Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
थकवा दूर करा असा…
#आरोग्याचे फायदे#थकवा आणि कंटाळा

दिवसभर काम, काम आणि फक्‍त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. असे काही उपाय –

सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.

सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचीड होते तसेच शरीरात आळस निर्माण होतो.

पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्‍तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
शॉवरखाली आंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे.

जेवणावर तुमच्या शरीराची शक्‍ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्‍त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्‍त पदार्थ खाणे टाळावे.

व्यायामामुळे रक्‍तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.

थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्‍त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा : दीर्घ श्‍वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्‍वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.

शक्‍य झाल्यास एका जागी बसून एखादा प्राणायाम केल्यास त्याचा नक्‍कीच फायदा होईल.

रंगांचासुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते.

Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 24 yrs, Nashik
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai