Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
संभोगाचे प्राचीन नियम, पालन केल्याचे हे फायदे
#सेक्स टिप#निरोगी जिवन

प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायू, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते. संतती प्राप्ती या उद्देश्याने ते शारीरिक संबंध बनवायचे.

प्रथम नियम
शरीरात पाच प्रकाराच्या वायू- व्यान, समान, अपान, उदान आणि प्राण.अपान वायूचे कार्य मल, मूत्र, शुक्र, गर्भ आणि आर्तव बाहेर काढणे आहे. यात शुक्र वीर्य आहे. या वायूला चांगले राखण्यासाठी संभोग करणे योग्य आहे. यासाठी शौचादीहून निवृत्त होऊन संभोग करावे.

दुसरा नियम
आचार्य वात्स्यायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे. कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दांपत्य जीवन सुरळीत चालवू शकतात.

तिसरा नियम
शास्त्रानुसार अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संधिकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मास, गर्भकाळ, आणि ऋतुकाळ इत्यादीत स्त्री पुरुषांनी एकमेकापासून दूर राहावे. हा नियम पालन केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपसात प्रेम आणि सहयोग वाढतं.

चौथा नियम
रात्रीचा प्रथम प्रहर रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरात संबंध स्थापित केल्यास परिणाम म्हणून धार्मिक, सात्त्विक, अनुशासित, संस्कारवान, आई-वडिलांशी प्रेम करणार्‍या, यशस्वी, दीर्घायू, भाग्यवान व आज्ञाकारी संतती प्राप्ती होते.

पाचवा नियम
स्त्रीला आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवे. याने उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा. अश्या परिस्थितीत संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता असते.

सहावा नियम
स्त्री किंवा पुरुषाला एखादा आजार, शोक, संक्रमण असल्यास किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नसल्यास संभोग करू नये. मनात किंवा घरात कोणत्याही प्रकाराचा शोक असल्यास संभोग करू नये.

सातवा नियम
पवित्र वृक्षांखाली, सार्वजनिक स्थान, चौरस्ता, उद्यान, स्मशानभूमी, वध स्थळ, चिकित्सालय, दवाखाने, मंदिर, ब्राह्मण, गुरु आणि अध्यापक निवास स्थळी संभोग करू नये.

आठवा नियम
परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध स्थापित करू नये अर्थात पती- पत्नीने आपसात सहवास करावा.

नववा नियम
गर्भकाळ दरम्यान संबंध बनवू नये. या दरम्याने संभोग केल्यास संतती अपंग, आणि आजारी पैदा होण्याचा धोका असतो.

दहावा नियम
सुंदर, दीर्घायू आणि निरोगी संतानासाठी ग्रहण, सूर्योदय आणि सूर्यास्त काळ, निधन, नक्षत्र, रिक्ता तिथी, दिवाकाळ, भद्रा, पर्वकाळ, अमावस्या, श्राद्धात, गंड तिथी, गंड नक्षत्र आणि आठव्या चंद्रमेचा त्याग करून शुभ मुर्हूतावर संभोग करावं.

आकारावा नियम
गर्भधारणा करताना गोचरमध्ये पती-पत्नीच्या केंद्र व त्रिकोणामध्ये शुभ ग्रह असल्यास, तिसर्‍या, सहाव्या आणि अकराव्या घरात पाप ग्रह असल्यास, लग्नावर मंगळ, गुरु इतर शुभकारक ग्रहांची दृष्टी असल्यास आणि मासिक धर्माची सम रात्री असल्यास रतिक्रिया केल्याने निश्चित योग्य पुत्राची प्राप्ती होते.

बारावा नियम
मासिक धर्माच्या प्रथम चार दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो. पाचव्या रात्री संभोगाने कन्या, सहाव्या रात्रीत पुत्र, सातव्या रात्रीत बंध्या पुत्री, आठव्या रात्रीत ऐश्वर्यशील पुत्र, नवव्या रात्री ऐश्वर्यशालिनी पुत्री, दहाव्या रात्री अती श्रेष्ठ पुत्र, आकाराव्या रात्री सुंदर परंतू संदिग्ध कन्या, बाराव्या रात्री श्रेष्ठ व गुणवान पुत्र, तेराव्या रात्री चिंतावर्धक कन्या व चौदाव्या रात्री सद्गुणी आणि बलवान पुत्र, पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री आणि सोळाव्या रात्री सर्वज्ञ पुत्र संतती प्राप्ती होते.

Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. Pankaj  Patidar
Dr. Pankaj Patidar
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune
Dr. Jalpa Desai
Dr. Jalpa Desai
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 6 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune