Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
तोंडातील 'ही' लक्षणे देतात माऊथ कॅन्सरचा संकेत!
#कर्करोग#ओरल हेल्थ केअर

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननुसार, जगभरात प्रत्येक वर्षी ७० लाख लोकांना तंबाखू आणि अन्य धुम्रपान उत्पादनांमुळे कॅन्सर आणि अन्य समस्या उद्भवतात. प्रत्येक वर्षी भारतात हजारो लोक तोंडाच्या कॅन्सरला बळी पडतात. तंबाखू खाल्याने आणि धुम्रपानामुले तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. तोंडाचा कॅन्सर म्हणजे जीभ, ओठ आणि गळ्यातील भागात कॅन्सर होतो. वेळीच उपचार घेतल्यास कॅन्सर बरा होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी तोंडाच्या कॅन्सरचे सुरुवातीची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. तर मग जाणून घेऊया तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे...

# तोंडाच्या आत कोणत्याही भागात गाठ जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही गाठ कॅन्सरची ही असू शकते.

# माऊथ अल्सरचा त्रास दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. अल्सर खूप काळ राहणे हे कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक आहे.

# टॉन्सिल होणे ही अगदी सामान्य बाब आहे. पण हा त्रास तुम्हाला वारंवार होत असल्यास याचा तपास करुन घ्या. हे देखील कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक आहे.

# तोंड वारंवार सुन्न होत असल्यास याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

# तोंडातून रक्त येत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही टीप्स

# तोंडाच्या आत कोणताही रंग बदललेला दिसला तर लगेच डॉक्टरांना दाखवा. तोंडात वारंवार पडणारे सफेद डाग तसंच ते फार काळ राहत असल्यास हे माऊथ कॅन्सरचे लक्षण आहे.

वृद्धापळात दातांचे पडणे, दात सैल होणे अगदी सामान्य आहे. पण कमी वयात दात सैल पडणे किंवा तुटणे हे माऊथ कॅन्सरचे लक्षण असू शकते. 6 गोष्टी तुम्हाला कॅन्सरपासून ठेवतील दूर

Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Aradhana Patkar
Dr. Aradhana Patkar
Specialist, Gynaecologist Infertility Specialist, 4 yrs, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Dr. Sanjay  Babar
Dr. Sanjay Babar
BAMS, Ayurveda General Surgeon, 15 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune