Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मिरचीपासून बनलेल्या औषधापासून होईल लठ्ठपणाचा इलाज
#आरोग्याचे फायदे#हिरव्या भाज्या#वजन कमी होणे

लठ्ठपणा एक शारीरिक समस्या असून त्यास आळा घातला नाही तर विविध गंभीर आरोग्य समस्यांसाठी ते कारणीभूत ठरू शकते. लठ्ठपणासोबत सांधेदुखी, थायरॉइड व रक्तातील साखर यांसारख्या समस्या शरीरात डोके वर काढू लागतात.

अमेरिकेतील व्योमिंग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मात्र लठ्ठपणा दूर करण्यासाठी अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी लाल रिचीपासून एक औषध तयार केले असून ते दीर्घकाळपर्यंत तुमच्या शारीरिक वजनाला संतुलित ठेवून लठ्ठपणा घटविण्यास मदत करेल.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, लाल मिरचीमध्ये कॅप्साइसिन नामक घटक असतो. त्यामुळेच मिरचीला तिखटपणा येतो.

हा घटक वजन घटविणे, लठ्ठपणा दूर करणे व चयापचय वाढविण्यास मदत करतो. या अध्ययनाचे प्रमुख भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ भास्करन त्यागराजन यांनी सांगितले की, हा घटक नुसत्या मिरचीच्या सेवनातून आपले शरीर घेत नाही. त्यामुळे मिरचीपासून बनलेल्या औषधाचे सेवन उचित आहे, ते पुरेसा लाभ देते.

कॅप्साइनपासून बनलेली मेटाबोसिन औषधे शरीरात पोहोचल्यानंतर दिवसभर कॅप्साइसिनला शरीरात सोडत असतात. त्यामुळे शरीरात जळजळ वा अन्य दुष्परिणाम होत नाहीत.

त्यागराजन यांच्या माहितीनुसार, या औषधामुळे रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व इन्सुलिनची पातळीही संतुलित होते. शास्त्रज्ञांनी उंदरांवर आठ महिने या औषधाची चाचणी घेतली. त्यात कोणत्याही दुष्परिणांमाशिवाय वजन कमी झाल्याचे दिसून आले.

सोबतच ते चरबीयुक्त पदार्थांचा दुष्प्रभावही कमी करते व शरीरात चरबी पेशी वाढू देत नाही.

Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Snehal Deshmukh
Dr. Snehal Deshmukh
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune