Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हृदयरोगावर उत्तम मोड आलेला लसूण
#हिरव्या भाज्या#हृदयरोग

लसणाचा अभ्यास केल्यानंतर यावरचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आलाय. जर्नल ऑफ अँग्रीकल्चरल अँण्ड फूड केमिस्ट्री या शोधनिबंधामध्ये अंकुरीत लसणाची अँण्टीऑक्साईडची क्रिया वाढवण्याचा उपाय असू शकतो, असे कीम टीमने सांगितले.लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे.

लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे. हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ही लसूण मोड आलेली किंवा अंकुरलेली हवी. हृदयरोग तज्ज्ञ सांगतात, रोज आहारात एक तरी लसणाची पाकळी हवी. ताज्या लसणापेक्षा साठवून ठेवलेल्या लसणाला आलेले अंकुर किंवा अंकुरीत लसण यामध्ये अँण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने होते. त्यामुळे अंकुरीत लसूण हृदयासाठी खूप लाभदायक होऊ शकते, असे अमेरिकातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लोव’चे मुख्य संशोधनकर्ता जॉग किम यांचे म्हणणे आहे.

लसूण असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल, रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, असे कीम टीमचे म्हणणे आहे. जेव्हा लसणाच्या बीमधून निघालेल्या अंकुराबरोबर अनेक संयुगे बनतात. अंकुरीत फळे आणि धान्य यामध्ये अँण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने वाढत जाते.


ही क्रिया साठवून ठेवलेल्या लसणामध्ये पण होऊ शकते. 5 दिवसांनी अंकुरीत झालेल्या लसणात अँण्टीऑक्साईडची क्रिया जेवढी जलद होते, तेवढी ताज्या लसणात होत नाही.

Dr. Vishwas Takale
Dr. Vishwas Takale
BAMS, General Physician, 19 yrs, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr. Manisha Garud
Dr. Manisha Garud
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune