागते. सध्याचे आयआरटी तंत्रज्ञान हे पारंपरिक मॅमोग्राफीपेक्षा रुग्णस्नेही आहे. या नवीन पद्धतीत औष्णिक प्रेरक स्तनांना लावला जातो व कक्ष तापमानापेक्षा दोन किंवा तीन अंश फरक असलेले तापमान स्तनाभोवती निर्माण केले जाते. यात औष्णिक लहरी स्तनात पसरल्या जातात व त्यातून त्वचेवरील तापमानातील फरक कळतो. त्यातून आत गाठ आहे की नाही हे अचूक समजते कारण या गाठींमुळे वरच्या तापमानात फरक पडत असतो.

Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Kedarnath  Kalyanpur
Dr. Kedarnath Kalyanpur
MDS, Dental Surgeon Dentist, 8 yrs, Pune
Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Renu Vatkar
Dr. Renu Vatkar
MDS, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Hellodox
x