Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
साएटिका : कंबरेपासून पायात होणारी वेदना
#पाठदुखी#गुडघा वेदना

साएटिका या आजारात कंबरेपासून एका बाजूचा पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग आणि पोटरीत असह्य कळा येतात. या कळांबरोबरच या भागात मुंग्या, जडपणा आणि बधीरपणाही येऊ शकतो. आजार बळावल्यास पावलांमध्ये जडपणा आणि कमजोरी येते. साएटिका जर अगदी कमी प्रमाणात होत असेल, तर योग्य विश्रांती, योग्य व्यायाम काही आयुर्वेदीक उपाय उपयुक्त ठरू शकतात. ही वेदना खूपच त्रास द्यायला लागली, तर तिचं शास्त्रीय निदान करणं गरजेचं ठरतं.

कंबरेचा एक्स-रे आणि एमआरआय या दोन तपासण्या योग्य निदान होण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. बऱ्याच रुग्णांमध्ये पायाकडे जाणारी नस मणक्यातून बाहेर पडतानाच दबली गेलेली असते. उभं राहिल्यावर आणि चालायला लागल्यावर ती अधिकच दबली जाते आणि या कळा असह्य प्रमाणात सुरू होतात. दोन मणक्यातली चकती घसरणं, मणके एकमेकांवर घसरणं, नस बाहेर पडताना दोन मणक्यांतल्या जागेत अतिरिक्त कॅल्शियम साठल्यानं चिंचोळी होणं, अशी अनेक कारणं या आजाराला कारणीभूत ठरतात. एमआरआयच्या चाचणीत नेमक्या कारणाचं निदान होतं. साएटिकाची वेदना असह्य होऊन रुग्ण बेजार झाल्यास लहानशा शस्त्रक्रियेनं व्यक्ती वेदनामुक्त होवू शकते. आधुनिक मायक्रोस्कोप किंवा एन्डोस्कोप (दुर्बिण) वापरून ही शस्त्रक्रिया पाऊण ते एक तासात संपते. यात लेझर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी यांसारख्या तंत्रज्ञानाची मदत होते. नेमक्या कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे, हे मात्र न्यूरोसर्जननं ठरवणं इष्ट ठरतं. दोन किंवा तीन टाक्यांत होणारी ही शस्त्रक्रिया अनेक रुग्णांना वेदनामुक्त करते.

साएटिका म्हणजे काय?

कंबरेच्या दोन मणक्यांमध्ये असलेली कुर्चा (डिस्क) घसरल्यामुळे कंबरेत निर्माण होणारी असह्य वेदना आपण कुणाला ना कुणाला होत असल्याचं नेहमीच पाहतो. याला स्लिप्ड डिस्क असं नाव आहे. दुर्दैवानं या आजारावरच्या उपचारांबद्दल जनमानसात असंख्य गैरसमज पसरलेले आपण पाहतो. यात पार्श्वभूमीवर या आजारावर उपलब्ध झालेल्या एका अत्याधुनिक आणि लोकोपयोगी उपचार पद्धतीची माहिती लोकांना व्हावी, म्हणून आपण त्यातल्या घटकांची सविस्तर माहिती घेऊ. कंबरेच्या मणक्यांमध्ये स्लिप्ड डिस्क (गादी, कुर्चा घसरणं) झाल्यास खालील लक्षणं दिसून येतात.

कंबरदुखी : विशेषतः बसल्यावर किंवा पुढे वाकण्याचा प्रयत्न केल्यास होणारी वेदना. ही अतिशय असह्य असू शकतो.

साएटिका : घसरलेली चकती पायाकडे जाणाऱ्या नसेत घुसल्यास पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग आणि पोटरीपर्यंत असह्य वेदना पसरू शकते. वेदनेबरोबरच मांडी आणि पायात मुंग्या येणं, जडपणा आणि बधिरता पसरू शकते.

क्लॉडिकेशन : घसरलेली चकती जर आणखी तीव्रतेनं दाब आणू लागली, तर हे लक्षण दिसतं. यात, थोडं अंतर चाललं की कंबर, मांड्या आणि पोटऱ्या भरून येतात. दुखू लागतात. मुंग्या, जडपणा आणि बधीरपणाही जाणवण्याची शक्यता असते. या लक्षणांमुळे रुग्णाला चालणं, थांबवणंच भाग पडतं.

घोटा आणि पावलातली शक्ती कमी होणं : अतिशय वाढलेल्या आजारात पायाच्या स्नायूत कमजोरी येऊन चालणं अशक्य होण्याची शक्यता असते. याला फूट ड्रॉप म्हणतात. स्लिप डिस्क या आजारात सुरुवातीला शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जातात हे खरं; पण वेदना तशाच सुरू राहिल्यास रुग्णाची अवस्था कठीण होते. रोजच वेदना सहन करत आयुष्य कंठण्याची वेळ त्याच्यावर येते. त्यातच समाजात या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरून दुखणं सहन करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकदा हे दुखणं मोठी शस्त्रक्रिया करण्याएवढं तीव्र नसतं. दैनंदिन जीवनात मात्र कायमचा त्रास उत्पन्न करणारं ठरतं. अशा रुग्णांसाठी कमी टाक्यांची मणक्याची शस्त्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते.

Dr. Prachi Nandode
Dr. Prachi Nandode
BHMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Lalita Gawali
Dr. Lalita Gawali
BAMS, Ayurveda Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Prarthan Mehta
Dr. Prarthan Mehta
Specialist, Pediatrician, 10 yrs, Ahmedabad
Dr. Sagar Achyut
Dr. Sagar Achyut
BDS, Oral And Maxillofacial Surgeon Dental Surgeon, 11 yrs, Pune
Dr. Prashant S Mane
Dr. Prashant S Mane
BAMS, Critical Care Medicine Specialist, 10 yrs, Pune