Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
जिममध्ये १ तास घाम गाळण्याऐवजी 'ही' एक्सरसाइज ठरेल फायदेशीर!
#व्यायाम#वजन कमी होणे#निरोगी जिवन

वर्कआउटचे वेगवेगळ्या पद्धती लोक आजकाल करु लागले आहेत. बराचवेळ ते जिममध्ये घालवू लागले आहेत. पण मांसपेशींसाठी वर्कआउट करत असाल तर पायऱ्या चढणे सर्वात चांगला पर्या आहे. ६ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे की, १ तास जिममध्ये घाम गाळण्याने तुम्हाला जितका फायदा मिळतो, तितकाच तुम्हाला १५ मिनिटे पायऱ्या चढल्याने मिळू शकतो. सर्व्हेनुसार, तुम्ही जर रोज केवळ एका माळ्यावर पायऱ्यांनी घरी किंवा ऑफिसला जात असाल तर ही एक्सरसाइज तुमच्या अर्धा किलोमीटर ट्रेडमीलवर चालण्यासारखीच होईल. जर तुम्ही २ ते ३ वेळा पायऱ्या चढलात आणि उतरलात तर तुम्हाला यानंतर जिम जाण्याचीही गरज पडणार नाही.

इंस्टंट एनर्जी

पायऱ्या चढल्याने लगेच एनर्जी मिळते, जी जिममध्ये ५ ते ७ मिनिटे एक्सरसाइज करण्याच्या बरोबर असते. इतकेच नाही तर पायऱ्या चढण्या-उतरण्याने हृदय आणि फुफ्फुसांसाठीही फायदेशीर ठरतं. तज्ज्ञ सांगतात की, पायऱ्या चढणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे. इतकेच नाही तर संपूर्ण शरीराच्या फिटनेससाठीही पायऱ्या चढणे फार फायदेशीर आहे. यानंतर तुम्हाला सांधेदुखी, हाडांचं दुखणं अशा समस्या होत नाहीत.

हार्मोन्स होतात सक्रीय

पायऱ्या चढण्या-उतरण्याने एड्रेनलिन हार्मोन सक्रीय राहतात. या हार्मोन्समुळे हृदयाच्या मांसपेशीपर्यंत ब्लड सर्कुलेशन आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यासाठी फार फायदा होतो.

पायऱ्या वर चढून जाताना शरीराचा ७०-८५ डिग्री असा अँगल तयार होतो. अशाप्रकारे शरीराचं वाकणं एक चांगली आणि फायदेशीर कार्डियो एक्सरसाइज आहे. याद्वारे एका तासात जवळपास ७०० कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही ट्रेडमिलवर धावाल तर तुम्ही एका तासात केवळ ३०० कॅलरी बर्न करु शकता.

मानसिक आरोग्याला फायदा

पायऱ्या चढण्याची एक्सरसाइज केल्याने मसल्समध्ये फॅट जमा होत नाही आणि शरीर व्यवस्थित शेपमध्ये राहतं. याने तणाव दूर करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यासही मदत मिळते. असं नियमीत केल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळते. तसेच रोजची कामे करण्यासाठी फोकस करण्यासही मदत होते.

सवय करा

अनेकदा लोक पहिल्याच दिवशी जास्त पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना जास्त थकवा आणि पायांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन दिवस ३ ते ४ मजले पायऱ्यांनी चढून जाण्यापेक्षा हळूहळू ही संख्या वाढवा. पायऱ्या चढण्याची ही सवय तेव्हाच फायदेशीर ठरु शकते, जेव्हा तुम्ही हे नियमीत कराल. १५ दिवस किंवा एक महिना करुन ही एक्सरसाइज सोडली तर तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे या एक्सरसाइजला रुटीनचा भाग करा.

कोणत्या वयातील लोकांनी करावी एक्सरसाइज

ही एक्सरसाइज १२ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत कुणीही करु शकतात. यात व्यक्तीला त्यांची पूर्ण एनर्जी लावावी लागते. तसेच यासाठी ना तुम्हाला पैसे खर्च करावे लागत ना कोणत्या साहित्याची गरज पडत. फिट राहण्यासोबतच या एक्सरसाइजचा फायदा हा आहे की, ही एक्सरसाइज हृदयरोग आणि डायबिटीजचे रुग्ण सहजपणे करु शकतात. हृदयरोगाने ग्रस्त लोकांना जड एक्सरसाइज न करण्याचा सल्ला दिला जातो, पण हळूहळू पायऱ्या चढणे कोणत्याही रुग्णांसाठी परफेक्ट एक्सरसाइज आहे.

Dr. Vipul Jaiswal
Dr. Vipul Jaiswal
MS/MD - Ayurveda, Ayurveda General Physician, 11 yrs, Pune
Dr. Sanket Patil
Dr. Sanket Patil
MDS, Dentist Implantologist, 10 yrs, Pune
Dr. Prakash Dhumal
Dr. Prakash Dhumal
BHMS, Family Physician Dietitian, 5 yrs, Pune
Dr. Prashant Wankhede
Dr. Prashant Wankhede
MS/MD - Ayurveda, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune