#निरोगी जिवन#आरोग्याचे फायदे#वजन कमी होणे
पालकचे बरेच फायदे आहेत. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पालक खाल्ल्यानं वजन खूप वेगानं कमी होतं.
पालकमध्ये अघुलनशील (insoluble)फायबर भरपूर असते. पालक खाल्ल्यानं पोट भरलेलं राहतं आणि कमी कॅलेरीमध्ये पोट भरतं.
एक कप पालकमध्ये केवळ 7 कॅलेरीज असतात. तुम्ही पालक सूप, स्मूदी, डाळ, भाजी, सलाड किंवा इत्यादी गोष्टींमध्ये समाविष्ठ करू शकता.
पालकमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. त्यासाठी हे ब्लड प्रेशरचा स्तर देखील कंट्रोल करतं.
पालक हिरव्या पालेभाज्यापैकी एक आहे. एक कप पालक तुम्हाला प्रोटीन, कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटामिन ए देखील देतात.