Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गरोदरपणात करु नका अस काही, बाळावर होईल वाईट परिणाम
#गर्भधारणा

मुंबई : गरोदरपणात महिला आणि तिच्या कुटुंबाला होणाऱ्या बाळाची काळजी घेणं महत्त्वाच असतं. बाळ आणि आई सुरक्षीत राहण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. गरोदरपणात काय खाव आणि काय न खाव ?, काय आणि किती व्यायाम करावा ? अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात. अशा काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ

रंगांपासून सावधान
नुकसान पोहोचविणाऱ्या वासापासून दूर रहा. घराला रंग मारला जात असेल तर दरोदर स्त्रीने जवळ जाणं टाळावं. पेंटमधून निघणारे काही पदार्थ गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरतात.

गरम पाण्याने आंघोळ नको
गरम पाण्याने आंघोळ करण तुमच्या बाळासाठी ठिक नाही. हलक्या गरम पाण्यानेच स्नान करा. तस केल्यास तुमच्या शरीराच तापमान वाढून १०१ डिग्री पर्यंत पोहोचेल आणि रक्तदाबही वाढू शकतो. असं झाल्यास बाळाला पोषक तत्व आणि ऑक्सिजनची कमी भासू शकते. ऑर्गनायझेशन ऑफ टेराटॉलॉजी इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या मते गरोदर महिलांनी शरीराच तापमान १०१ डिग्रीच्या खाली ठेवायला हवं.

फळांचा रस
फळांच्या रसाचे अधिक प्रमाणात सेवन करु नये. यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण वाढण्याची शक्यता असते. फळांच्या रसापेक्षा फळं खाण जास्त फायदेशीर ठरेल.

झोपण्याची पद्धत
पाठीवर झोपण हीच गरोदरपणातील झोपण्याची अयोग्य पद्धत ठरेल. यामुळे रक्ताभिसरण बिघडून शरीराच्या दुसऱ्या अंगावर याचा भार पडेल. श्वास घेण्यासही अडथळा होऊ शकतो. डाव्या कुशीवर झोपण फायदेशीर ठरेल. तुमच्यासाठी हे थोड कठीण असेल पण याची सवय लावायला हवी.

Dr. Sonali Chavan
Dr. Sonali Chavan
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Shalthiel Sathe
Dr. Shalthiel Sathe
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 10 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune