Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नको अॅसिडिटीला आमंत्रण!
#अतिआम्लता#निरोगी जिवन

नको अॅसिडिटीला आमंत्रण!

'दिवसभराच्या धावपळीमुळे मी खूप दमतो', 'सतत मला एक प्रकारचा थकवा जाणावतो', 'मला अजिबात उत्साही वाटत नाही. असं का होतंय आणि या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू?', असं माझ्याकडे येणारा प्रत्येकजण विचारत असतो. मी अगदी शांतपणे त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारते आणि आपोआपच उत्तर समोर येतं. 'माझी जेवणाची वेळ कधीच ठरलेली नसते', 'कामाच्या धावपळीत दुपारी पटकन काही तरी खातो आणि रात्रीचं जेवण हे टीव्ही समोर होतं. मधल्यावेळेत भूक लागली की मग काहीही अरबटसरबट खाल्लं जातं', असे अनेकजण आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलतात आणि याच सवयी अनेक समस्यांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. या वेगवान अनियमित आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे अॅसिडिटी नावाच्या राक्षसानं आपलं डोकं वर काढलं आहे. आजच्या घडीला शहरातील सत्तर टक्के लोकांना अॅसिडिटीचा त्रास होतो.

अॅसिडिटी म्हणजे नेमकं काय?

पचनक्रिया सुरळीतपणे पार पडत नाही. अपचनामुळे अनेक रसायनांची निर्मिती होते आणि ही अॅसिड्स शरीराला हानी पोहोचवू शकतात. आपल्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्यदायी जीवन यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे खाणं हा एक आनंददायी अनुभव असायला हवा. बाकी सगळं बाजूला ठेवून जेवताना संपूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करा. चवीनं खा. तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल आणि तुमचं शरीर, मन आणि आत्मा एकाचवेळी तृप्त होईल.

अॅसिडिटीची लक्षणं कोणती?

अपचनाचा त्रास

पोटात गॅस होणं

छातीत दुखणं

हृदयाजवळ जळजळ जाणवणं

काहीही खावंसं न वाटणं

टीप-टॉप राहण्यासाठी विशेष टीप्स :

- वजन खूप जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वजन नियंत्रणात असणं खूप महत्त्वाचं आहे.

- शांत वातावरणात जेवणाचा मनसोक्त आस्वाद घ्या. कंटाळत किंवा रागात जेवू नका.

- सावकाश आणि नीट चावून खा. तुमचं पूर्ण लक्ष खाण्याकडे असू द्या.

- अतिप्रमाणात तिखट किंवा तेलकट पदार्थांचं सेवन केल्यानं शरीराला हानी पोहोचू शकते.

- तळलेले पदार्थ, मसालेदार जिन्नस, मिरच्या, पापड, दुग्धपदार्थ जिभेचे चोचले पुरवत असले तरीसुद्धा आरोग्यासाठी चांगले नसतात, हे लक्षात असू द्या.

- भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे आणि त्याचप्रमाणे पोट भरल्यावर थांबलंही पाहिजे.

- एकदम पोटभर जेवू नका. पोटातली थोडी जागा रिकामी ठेवा.

- जेवण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा. हा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.

- काहीही खाल्ल्यावर लगेचच झोपणं पूर्णपणे चुकीचं आहे.

- दिवसभरात दोन कप चहा किंवा कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. या कॅफेनयुक्त पेयांचं अति प्रमाणात सेवन करत असाल तर मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घ्यायलाही तयार राहा.

- कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असेल तर स्वतः डॉक्टर बनण्याच्या भानगडीत पडू नका. वेळीचं वैद्यकीय सल्ला घ्या.

शब्दांकन - गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज

Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Shital Chavan
Dr. Shital Chavan
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Mangesh Khandave
Dr. Mangesh Khandave
DNB, Pediatrician, 17 yrs, Pune