Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय ?
#मानसिक आरोग्य

बायपोलर डिसऑर्डरला मनोवस्था, वर्तणुकीतील बदल, कधी नैराश्य कधी अतिउत्साही यांच्याशी निगडी मानसिक किंवा मेंदूशी निगडित विकास मानले जाते. या मानसिक विकारात व्यक्ती काही काळ नैराश्यग्रस्त किंवा काही काळ उन्मादाच्या अवस्थेत राहतो. व्यक्तीची मनस्थिती, ऊर्जा आणि कार्यकुशलतेची पातळी प्रत्येक दिवशी बदलत राहाते. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवते.

नैराश्याची अवस्था- अतिहर्ष झाल्यानंतर व्यक्ती असामान्यपणे ऊर्जावान, आनंदी किंवा खूप चिडचिड करतो. परिणामांची पर्वा न करता चुकीचे निर्णयही घेऊ शकतो. अतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत झोपेची गरज खूप कमी असते. नैराश्याच्या स्थितीमध्ये व्यक्ती विनाकारण रडू लागतो. आयुष्याकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोनही नकारात्मकच होतो. अशी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाही.

लक्षणे कोणती?- बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीमध्ये असामान्य तीव्र भावना दिसतात. त्यांच्याझोपण्याच्या पद्धतीत बदल, सक्रियतेच्या पातळीत वाढ, तसेच वर्तणूकही असामान्य दिसू शकते. या परिस्थितीत मनस्थिती सातत्याने बदलत राहते. व्यक्तीची ऊर्जा पातळी, कार्यशैली तसेच झोपेच्या पद्धतीत बदल, हे सर्व व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असते. याखेरीज या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्ये दुःखी, नाउमेद, ऊर्जाहीन तसेच कार्यशैलीची पातळी कमी होणे, झोप न येणे किंवा खूप जास्त झोप येणे, सतत चिंताग्रस्त राहणे, एकाग्रतेत अडचणी, विसराळूपणा, अतिभोजन किंवा कमी भोजन, थकवा, आळस, आत्महत्येचे विचार इत्यादी लक्षणे व्यक्तींमध्ये दिसतात.

अतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत या व्यक्ती विचित्रपणे अतिउत्साही आणि अतिसक्रिय असतात. अत्याधिक आनंद, जोरजोरात बोलणे, एका विचारापासून थेट दुसर्‍या विचारापर्यंत पोहोचणे, दुसर्‍याला चिडवणे, आसपासच्या वातवरणावर कमी लक्ष देणे आदी अवस्था यामध्ये असू शकतात.

कारणे कोणती- बायपोलर डिसऑर्डर होण्यास अनेक कारणे आहेत. विविध संशोधनानुसार हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे दिसून आले आहे. तसेच वातावरणाचा परिणाम, व्यक्तीगत मानसिक, मानसशास्त्रीय आणि अनुवंशिक कारणे हा आजार होण्याच्या शक्यता वाढवतात. जीवनातील काही अप्रियघटना, वाईट व्यक्तीगत नाती, लहान वयातील अत्याचार किंवा एखादा अपघात यामुळे कमी वयात ही समस्या भेडसावू शकते. त्याचबरोबर मेंदूला झालेली इजा, फिट्स, मेंदू तसेच रक्तवाहिन्यांचे आजार यामुळे देखील हा आजार जडू शकतो.
या आजाराचे योग्यवेळी निदान आणि उपचार झाल्यास पीडित व्यक्तीला आरोग्यपूर्ण आणि चांगले जीवन जगण्यास मदत होते. याच्या उपचारास उशीर करु नये कारण हा आजार आयुष्यभर तसाच राहातो. पण दीर्घकालीन सातत्यपूर्ण उपचार याची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात.

बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारांमध्ये भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मानसिक आजार प्रतिरोधक तसेच नैराश्यावर मात करणारी औषधयोजना केली जाते. व्यक्तीगत आणि सामाजिक समन्वय थेरेपीमुळे उर्वरित नैराश्याची लक्षणे दूर करणे शक्य होते. हा आजार असलेल्या व्यक्तींची मानसिक स्थिती चांगली होत नाही, तोपर्यंत त्यांना व्यवसायासंबंधी प्रयोगशील निर्णय, कामातील बदल किंवा घरगुती समस्यांपासून लांब ठेवावे.

जेव्हा व्यक्तीची मानसिक स्थिती औषधे आणि उपचारांनी नियंत्रित होईल, तेव्हा त्यांच्या व्यक्तीगत परिस्थितींची समीक्षा करणे आवश्यक असते. जेणेकरून या व्यक्तीला होणार्‍या त्रासापासून, अडचणींतून बाहेरकाढण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. दीर्घकालीन उपचारामुळे या आजाराची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होते.

Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Anjali Bartakke
Dr. Anjali Bartakke
DNB, Pediatrician, 18 yrs, Pune
Dr. Suneel Gupta
Dr. Suneel Gupta
MBBS, Family Physician General Physician, 43 yrs, Pune
Dr. Vinay Sachdeva
Dr. Vinay Sachdeva
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 5 yrs, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune