Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात गुणकारी!
#मज्जापेशीजालनियंत्रण

सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्याला पौष्टीक आहार घेणं शक्य होतच नाही पण त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणं अशक्य होतं. आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष न देता अनेकदा जंक फूडचा आधार घेतो. त्यामुळे अनेकदा विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलबाबत सांगणार आहोत. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा थेट संबंध आपल्या हृदयाशी असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलशी निगडीत कोणतीही समस्या उद्भवल्यास हृदयाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं ठरतं. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं असतं. तसेच तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ ठरतात फायदेशीर :ऑलिव्ह ऑइल :

कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यासाठी आहारात नेहमी अशा खाद्यतेलाचा वापर करा, जे आरोग्यासाठी फायदेशीर असेल. जेवण तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करू नका. खराब कोलोस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यामध्ये तयार करण्यात आलेलं जेवण जेवल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोल करण्यासाठीही उपयोग होतो.

फायबर :

डॉक्टर अनेकदा दररोज 20 ते 35 ग्रॅम फायबर घेण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला एलडीएल कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारातून कमीतकमी 10 ग्रॅम फायबर अवश्य घ्या.


सोयबीन :

सोयाबीनपासून तयार करण्यात आलेलं सोया मिल्क, दही किंवा टोफूचं सेवन केल्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हे पदार्थ एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची मदत करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवतं. एका दिवसामध्ये 25 ग्रॅम सोयाबीन खाल्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत होते. हे 6 टक्के खराब कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी मदत करतं.

बीन्स :

एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी बीन्सही फायदेशीर ठरतात. जर तुम्ही डाएटमध्ये डेली अर्धा कप बीन्सचा समावेश करत असाल तर ते तुमच्या हृदयासाठी उपयुक्त ठरते. हे कोलेस्ट्रॉलची पातळी 5 ते 6 टक्क्यांनी कमी करतं. हे शरीरातील फायबरची गरजही पूर्ण करतात.


ड्राय फ्रुट्स :

बदाम, अक्रोड आणि पिस्त्यामध्ये फायबर आढळून येतं. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी मदत करतं. जेवण केल्यानंतर अक्रोड खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.


लिंबू :

लिंबू किंवा इतर आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन-सी असंत. तसेच यांमध्ये पाण्याच्या स्वरूपातील फायबर असते. त्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी मदत करतं. या आंबट फळांमध्ये एंजाइम्ससुद्धा असतं, जे मेटाबॉलिज्म वाढविण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं.

Dr. Pratima Kokate
Dr. Pratima Kokate
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Gopal Samdani
Dr. Gopal Samdani
MBBS, Pediatrician, 30 yrs, Pune
Dr. Khushbu Kolte
Dr. Khushbu Kolte
BDS, Dentist Cosmetic and Aesthetic Dentist, 8 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune