Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
स्तनपान देणार्‍या महिलांचं दूध वाढवायला मदत करणारी '4' हेल्थ ड्रिंक्स
#स्तनपान वर्ग#बाळा ची काळजी

स्तनपान हे आईसोबतच बाळाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बाळाला सुरूवातीचे काही महिने आवश्यक पोषणद्रव्य ही स्तनपानाच्या दूधातूनच मिळतात. आईचं दूध हे पचायला हलके असते. म्हणूनच आईच्या आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. आईचं दूध कमी असल्यास या 'ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक' करतात मदत

काही महिलांमध्ये आवश्यक दूधाची निर्मिती होऊ शकत नाही. अशावेळेस वेळीच तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपान देणार्‍या महिलांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळल्यास दूधाची निर्मिती आणि त्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. स्तनपान करण्याचे '६' जबरदस्त फायदे!

कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने स्तनपानामध्ये दूध वाढेल ?

बदामाचं दूध -
बदामाच्या दूधामधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स स्तनापान करणार्‍या स्त्रियांमधील दूध वाढवते. या दूधात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, डी, ई घटक मुबलक असतात. काही मुलांना नट्स (सुक्यामेव्याची) अ‍ॅलर्जी असू शकते. अशावेळेस आईने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.


फळांचा रस
फळं नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खाणंच आरोग्यदायी आहे. मात्र काही फळांचा तुम्ही घरच्या घरी रस काढू शकता. मात्र बाळाला त्रास होत असल्यास सायट्रस म्हणजे आंबट स्वरूपाची, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ टाळा. अतिसाखर टाळा. स्तनपान करणार्‍या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ

आल्याचा चहा
आलं हे दूध वाढवण्यास फायदेशीर ठरते. आलं स्तनपान करणार्‍या स्त्रियांच्या आरोग्यात फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये पचनाचा त्रास, मळमळ कमी करण्यास, शरीरात रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. दिवसाला 1-3 कप चहा पिणं पुरेसे आहे.

मेथी
मेथीदेखील आईचं दूध वाढवायला मदत करते. आहारात मेथीचा काढा, भाजी किंवा लाडवाच्या स्वरूपात समावेश केला जाऊ शकतो. दिवसाला 2-3 कप मेथीचा काढा पुरेसा आहे.

Dr. Vikas Kumar
Dr. Vikas Kumar
Specialist, Gastroenterologist, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Sagar Achyut
Dr. Sagar Achyut
BDS, Oral And Maxillofacial Surgeon Dental Surgeon, 11 yrs, Pune
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
BDS, Dental Surgeon, 5 yrs, Pune
Dr. Sandeep Borse
Dr. Sandeep Borse
MBBS, Internal Medicine Specialist Neurotologist, 5 yrs, Pune