Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
डेंग्यूपासून मुक्त करतील हे 8 सुपरफूड
#सुपर फूड्स#ताप#डेंग्यू

वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग पसरत आहेत. डेंग्यू, मलेरिया सारखे मच्छरमुळे पसरणारे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. मात्र असं केलं तर डेंग्यूची लागण होतेच. तुम्हाला माहित आहे, जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात.

डेंग्यू झाल्यावर ब्लड प्लेटलेट्स अगदी पटापट कमी होतात. यावेळी तुम्ही तुमच्या डाएटचा योग्य विचार केला नाहीत तर हा डेंग्यू तुमचा जीव देखील घेऊ शकतो. त्यामुळे अशावेळी कोणते अन्नपदार्थ आपल्या डाएटमध्ये असावेत ते आपण पाहू.

तज्ञांच्या माहितीनुसार, डेंग्यूच्या रूग्णांनी अशा गोष्टींच सेवन करायच्या ज्या पाण्यात लगेच उकळतील. आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंदाचा अधिक सेवन करायचं आहे.

हर्बल टी

डेंग्यूमध्ये आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टीचं सेवन करा. तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा वेलची टाकून वापर करू शकता. हर्बल टीमुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.

नारळ पाणी

डेंग्यूमधील व्हायरलमध्ये सर्वात अगोदर तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. हे मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी घ्यावे. इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स प्यायलाने शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक राहते. यातून पोषक तत्वे मिळतात. जे शरीरात ताकद निर्माण करतात.

पाणी

डेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावड देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.

लींबू पाणी

डेंग्यू पेशंटने अधिक प्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे शरीरात असलेला वायरस आणि विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होईल. डेंग्यू झालेल्या लोकांकरता लींबू हे वरदान मानलं जातं. या दिवसांत लींबू पाण्याचे सेवन अधिक करता. वायरल लघवी वाटे बाहेर जाण्यास अधिक मदत करतो.

दलिया (लापशी)

डेंग्यूच्या रूग्णाने जेवणात दलियाचा वापर करावा. यामुळे शरीरात एकप्रकारची एनर्जी राहते. यामध्ये तुम्ही दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करून खावू शकता.

प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर

डेंग्यू झाल्यावर रूग्णाने प्रोटीनने भरलेले पदार्थ अधिक खावेत. अशामध्ये त्यांनी अंड्याचा समावेश आपल्या जेवणात करावा. प्रोटीनयुक्त आहारात दूध, डेअरीच्या पदार्थाचे सेवन करावे. अशात डेंग्यू लवकर निघून जातो.

महत्वाची नोट
डेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ आणि अधिक आंबट असे पदार्थ टाळावेत. या दिवसांत तोंडाला चव नसते अशावेळी तुम्ही लिंबाचे लोणचे खावू शकता.

Dr. Shivangi Patil
Dr. Shivangi Patil
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Anand  Kale
Dr. Anand Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 2 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune