Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
...म्हणून रात्री झोपताना केस बांधा!
#आरोग्याचे फायदे#केसांची निगा#केस गळणे

अधिकतर महिलांना झोपताना केस मोकळे सोडायची सवय असते. यामुळे झोपताना आरामदायी वाटते आणि रक्तप्रवाही सुरळीत होतो. पण एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोपताना केस बांधायला हवेत. कारण रात्री केस कोरडे आणि कमजोर होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर केस विंचरताना केस तुटू लागतात. यामुळे रात्री झोपताना केस बांधणे अधिक फायदेशीर ठरेल.

रात्री केस बांधून झोपण्याचे इतर फायदे...

# केस गुंतू नये असे जर तुम्हाला वाटत असेलतर केस बांधून झोपा. पोनी, वेणी घालून तुम्ही झोपी शकता. केसांना कलर केल्यानंतर १-२ दिवस तरी केस बांधून झोपा.


# केस बांधायचे नसल्यास रात्री झोपताना केसांवर कॉटनचा स्कार्फ किंवा रुमाल बांधा. त्यामुळे चादर, उशीत केस गुंतून तुटणार नाहीत. केसात मॉईश्चर टिकून राहते. परिणामी केस कोरडे होत नाहीत.

# केस मऊ व मुलायम राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना हेअर मास्क लावा आणि शॉवर कॅप घालून झोपा. सकाळी उठून केस धुवा. केस अधिक मुलायम होतील.

# केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कॉटनऐवजी सिल्कचे पिलोकव्हर वापरा. कॉटन पिलोकव्हरमुळे केस कोरडे होऊ शकतात. म्हणूनच केस आणि त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी सिल्क पिलोकव्हर वापरा. सिल्क पिलोकव्हरमुळे केस तुटणे, गुंतणे या समस्या दूर होण्यास मदत होईल.

Dr. Sagar Chavan
Dr. Sagar Chavan
MD - Allopathy, Abdominal Radiologist Pediatric Radiologist, 8 yrs, Pune
Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Nandkumar  G. Patil
Dr. Nandkumar G. Patil
BAMS, Ayurveda, 35 yrs, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune