Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
चाळीशीच्या पुढील लोकांनी आठवड्यातले तीनच दिवस काम करावे, तज्ज्ञांचे मत
#वय संबंधित सूचक#योग्य आहार

आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस काम करणे म्हणजे अनेकांसाठी कंटाळवाणेच. कित्येक जण तर शुक्रवार किंवा शनिवार कधी येतो याचीच आठवडाभर वाट पाहत असतात. वय वाढेल तसे तुमचे कामाचे दिवस कमी झाले तर किती मज्जा येईल ना? ऐकायला बरी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात झाली तर…आता तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे? पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ४० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांनी आठवड्यातील तीनच दिवस काम करावे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इन्स्टीट्यूटमधील तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास केला आहे. ४० वर्षाच्या वरील लोक आठवड्यातील ३ दिवस काम केले तरच सर्वोत्तम कामगिरी करु शकतात.

या अभ्यासासाठी ४० वर्षावरील ३५०० महिला आणि ३००० पुरुष यांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनी यामध्ये सहभागी झालेल्यांच्या अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, मेमरी, एक्सिक्युटीव्ह रिझनिंग यांसारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या. तसेच या अभ्यासकांनी सहभागींची आकलनविषयक कामगिरीचीही तपासणी केली. या लोकांनी आठवड्यातील २५ तास काम केल्यावर त्यांची कामगिरी ५५ तास काम केल्यावर असणाऱ्या कामगिरीपेक्षा अतिशय चांगली होती असा निर्ष्कर्षही यातून निघाला. यातील एका वरिष्ठ अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, तुमची बौद्धिक क्षमता ही तुम्ही किती वेळ काम करता यावर अवलंबून असते. जास्त ताण आणि थकवा आल्यास शरीर आणि बुद्धी एका मर्यादेपलिकडे तितकी चांगली कामगिरी करु शकत नाही.

कामाचे तास हे थेट तुमच्या कार्यक्षमतेशी निगडीत असल्याने वयाने मोठ्या व्यक्तींची कार्यक्षमता जास्त तास काम केल्यास कमी होत जाते. आठवड्याला ३० तासांहून जास्त काम करण्याचा मध्यमवयीनांच्या मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये तुमच्या कामाचे स्वरुपही तुमची कार्यक्षमता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असेही या अभ्यासकांनी नोंदवले आहे. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहणे हे नक्कीच फायदेशीर नसते. त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे काम करणे आणि पुरेशा सुट्ट्या घेणे आवश्यक असल्याचे मतही या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.

Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune