Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
आल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !
#आरोग्याचे फायदे

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
आलं किंवा सुकवलेलं सुंठ हे दोन्ही आयुर्वेदीक औषधांमध्ये हमखास वापरले जाते. म्हणूनच आजारपणांना दूर ठेवण्यासाठी आहारात आल्याचा नियमित वापर केल्याने कमी होईल या समस्यांचा धोका.

पित्ताचा त्रास
पित्ताचा त्रास झाल्यानंतर अनेकजण अ‍ॅन्टासिड घेतात. मात्र वारंवार अ‍ॅन्टासिड घेणेही आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहिल्याने आरोग्याला फायदा होतो. पित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम

दातदुखी
कच्चं आलं चावून खाल्ल्याने दातांचे आरोग्य सुधारते. दातदुखीपासून आराम मिळतो. आल्यामध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल एन्झाईम्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लाळनिर्मितीला चालना मिळते. आल्याचा तुकडा चघळल्याने दातदुखी, हिरड्यांमधील सूज कमी होते. दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!

फॅट कमी करते
आल्याचा तुकडा शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. पचनाचा त्रास आटोक्यात राहतो.

विषारी घटक बाहेर पडतात
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी घाम हे एक माध्यम आहे. आल्याच्या सेवनामुळे घाम निर्माण होणं आणि विषारी घटक बाहेर पडणं या कार्याला चालना मिळते.

रक्तप्रवाह सुधारतो
आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हृद्याचे आरोग्यही जपण्यास मदत होते.

रक्तदाब आटोक्यात
उच्च रक्तदाबामुळे हृद्याचे विकार जडण्याचा धोका असतो. आल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

सर्दी - खोकल्याचा त्रास कमी होतो
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. आल्याचा फयादा सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. यामुळे घश्यातील खवखव कमी होते.

मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो
एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, महिलांना मासिकपाळीच्या दिवसामध्ये होणारा पोटदुखीचा, ओटीपोटाजवळ तीव्र वेदना जाणवण्याचा त्रास कमी होतो. अनेकजणी याकरिता पेनकिलर्सचा आधार घेतात. मात्र आल्याचा तुकडा चघळल्याने मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

Dr. Chandrakant Raut
Dr. Chandrakant Raut
BAMS, Family Physician General Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Vaidya Manish Joshi
Dr. Vaidya Manish Joshi
BAMS, Infertility Specialist Panchakarma, 21 yrs, Nashik
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr.  Kishor Selukar
Dr. Kishor Selukar
BDS, Dentist, 9 yrs, Pune
Dr. Pramod Thombare
Dr. Pramod Thombare
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 7 yrs, Pune