Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
बसून बसून मान, पाठ, कंबर, पायांचं दुखणं वाढलंय? ही एक्सरसाइज दूर करेल समस्या
#पाठदुखी#मान दुखी#पाय दुखणे

ऑफिस जॉब किंवा खुर्चीवर तासंतास बसून काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत खुर्चीवर बसून काम करणाऱ्या रोज एक्सरसाइजसाठी वेळ मिळतही नाही आणि ते थकव्यामुळे बरेचजण वेळ काढतही नाही. अनेक रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, सतत बसून काम करणाऱ्यांना हार्ट अटॅक धोका वाढतो. पण तरिही याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. अशात ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनी कोणती एक्सरसाइज करावी? असा प्रश्नही नेहमी विचारला जातो. त्यामुळे आम्ही एका खास एक्सरसाइजची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही बसून काम करत असाल आणि एक्सरसाइजसाठी नियमित वेळ काढू शकत नसाल तर एक अशी सोपी एक्सरसाइज आहे, ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. या एक्सरसाइजला जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज असं नाव देण्यात आलं आहे. ही एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे. जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणाऱ्यांचं शरीर आखडलं जातं. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर ठरू शकते.

सतत बसून काम केल्याने व्यक्तीची पाठ आणि मान खाली झुकते. जॅफर्सन कर्ल एक्सरसाइजने या समस्येपासून सुटका मिळू शकते. तसेच ऑफिसमध्ये बसून बसून काम करून गुडघे आणि कंबरही दुखायला लागते. या समस्याही या एक्सरसाइजने दूर होतील.

जॅफर्सन कर्ल एक्सरसाइजचे फायदे

जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज कमी वेळात शरीराच्या अनेक मांसपेशीना एकाचवेळी आराम देते. ही एक्सरसाइज त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे, जे फार जास्तवेळ उभे राहून काम करतात किंवा जास्तवेळ बसून काम करतात. ज्यात जवळपास आपण सगळेच येतो. शरीराच्या मागच्या भागावर जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज प्रभाव टाकते. ही एक्सरसाइज मानेपासून ते पायांच्या टाचांपर्यंत जाणाऱ्या सगळ्याच मांसपेशींवर दबाव आणते.

कॉम्प्युटरवर तासंतास टाइप करणे किंवा एकाच पोजिशनमध्ये बसल्याने मान आणि खांदे दुखायला लागतात. तसेच पाठ, कंबर आणि मांड्याही दुखायला लागतात. तसेच छातीमध्ये जास्त फॅट जमा होणे, खांदे वाकणे, मानेखाली वेदना होणे या सगळ्या बसून काम करणाऱ्यांना होणाऱ्या समस्या आहेत. यांच्यासाठी एक्सरसाइज अधिक फायदेशीर आहे.

कशी कराल एक्सरसाइज

ही एक्सरसाइज करण्यासाठी एका बेंचवर किंवा बॉक्सच्या काठावर उभे रहा. दोन्ही हातांमध्ये केटलबॉल घ्या. जर वजन नसेल तर केवळ हात हायांवर ठेवून उभे रहा.

सर्वातआधी चेहरा छातीकडे वळवा, या स्थितीत तुमची दाढी तुमच्या छातीला स्पर्श करेल याची काळजी घ्या. नंतर पाठ हळूहळू पुढच्या बाजूने बेन्ड करा आणि हातही बॉक्सच्या खालच्या दिशेने करावे.

या स्थितीत तुमचे दोन्ही हात बॉक्सच्या खाली, डोकं गुडघ्यांसमोर, पाय सरळ, कंबर वाकलेली असावी. तसेच हनुवटी छातीला आणि छाती मांड्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. नंतर पुन्हा पूर्वस्थितीत यावे.

सुरूवातीला ही एक्सरसाइज चार ते पाच वेळा करावी. नंतर हळूहळू याचा वेळ वाढवावा. तसेच सुरूवातीला छाती मांड्यांना टेकवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. जेवढं सहजपणे होत असेल तेवढं करा.

काय होईल फायदा?

या एक्सरसाइजच्या माध्यमातून शरीर पुढच्या बाजून आणि मागच्या बाजूने घेण्यास मांसपेशी ताणल्या जातात आणि दबावही पडतो. ज्यामुळे मांसपेशी स्ट्रेच आणि रिलीज या दोन्ही स्थितीतून जाते.

ही एक्सरसाइज केवळ पाठ आणि पायांच्या मसल्सना प्रभावित करते असे नाही तर छोट्या मसल्स, जॉइंट यांनाही आराम देते. तसेच याचा पाठीच्या कण्यावरही प्रभाव पडतो.

दिवसभर बसून राहिल्याने वाकलेली पाठ सरळ करण्यासाठी आणि पाठीच्या कण्याचा लवचिकपणा कायम ठेवण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर ठरते.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ही एक्सरसाइज करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही एक्सरसाइज करा. अन्यथा समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.)

Dr. Mahesh Gupta
Dr. Mahesh Gupta
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Kewal Deshpande
Dr. Kewal Deshpande
BHMS, 2 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune