Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
स्तनपान करणार्‍या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ
#बाळा ची काळजी

गरोदरपणाचा काळ जितका महत्त्वाचा असतो तितकीच काळजी प्रसुतीनंतरही घेणं आवश्यक आहे. प्रसुतीनंतर बाळ किमान एक दीड वर्ष आईच्या दूधावर अवलंबून असते. अशावेळेस आईच्या आहारात असलेले पदार्थ बाळावर परिणाम करते. त्यांच्यांमध्ये इंफेक्शन वाढवू शकते. म्हणूनच आईच्या आहारात कोणते पदार्थ असावेत याबाबतचा काळजी घेणं आवश्यक आहे. बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे

आंबट फळं -
स्तनपान करणार्‍या महिलांनी या काळात आंबट फळं खाऊ नये. यामधील व्हिटॅमिन घटक लहान मुलांचं पोट बिघडवण्यास मदत करते.

लसूण -
स्तनपान देणार्‍या महिलांनी लसणाचा आहारातील समावेश टाळावा. लसणामुळे दूधाचा स्वाद बिघडतो. परिणामी मुलं दूध पिणं नाकारू शकतात. आईच्या आहारात एखाद्या उग्र वासाच्या पदार्थांचा समावेश असल्यास बाळं दूध नाकारू शकते.


मिरची मसाला
मिरची, दालचिनी, काळामिरी यांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. परिणामी मुलांमध्येही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

अल्कोहल
अल्कोहलच्या सेवनापासून दूर रहा. यामुळे रक्तात अल्कोहलचे प्रमाण वाढू शकते. याचा परिणाम लहान मुलांवरदेखील होऊ शकतो.

भाज्या
महिलांच्या आहारातून कोबी, मटार, काकडी यांचा समावेश टाळा. यामुळे पोटात गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता असा त्रास होऊ शकतो.

कॅफिन
स्तनपानादरम्यान महिलांनी कॉफीपासून दूर रहावे. कॉफीत कॅफिन घटक अधिक प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो. बाळाची झोप यामुळे बिघडू शकते. कॅफिन घटक हे चहा आणि सोड्यातही असतात.

Dr. Sayali Shinde
Dr. Sayali Shinde
BAMS, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Mangesh Khandave
Dr. Mangesh Khandave
DNB, Pediatrician, 17 yrs, Pune
Dr. Sujay Patil
Dr. Sujay Patil
MBBS, General Medicine Physician, 5 yrs, Mumbai
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune