Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : जिथे प्रेम असते तिथे वाद तर होतातच. मग ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा पती-पत्नी. प्रेमाला वादांचा तडका लागतोच. सुरुवातीला गोड-गोड वाटणाऱ्या प्रेमात खटके उडू लागल्यानंतर ते नाते अगदी नकोसे होते. मानसिक त्रास होतो. ताण वाढतो. मग नात्यातील रस हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच वाद विकोपाला जावू देऊ नका. त्यासाठी हे काही गोल्डन रुल्स लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम सदैव टिकून राहील आणि नात्याचा उबग येणार नाही. मग तुमचे नाते नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी हे खास गोल्डन रुल्स आजमावून पहा...

मी ऐवजी आपण
एकदा नाते जोडल्यानंतर माझे-तुझे करत बसू नका. त्याऐवजी आपण असा शब्दप्रयोग करा. कारण त्यातून आपुलकी, बॉडींग जाणवते. एकजण भांडत असेल तर दुसऱ्याने शक्यतो शांत रहा. त्यामुळे वाद मिटतील आणि समोरच्याला आपला पार्टनर आपल्या सोबत असल्याची जाणीव होईल. प्रेम टिकवण्याचा एक गोल्डन रुल म्हणजे वाद नात्यापेक्षा मोठा होऊ देऊ नका.

नेहमी स्वतःला खरे ठरवण्याचा प्रयत्न करु नका
वादात कोण बरोबर कोण चुकीचे हे ठरवण्याच्या फंदात पडू नका. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्यावेळेस कोणीच आपली चूक मानण्यासाठी तयार नसतो. याउलट एकमेकांवर चुकीचे खापर फोडले जाते. एकमेकांना दोष दिले जातात. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी वाढतात. त्यामुळे एकाने कोणीतरी शांतपणा घ्या.

दुसऱ्याचेही ऐका
एकमेकांचे म्हणणे आधी नीट पूर्णपणे ऐकून घ्या. कारण अनेकदा बोलायचे वेगळेच असते मात्र त्याचा अर्थ वेगळाच घेतला जातो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि वादाला तोंड फुटते. दुसऱ्याच्या जागी जावून एकमेकांचा विचार करा. त्यामुळे समोरच्याची बाजू नीट समजेल. राग, चिडचिड कमी होईल.

दुसऱ्याच्या विचाराचा आदर करा
तुमचे विचार भिन्न असू शकतात. आणि त्याला तुम्हाला सामोरे जावे लागणारच. त्यामुळे नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांच्या विचाराचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे.

मुंबई : तुम्हाला खूप घाम येतो? आणि त्यामुळे होणारा त्रास अगदी नकोसा झालाय. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिक वाढते. घाम, चिकचिक यामुळे जीव अगदी नकोसा होतो. मेकअप, लूक खराब होतो. त्वचा आणि केसांचे होणारे नुकसान तर वेगळेच. पण आता काळजी करू नका. या काही गोष्टी तुमची सतत येणाऱ्या घामापासून सुटका करतील. तुम्हालाही सतत घाम येण्याची समस्या असल्यास हे उपाय करुन पहा...

#1. ड्राय शाम्पू हे शाम्पू स्प्रे किंवा पावडर फॉर्म मध्ये मिळतात. खूप घाम येणार्यांसाठी हे उत्तम आहेत. कारण घाम आल्याने ऑईली स्काल्फ ही समस्या असतेच. त्यामुळे केस डल दिसू लागतात.

#2. फूट स्प्रे पायाला घाम येण्याच्या समस्येला अनेकाजण सामोरे गेले असतील. त्यामुळे वास न घेण्यासारखे होणारे मोजे आणि पायाला येणारी दुर्गंधी अगदी नकोशी होते. त्यावर बेस्ट उपाय म्हणजे फूट स्प्रे. लहान बॉटल्स मध्ये ही मिळत असल्याने तुम्ही अगदी सहज कॅरी करू शकता.

#3. वेट व्हाईप्स घाम आल्यानंतर तोंड पुसायला नॉर्मल टिशूज वापरण्यापेक्षा अँटीपर्स्पिरंट व्हाईप्सने फेस क्लीन केल्यास अधिक फ्रेश वाटते आणि तुमचा बॉडी ओडर मेन्टेन्ट राहतो.

#4. अँटीपर्स्पिरंट हॅन्ड लोशन घामाने ओलसर झालेले हात कामात व्यतय तर आणतातच परंतु शेक हॅन्ड करताना किंवा सगळ्यांसोबत वावरताना जरा अनकॉन्फिडन्ट वाटू लागतं. प्रत्येक वेळी हात धुणं किंवा पुसणं शक्य होत नाही. अशा वेळी अँटीपर्स्पिरंट हॅन्ड लोशन वापरा नि बिनधास्त वावरा.

#5. घाम येणाऱ्यांना माहीतच असेल की सनस्क्रीम लावल्यावर अधिक घाम येतो. पण सनस्क्रीम लावणं तर गरजेचं आहे. अशा वेळी ऑइल फ्री सनस्क्रीमचा पर्याय आपल्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा अतिरिक्त घाम नियंत्रित होईल आणि तुम्ही दिवसभर कंम्फरटेबल राहू शकाल.

मुंबई : ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. जेव्हा रक्तवाहिन्यातील प्रेशर 140/90 तेव्हा हायपरटेंशन होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका दुप्पट-तिप्पट वाढतो. वजन, हाय बीपी झाल्याने रक्त वाहिन्यांवर दबाव पडतो आणि त्या आकुंचित पावतात. त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ब्लड प्रेशर हा मोठा आजार नसला तरी अनेक गंभीर आजारांचे मुळ आहे.

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
-वजन वाढणे
-व्यायाम न करणे
-अंनुवंशिक
-सातत्याने तणावात राहणे
-धुम्रपान
-थॉयराईड, ट्युमर सारखे आजार

किती असायला हवा बीपी?
नार्मल बीपी साधारण 120/80 पेक्षा कमी असायला हवे. यावरील स्टेजला प्री-हायपरटेंशन म्हणतात. बीपी 120 ते 139, 80 ते 89 च्या मधल्या स्थितीत असल्यास ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. 140/90 या स्थितीला हायपरटेंशन म्हणतात. जे सर्वात गंभीर आहे.

कधी तपासावा बीपी?
४० शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे. नॉर्मल असले तरी दर ६ महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे.

त्यावरील उपाय
-रोज ४५ मिनिटे व्यायाम करा.
-चाला, जॉगिंग करा.
-आहारातील मीठाचे प्रमाण कमी कराय
वजन नियंत्रित ठेवा.
-स्वतःच्या छंदासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे काम करा.
-फळे आणि हाय फायबर असलेले पदार्थ अधिक खा.
-फास्ट फूड, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅक्ड फूड खाणे टाळा.

लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे.
लिंबू पाणी शरीरात पचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी देखील मदतगार आहे.

लिंबू पाणी व्हिटॅमिन सी ने भरपूर असत. तसेच यात एंटी-ऑक्सीडेंटचे गुण देखील असतात. ज्याने त्वचेचे डाग दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचेत निखर येतो.

सकाळी उठून नेमाने लिंबू पाणीचे सेवन केल्याने दिवसभर फ्रेश वाटत आणि शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.
जर सांधेदुखीचा त्रास असेल तर देखील लिंबू पाणी पिणे योग्य असत.

वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे.

लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने ताजगी कायम राहते.

लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात राहत. जे रोग प्रतिरोधक क्षमतेला बूस्ट करण्याचे काम करतो.

निरोगी राहण्यासाठी आम्हाला आपल्या आहारात फळ भाज्यांसोबत वेग वेगळ्या बियांना देखील सामील करायला पाहिजे. अशाच बियांमध्ये एक आहे अलसी (अंबाडी बिया), ज्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. हे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. अंबाडीच्या बियांपासून तयार काढ्याचे नियमित सेवन केल्याने बरेच आजार दूर होण्याची शक्यता असते.

कसा तयार करायचा काढा
दोन चमचे अलसीच्या बियांना दोन कप पाण्यात मिक्स करा आणि निम्मे होईपर्यंत त्याला उकळी येऊ द्या. तयार काढा गाळून घ्या आणि गार झाल्यावर त्याचे सेवन करावे.

याचे अनेक फायदे आहे

ब्लड शुगर नियंत्रित करणे : डायबिटीज आणि ब्लड शुगरची समस्या असणार्‍या लोकांसाठी अलसीचा काढा वरदान आहे. नियमित रूपेण सकाळी उपाशी पोटी असलीच्या काढ्याचे सेवन केल्याने डायबिटीजचे स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

थाइरॉएडमध्ये फायदेशीर : सकाळी उपाशी पोटी अलसीचा एक कप काढा हाइपोथाइरॉएड आणि हाइपरथाइरॉएड दोन्ही स्थितित फायदेशीर ठरतो.

हार्ट ब्लॉकेजला दूर करण्यासाठी : नियमित रूपेण तीन महिन्यापर्यंत अलसीचा काढा पिण्याने आर्टरीजमधील ब्लॉकेज दूर होतात आणि तुम्हाला एंजियोप्लास्टी करण्याची गरज पडत नाही. अलसीत उपस्थित ओमेगा-3 शरीरातील खराब कोलेस्टरॉल एलडीएलच्या स्तराला कमी करतो आणि हृदय संबंधी आजारांना रोखण्यास मदत करतात. हानिकारक विषाक्त पदार्थांना बाहेर काढून शरीराला डीटॉक्सीफाई करतात.

सांधेदुखीत आराम: साइटिका, सांधेदुखी, गुडघे दुखीत अलसीच्या काढ्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे.

Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Dr. Rashmi Mathur
Dr. Rashmi Mathur
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 5 yrs, Pune
Dr. Jetin Anand
Dr. Jetin Anand
BAMS, Ayurveda Clinic, 12 yrs, Mumbai Suburban
Dr. Swati Dagade
Dr. Swati Dagade
BAMS, Ayurveda Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Anjanikumar Malempati
Dr. Anjanikumar Malempati
MBBS, ENT Specialist, 10 yrs, Pune
Hellodox
x