Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
डोळ्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ सवयी टाळा
#नेत्र केअर

डोळे हे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातला सर्वाधिक काळ आपण डोळ्यांनी विविध गोष्टी पाहत असतो. याच डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण, सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर येणारा ताण, अपुरी झोप ही डोळ्यांचे आरोग्य खराब होते. असे होऊ नये म्हणून आधीपासूनच काळजी घेणे आवश्यक असते. काही झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळे येणे, रांजणवाडी येणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. पाहूयात कोणते उपाय फायदेशीर ठरु शकतात.

कमी प्रकाशात काम करणे

अनेकदा रात्री अभ्यास किंवा ऑफीसचं काम करताना आपण कमी प्रकाशात काम करतो. मात्र कमी प्रकाशात लिखाण किंवा वाचन केल्याने तसेत लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांच्या शिरा ताणल्या गेल्याने डोळे थकल्यासारखे वाटतात. यामुळे डोकेदुखी तसेच डोळ्यांशी निगडीत इतर त्रास होण्याचीही शक्यता असते. अशाप्रकारे डोळ्यावर ताण आल्यास बघण्याचा केंद्रबिंदू अस्थिर होऊ शकतो.

रात्री उशीरापर्यंत जागरण

सध्या अनेकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ऑफीसमधून उशीरा येणे किंवा इतर कारणांनी रात्री उशीरापर्यंत जागरण होते. यामुळे कमी वयातच प्रिस्बियोपिया म्हणजेच जवळचं न दिसण्याची समस्या वाढते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास बळावण्याचीच शक्यता जास्त असते.

मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रिनमुळे उद्भवणाऱ्या समस्या

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांच्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या नाजून भागावर परिणाम होतो. या स्क्रीनच्या रेडिएशनमुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, कोरडे होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा तक्रारींमुळे अनेकांना चष्माही लागतो. परिणामी हा त्रास इतका वाढतो की डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या उपकरणांपासून योग्य ते अंतर ठेवूनच उपाय करणे आवश्यक आहे.

खाण्याच्या सवयी

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. जंक फूड आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा यांमुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते. या समस्यांमुळे रेटीनल डिजनरेशन तसेच वयस्कर लोकांमध्ये यामुळे मोतीबिंदू आणि लहान मुलांमध्ये मायोपिया यांसारख्या समस्या उद्भवतात.

डोळ्यांचा मेकअप

अनेक महिला आणि मुली जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी डोळ्यात काजळ घालतात, मस्कारा, आय लायनर अशा अनेक सौंदर्यप्रसाधनांचा दैनंदिन वापर करतात. पण ही प्रसाधने चांगली नसल्यास त्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले दिसणे महत्त्वाचे असतानाच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Geetanjali Ghule Karad
Dr. Geetanjali Ghule Karad
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Deodutta Kamble
Dr. Deodutta Kamble
BDS, Dental Surgeon Dentist, 22 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune