Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिक पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी तुम्ही सतत लिक्वीड घेत असता. मात्र या ऋतूत काही फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे ज्या शरीरासाठी लाभदायक असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीचे सेवन शरीरासाठी चांगले मानले जाते. यात व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी फायदेशीर असते.

पाचनतंत्र सुधारते
काकडीमध्ये आढळणारे पाणी आणि फायबर शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर एक ग्लास काकडीचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

डिहायड्रेशनपासून बचाव
काकडी ब्रेडमध्ये टाकून तुम्ही सँडविच म्हणूनही खाऊ शकता. अनेकांना फळ खाण्यापेक्षा फळाचा रस प्यायला आवडतो. तुम्हालाही फळ खाणे आवडत नसेल तर फळांचा रस काढून प्या. काकडीचा रसही तुम्ही पिऊ शकता. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते ज्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

कॅन्सरपासून होतो बचाव
काकडीत असणारे प्रोटीन शरीराला कॅन्सरशी लढण्याची शक्ती देतात. तसेच कॅन्सरपासून बचावही होतो. कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात. त्यामुळे याला कॅन्सरविरोधी फळ म्हटले जाते. काकडीच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो.

मुख दुर्गंधी दूर होते
काकडी दातांनी तोडून थोडा वेळ तोंडात ठेवल्यास मुख दुर्गंधी दूर होते. काकडी चावून खाल्ल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया काकडी खाल्ल्याने नष्ट होतात.

चेहऱ्यावर तजेला येतो
काकडीचा वापर सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो. जर उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर काकडीचा पॅक लावून दूर केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा उजळ होते. काकडी त्वचेसाठी टोनिंगचे काम करते.

दररोज या वेळेस खा दोन काकड्या
दररोज कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. सकाळी भरपूर नाश्ता करा. दुपारच्या जेवणात शक्य असेल तर एक काकडी खा. जर हे शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणात कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही चपाती अधिक खाणार नाही. पाचनशक्ती वाढेल यासोबतच वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.

मुंंबई : अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं. अचानक आणि तीव्र वेदनांचा त्रास असल्याने काहीवेळेस या दुखण्यामध्ये खाणं-पिणंही कठीण होऊन बसतं. सामान्यपणे अक्कलदाढ ही 17-25 या वयात येते. पण पंचविशी पुढेही अक्कलदाढ येऊ शकते. मग या अक्कल दाढीचं दुखणं आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकते.

अक्कल दाढीचं दुखणं सुसह्य कसं कराल ?
#1 दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो.

#2 खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

#3 चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

#4 दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग. लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील कीटाणूंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात.
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. कापसाच्या बोळ्याने लवंगाचे ते दाढेजवळ धरून ठेवा.

मुंबई : अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी -
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवणं हे आरोग्यदायी समजले जाते. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

तांब्याच्या भांड्यामध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?
पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका.

का ठरते त्रासदायक?
दूध, दही किंवा त्यासारखे आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने किंवा त्याचे सेवन करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. दह्यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम,प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यासारखे घटक असतात.
जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये दह्यासारख्र पदार्थ साठवले जातात तेव्हा त्यामधील घटकांची तांब्यासोबत रिअ‍ॅक्शन होते. परिणामी हे सारे पदार्थ विषारी होतात.

कोणत्या आजाराचा धोका ?
तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकारचे पदार्थ खाणं आरोग्याला त्रासदायक ठरते. तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकराचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास, काविळ, डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितकारी असलं तरीही त्यामध्ये कोणतेही कापलेले फळ साठवू नका. तसेच फळांचा रस पिऊ नका.

गरम पाणी पिण्याच्या भारतीय संस्कृतीचे जागतिक संशोधकांनीही कौतुक केले असून, नियमित गरम पाणी पिल्याने वजन घटण्याबरोबरच अनेक आजार दूर होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

पिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले. नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर आहार घेणाऱ्यांसाठी हादेखील एक अत्यावश्यक उपाय आहे. रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने आतडय़ातील विषयुक्त घटक दूर होण्यास मदत होते. ‘सायनस’चा आजार असलेल्यांनी रोज गरम पाणी घेतल्यास श्वसनप्रक्रियेतील संसर्ग कमी होण्यास मदत होते, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

नियमित गरम पाण्यामुळे दातही बळकट आणि आरोग्यदायी होण्यास मदत होते. मात्र अतिगरम पाण्यामुळे दातांना इजा होण्याचाही धोका असल्याने याबाबत काळजी घ्यावी, असे संशोधकांनी सांगितले. अवेळी खाण्यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी, पित्त या त्रासावरही गरम पाणी हा प्रभावी उपचार असल्याचे संशोधकांनी सांगितले. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यातही गरम पाण्याचा वाटा महत्त्वाचा आहे. शरीरातील मेदयुक्त घटक दूर करण्यात साहाय्यभूत ठरत असल्याने वजन घटण्यास गरम पाण्यामुळे मदत होते, असे संशोधकांनी सांगितले.

जास्त प्रमाणात कर्बोदके व साखरेच्या सेवनाने डोके व मानेचा कर्करोग पुन्हा उद्भवतो व त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते असे एका अभ्यासात दिसून आले आहे. माफक प्रमाणात मेद व स्टार्च असलेले अन्न घेतल्याने अपाय होत नाही, उलट आरोग्यास लाभच होतो. धान्य, बटाटे, डाळी यांचे माफक प्रमाणात सेवन आवश्यक असते. त्यामुळे कर्करोगाला उलट अटकाव होतो पण त्यांचे आहारातील प्रमाण वाढले तर मात्र ते घातक ठरते, असे अमेरिकेच्या इलिनॉइस विद्यापीठातील अ‍ॅना इ आर्थर यांनी म्हटले आहे.

उपचारांपूर्वी व नंतर रुग्णांनी घेतलेल्या आहाराचा ४०० कर्करोग रुग्णांमध्ये अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सहभागी रुग्णांनी २६ महिने स्कॅमल सेल कार्सिनोमा म्हणजे डोके किंवा मानेच्या कर्करोग निदानानंतर काय आहार घेतला याचा

अभ्यास यात आहे. निदानापूर्वी त्यांनी पूरक आहार, अन्न, पेये कोणत्या प्रकारची घेतली व नंतर कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ घेतले याचा विचार यात करण्यात आला. ज्या रुग्णांनी कर्बोदके व साखर कमी प्रमाणात खाल्ले त्यांच्यात पुन्हा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांनी निदानापूर्वी जास्त प्रमाणात सुक्रोज, फ्रक्टोज, लॅक्टोज व माल्टोजचे सेवन केले होते त्यांच्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक होते.

एकूण ६९ टक्के रुग्णात वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील कर्करोगाचे निदान झाले त्यात १७ टक्के रुग्णांना पुन्हा कर्करोग झाला, शिवाय त्यातील ४२ टक्के रुग्ण मरण पावले. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. Annasaheb Labade
Dr. Annasaheb Labade
BAMS, Ayurveda Family Physician, 19 yrs, Pune
Dr. Anand Karale
Dr. Anand Karale
MS - Allopathy, Gynaecologist Obstetrician, 5 yrs, Pune
Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Hellodox
x