Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
तापावर फायदेशीर '4' नैसर्गिक उपाय
#नैसर्गिक उपचार#व्हायरल ताप

ताप आल्यानंतर साधारण आपण पॅरेसिटॅमोलच्या गोळ्या घेतो. सहाजिकच ताप कमी करण्यासाठी या गोळ्या परिणामकारक आहेत. मात्र काही नैसर्गिक उपायांनीदेखील तापावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. ताप म्हणजे शरीरातील व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शनला शरीरानेच केलेला प्रतिसाद असतो. औषधगोळ्यांचा परिणाम असतो तसाच त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम किंवा साईड इफेक्टसचा धोकाही असतो. लहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको

तुळस -
तुळशीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट, दाहशामक आणि इंफेक्शनशी सामना करण्याची क्षमता आहे. या आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे तापामध्ये शारीराला व्हायरल इंफेक्शनसोबत लढण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित ताजी तुळशीची पानं चघळल्याने फ्लू, ताप कमी होण्यास मदत होते.

हळद -
हळदीमध्ये क्युरक्युमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामधील अ‍ॅन्टी व्हायरल आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यास मदत होते. हळदीमुळे ताप, कफ, घशातील खवखव कमी करण्यास मदत होते. याकरिता ग्लासभर गरम दूधात हळद मिसळून प्यायल्याने मदत होते. मीठ, हळद आणि मधाचं चाटण फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे


लसूण -
लसणामध्ये diaphoretic गुणधर्म असल्याने यामुळे घाम येण्यास मदत होते. लसणामध्ये अ‍ॅन्टी टॉक्झिक, अ‍ॅन्टी फंगल, अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ताप कमी होण्यास मदत होते. 2-3 लसणाच्या पाकळ्या चघळणं ताप कमी करण्यास फायदेशीर आहे.

आलं -
आलंदेखील हळदीप्रमाणेच अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आहे. मधात बुडवलेला आल्याचा तुकडा चघळणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या तापाशी सामना करणं फायदेशीर आहे.

सर्दी पडशामुळे ताप, तापाची कणकण जाणवत असल्यास या उपचारांची मदत घ्यायला विसरू नका. ताप काही दिवसात कमी न झाल्यास किंवा त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्यास इतर लक्षणांकडेही लक्ष देऊन वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dr. Sonali wagh
Dr. Sonali wagh
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Shashikant J Avhad
Dr. Shashikant J Avhad
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Prachi Nandode
Dr. Prachi Nandode
BHMS, Homeopath, 18 yrs, Pune