Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
'हे' 4 मिनरल्स तुम्हाला ठेवतील फिट आणि हेल्दी!
#आरोग्याचे फायदे#आहार आणि पोषण#व्यायाम

आपण नेहमी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्त्वांबाबत बोलत असतो. पण इतर पोषक तत्वांप्रमाणेच मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. तरिही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अधिकाधिक लोकांना हे माहीत नसतं की, शरीरासाठी मिनरल्स कसे उपयोगी ठरतात. शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी मिनरल्स आवश्यक असतात. मिनरल्स हाडांच्या मजबुतीसोबतच स्नायूंसाठीही उपयोगी ठरतात.

मॅग्नेशिअम

मॅग्नेशिअम मेटाबॉलिज्म, ब्लड शुगरला एनर्जी लेव्हलमध्ये रूपांतरित करण्याचं काम करतात. तसेच ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं. हे कॅल्शिअमसोबत एकत्र येऊन काम करतं. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे मायग्रेन, डिप्रेशन किंवा मसल्स क्रँप्सची समस्या उद्भवते.

मॅग्नेशिअम असणारं डाएट

मॅग्नेशिअम (Magnesium) मिळवण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, बदाम, धान्य किंवा केळ्याचा आहारात समावेश करा.

फॉस्फरस

हाडांमध्ये कॅल्शिअम फॉस्फेटच्या रूपात जमा होत असतं. दात आणि हाडांसाठी हे अत्यंत आवश्यक असतं. याच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, थकवा, हाडांमध्ये वेदाना होतात. शरीरामध्ये फॉस्फोरस डाळ, नट्स, दूध, चीज, मोड आलेली कडधान्य, मांस, मासे अस्तित्वात असतात. मॅग्नीजच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती उत्तम होते आणि पोटोच्या सर्व समस्या दूर होतात.

फॉस्फरस डाएट

फॉस्फरस (phosphorus)साठी धान्य, वाटाणे, चहा, कॉफी आणि मनुक्यांचं सेवन करा.

झिंक

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झिंक अत्यंत आवश्यक असतं. ते केस, त्वचा आणि नखांना पोषण देण्यासाठी मदत करतं. झिंकच्या कमतरतेमुळे सर्दी-खोकलाही लगेच होतो.

झिंक डाएट

शरीरातील झिंकची कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये धान्य, दूध, फळं, मासे, डाळी आणि तीळाचं सेवन करा.

सल्फर

शरीरामध्ये प्रोटीन तयार होण्यासाठी सल्फर आवश्यक असतं. हे एक अॅन्टीएजिंग तत्व आहे. सल्फर त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतं. तसेच हे धूप आणि प्रदूषणापासून पेशींच रक्षण करतं.

सल्फर डाएट

कोबी, दूधाचे पदार्थ, बदाम, अक्रोड, अंड आणि मासे या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने सल्फरची कमतरता दूर करण्यास मदत होते.

Dr. Suhel  Shaikh
Dr. Suhel Shaikh
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 2 yrs, Pune
Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Dr Amrut Oswal
Dr. Dr Amrut Oswal
Specialist, Orthopaedics Joint Replacement Surgeon, 29 yrs, Pune
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune