Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
केसांच्या वाढीसाठी ‘ही’ फळे आवर्जून खा
#केसांची निगा

माझे केस कधी वाढतच नाहीत, अशी तक्रार सध्या अनेक मुली आणि महिलांकडून ऐकायला मिळते. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. हे केस लांब आणि घनदाट असावेत अशी जवळपास प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मग हे केस वाढविण्यासाठी अनेक उपाय अवलंबले जातात. अनेकदा केस दाट आणि काळेभोर होण्यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या विविध प्रसाधनांचा भडीमारही केला जातो. पण यामुळे केस वाढण्याऐवजी ते आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. शिवाय सध्या ताण हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण असते.

केसांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये वातावरण, केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, केसाला लावली जाणारी शॅम्पू, कंडिशनर, तेल यांसारखी उत्पादने यांचा समावेश असतो. याबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश असतो तो म्हणजे आहार. हा आहार चांगला असेल तर केस चांगले राहण्यास मदत होते. केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. आहारातही फळांचा समावेश केसांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असतो. आता कोणती फळे खाणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते पाहूयात…
सफरचंद

‘An Apple a day keep doctor away’ या उक्तीप्रमाणे सफरचंद हे फळ आरोग्यासाठी अतिशय चांगले असते हे आपल्याला माहित आहे. पण त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठीही हे फळ उपयुक्त असते. दिवसातून एक सफरचंद खाल्ल्यास त्याचा केसांची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच सफरचंदात असणारे फेनॉलिस आणि बायोटीन या घटकांमुळे केसांच्यां मूळांतील ताकद वाढते.

पेरु

पेरुतील एक बी ही अमृत बी असते आणि तिच्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात असे म्हटले जाते. त्याचबरोबर पेरुमध्ये कॅल्शियम आणि इतरही शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. पेरुत असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही रोज एक पेरु खाल्लात तर नक्कीच तुमचे केस चांगले वाढतील.

संत्री

संत्र्यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे केस वाढण्यास मदत होतेच. पण त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यासही मदत होऊन केसांची चमक वाढते. संत्री केसांच्या आतील त्वचा आणि मूळे बळकट होण्यासही फायदेशीर असते.

स्ट्रॉबेरी

हे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध होणारे फळ आहे. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असते. स्ट्रॉबेरीमध्ये असणारे पोषक घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सिलिका, जीवनसत्त्व ब आणि क असते त्यामुळे केसांचा पोत सुधारतो.

Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Ankita  Bora
Dr. Ankita Bora
MBBS, Adolescent Pediatrics Allergist, 2 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune