Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नात्यात प्रेम टिकून ठेवतील हे ४ गोल्डन रुल्स!
#विवाह

मुंबई : जिथे प्रेम असते तिथे वाद तर होतातच. मग ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा पती-पत्नी. प्रेमाला वादांचा तडका लागतोच. सुरुवातीला गोड-गोड वाटणाऱ्या प्रेमात खटके उडू लागल्यानंतर ते नाते अगदी नकोसे होते. मानसिक त्रास होतो. ताण वाढतो. मग नात्यातील रस हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच वाद विकोपाला जावू देऊ नका. त्यासाठी हे काही गोल्डन रुल्स लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम सदैव टिकून राहील आणि नात्याचा उबग येणार नाही. मग तुमचे नाते नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी हे खास गोल्डन रुल्स आजमावून पहा...

मी ऐवजी आपण
एकदा नाते जोडल्यानंतर माझे-तुझे करत बसू नका. त्याऐवजी आपण असा शब्दप्रयोग करा. कारण त्यातून आपुलकी, बॉडींग जाणवते. एकजण भांडत असेल तर दुसऱ्याने शक्यतो शांत रहा. त्यामुळे वाद मिटतील आणि समोरच्याला आपला पार्टनर आपल्या सोबत असल्याची जाणीव होईल. प्रेम टिकवण्याचा एक गोल्डन रुल म्हणजे वाद नात्यापेक्षा मोठा होऊ देऊ नका.

नेहमी स्वतःला खरे ठरवण्याचा प्रयत्न करु नका
वादात कोण बरोबर कोण चुकीचे हे ठरवण्याच्या फंदात पडू नका. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्यावेळेस कोणीच आपली चूक मानण्यासाठी तयार नसतो. याउलट एकमेकांवर चुकीचे खापर फोडले जाते. एकमेकांना दोष दिले जातात. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी वाढतात. त्यामुळे एकाने कोणीतरी शांतपणा घ्या.

दुसऱ्याचेही ऐका
एकमेकांचे म्हणणे आधी नीट पूर्णपणे ऐकून घ्या. कारण अनेकदा बोलायचे वेगळेच असते मात्र त्याचा अर्थ वेगळाच घेतला जातो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि वादाला तोंड फुटते. दुसऱ्याच्या जागी जावून एकमेकांचा विचार करा. त्यामुळे समोरच्याची बाजू नीट समजेल. राग, चिडचिड कमी होईल.

दुसऱ्याच्या विचाराचा आदर करा
तुमचे विचार भिन्न असू शकतात. आणि त्याला तुम्हाला सामोरे जावे लागणारच. त्यामुळे नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांच्या विचाराचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Dr. Joginder Singh
Dr. Joginder Singh
BPTh, Behavioral Pediatrician Clinic, 17 yrs, Gautam Buddha Nagar
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla