Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
फिट राहण्यासाठी केवळ धावणं गरजेचं नाही, 'या' सोप्या एक्सरसाइजने मिळवू शकता अनेक फायदे!
#निरोगी जिवन#व्यायाम#आरोग्याचे फायदे

चांगल्या फिटनेससाठी रनिंग ही सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. पण यासाठी व्यक्तीचा स्टॅमिना चांगला असणं गरजेचं आहे. काही लोकांना रनिंग करण्या योग्य जागाच नसते. पण अशांनी चिंता करण्याची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही काही सोप्या एक्सरसाइज करून फिट राहू शकता. कार्डिओ एक्सरसाइज सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण ही फार कठीण नाही आणि घरीच करू शकता. जर तुम्ही ही एक्सरसाइज केली तर तुम्हाला रनिंग करण्याची गरज पडणार नाही.

दोरीच्या उड्या

दोरीच्या उड्या कार्डिओ करण्याची सर्वात चांगली पद्धत मानली जाते. याने तुमचं केवळ आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतं. तसेच याने पायांना मजबूती आणि बॅलन्स मिळतो.

डान्सिग

डान्स करणे हा सुद्धा एक्सरसाइजचा एक चांगला प्रकार आहे. कारण यात शरीराचा चांगला व्यायाम होतो. कोणत्याही तुम्हाला आवडेल त्या गाण्यावर डान्स करून तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. तसेच डान्सिगने तुमचा स्टॅमिना वाढतो, ब्लड सर्कुलेशन सुधारतं, मसल्स मजबूत होता आणि लंग्सही मजबूत होण्यास मदत मिळते.

सायकलिंग

सायकलिंगची सर्वात चांगली बाब म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही तयारी करावी लागत नाही. कार्डिओच्या या एक्सरसाइजने लंग्स मजबूत होतात आणि शरीरात जास्त ऑक्सिजन जातं. त्यासोबतच पायांचे मसल्स मजबूत होतात, ज्याने वाढत्या वयासोबत पायांना होणाऱ्या समस्याही दूर होतात.

इनडोअर सायकलिंग

घराबाहेर तुम्ही सायकलिंग करायचं नसेल तर तुम्ही इनडोअरही करू शकता. यासाठी तुम्ही इनडोअर सायकल खरेदी करू शकता. याने तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

बॉक्सिंग किंवा किक बॉक्सिंग

स्टॅमिना वाढवण्यासोबत डिफेन्स मेथड शिकायची असेल तर बॉक्सिंग किंवा किक बॉक्सिंग चांगला पर्याय आहे. याने तुमच्या शरीरातील फॅट बर्न करण्यासही मदत मिळते. तसेच दुसऱ्या एक्सरसाइजने होणारे फायदेही या एक्सरसाइजने मिळतात.

पायऱ्या चढणे-उतरणे

घरात जर पायऱ्या असतील तर रोज १५ ते २० मिनिटे पायऱ्या चढणे-उतरणे ही एक्सरसाइज करा. याचे तुम्हाला अनेक फायदे होतील. महत्त्वाची बाब म्हणजे या एक्सरसाइजसाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची किंवा तयारीची गरज पडत नाही.

Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 4 yrs, Pune
Dr. Badrinarayan Mundada
Dr. Badrinarayan Mundada
MBBS, Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Deepika Manocha
Dr. Deepika Manocha
DNB, Gynaecologist Obstetrician, 9 yrs, South Delhi
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur