Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

- मुक्ता गुंडी
उन्हातान्हात लहानगं पोर कमरेला बांधून कुणी एक बाई सिमेंटची जड पोती वाहून नेण्याचं काम करीत असते. तिच्या तोंडात असते तंबाखू. एक रुपयाला मिळणारा खर्रा अजून एका पुडीत बांधून तिनं तो कमरेला खोचलेला असतो. दिवसाकाठी कसेबसे सत्तर रुपयेसुद्धा मिळवणं कठीण जात असताना या बायका तंबाखूवर रोजचा खर्च का करतात? भारतातल्या सुमारे ७० दशलक्ष बायकांमध्ये आढळून येणारं हे व्यसन केवळ एक ‘वाईट सवय’ म्हणून हिणवायचं की इतक्या साऱ्या बायका मुळात या सवयीकडे का खेचल्या जात आहेत हे शोधून काढायचं? २०१६ साली भारतीय शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तंबाखूवरील एका महत्त्वाच्या अहवालामध्ये एक धक्कादायक बाब दिसून आली. भारतातील आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील बहुतांश बायका भूक मारण्यासाठी तोंडात तंबाखू चघळत ठेवतात. तंबाखू अथवा खर्रा, मावा यासारखे तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये असलेल्या निकोटिन नावाच्या द्रव्यामुळे मेंदूतील भुकेची जाणीव करून देणाºया पेशी दबलेल्या राहतात.

रोजची भाकर मिळण्याची शाश्वती नसलेल्या बायकांना हा अघोरी मार्ग निवडण्यावाचून पर्याय राहात नाही, असे हा अहवाल सूचित करतो. या अहवालामुळे बायकांमधील धूरविरहित तंबाखूची व्यसनाधीनता समजून घेताना खूप मोठ्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येतं. काही बायकांना अतिकष्टाची कामं करावी लागतात, काहीना घरातील ताण अन् कटकटी यांना तोंड द्यायचं असतं, काहीना दारूड्या नवºयाची सोबत मान्य करावी लागते तर काहीना शरीराची दुखणी विसरत घरकाम करावं लागतं. यावर तंबाखू हा अर्थातच उपाय नाही तर दैनंदिन आयुष्यात सामाजिक-आर्थिक प्रश्नांना तोंड देताना बायकांना त्यांच्या आरोग्याशी करावी लागणारी तडजोड आहे. धूरविरहित तंबाखू ही अनेक स्वरूपांमध्ये वापरली जाते. मावा, खर्रा, दातांना लावण्याची पेस्ट, माशेरी पावडर, तंबाखूयुक्त पान अशा वेगवेगळ्या प्रकारची तंबाखू खेड्यापाड्यामध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध असते. बिडी अथवा सिगारेट या स्वरूपात तंबाखूचं सेवन करणा-या स्त्रियांचं प्रमाण भारतात सुमारे २ टक्के इतकं आहे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे स्त्रियांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जवळजवळ आठ पटींनी जास्त असते तर हृदयविकार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा २ ते ४ पटींनी जास्त असते. तंबाखूचं व्यसन लागलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची शक्यता जास्त असते. तसेच तरुण वयात तंबाखूची सवय लागलेल्या बाईला गरोदरपणात अचानक तंबाखूची सवय मोडणं शक्य होत नाही. यामुळे गरोदरपणातील आजार वाढतात, जन्मलेलं मूल अपुºया वजनाचं जन्माला येतं. या आरोग्य समस्यांमुळे स्त्रियांना समाजाकडून सहन करावी लागणारी अवहेलना, त्रास यांचा समावेश तंबाखूमुळे होणा-या नुकसानीच्या गणनेत कुठेच होत नाही !

तंबाखूची सवय लागण्याचं वय भारतीय स्त्रियांमध्ये १५ ते १७ वर्षं इतकं आहे. घरात आई किंवा शाळेत बाई जर तंबाखू वापरत असतील तर मुलींना त्याची सवय लागण्यात कदाचित काही वावगं वाटत नाही, इतकी तंबाखू आपल्या संस्कृतीमध्ये घट्ट रु जून बसली आहे . व्यसनमुक्तीच्या धोरणांमध्ये स्त्रियांचा, विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील स्त्रियांचा विशेष विचार होणं अतिशय गरजेचं आहे.
गावपातळीवरील स्त्रियांपर्यंत तंबाखूमुक्त होण्यासाठी व्यसनमुक्तीच्या ज्या सुविधा पोहोचायला हव्यात त्या पोहोचत नाहीत. एकदा व्यक्ती व्यसनाधीन झाली की व्यक्तीच्या शरीराकडून ‘निकोटिन’साठी निर्माण होणारी गरज इतकी तीव्र असते की ‘तंबाखू आरोग्यास धोकादायक असते’ असा संदेश त्यापुढे फारच फिका पडतो. स्त्रियांना त्यांच्या समस्यांची गुंतागुंत लक्षात घेऊन व्यसनमुक्तीसाठी मदत करणारी मैत्रीपूर्ण केंद्र गावपातळीपर्यंत असणं गरजेचं आहे. दिल्लीसारख्या १.५ कोटी लोकसंख्या असणाºया महानगरातसुद्धा केवळ तीनच सरकारी तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रं आहेत. त्यातून ही केंद्रं मनोविकार विभागाच्या अंतर्गत असल्यानं लोक जाणं टाळतात.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’, ठाणे येथे ‘इन्स्टिट्यूट आॅफ सायकोलॉजिकल हेल्थ’ आणि पुण्यातील ‘मुक्तांगण’ यांसारख्या संस्था व्यसनमुक्तीकरिता काम करीत आहेत. परंतु या समस्येशी दोन हात करायला फार मोठ्या यंत्रणेची गरज आहे. तसेच या यंत्रणेचा दृष्टिकोन पुरेसा व्यापकही असायला हवा. ज्या देशातील लाखो स्त्रिया भूक मारण्यासाठी तंबाखूच्या आहारी जातात, त्या देशाच्या तंबाखू नियंत्रण धोरणामध्ये निम्न आर्थिक गटातील स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कोणतीही विशेष तरतूद नसावी, हे खेदजनकच !

मुंबई : काही जणांना बसल्या जागीदेखील अचानक चक्कर येण्याचा त्रास येतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास तुम्हांला अनेक त्रास शकतात. परिणामी यामधून अनेक समस्या वाढतात. म्हणूनच चक्करचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

चक्करचा त्रास कसा कराल कमी ?
चक्करचा त्रास अधिक धोकादायक होऊ नये म्हणून आवळा खाणं फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आवळा शरीरात रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.

कसा कराल आवळ्याचा वापर ?
दोन आवळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. यामध्ये 2 चमचे धन्याचे दाणे मिसळा. त्यानंतर कपभर पाणी मिसळून हे मिश्रण रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून त्याचे केवळ पाणी प्यावे.

मधाचा करा असा वापर
आवळ्याप्रमाणेच मधदेखील चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मध मिसळा. हे मिश्रण ग्लासभर पाण्यामध्ये मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

मुंबई : प्रत्येक मुलीचे महिन्यातील ते चार-पाच दिवस जरा नाजूकच असतात. तो काळ म्हणजे मासिक पाळीचा. मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पाय दुखणे, चिडचि़ड होणे, असे अनेक त्रास होतात. विशेषतः सुरुवातीच्या दोन दिवसात काही काम करण्याचीही इच्छा होत नाही. काही वेळा हे दुखणे इतके असह्य होते की ते दूर करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या सगळ्यामुळे स्त्रीजीवनाला मिळालेले वरदान अनेकींना कटकट वाटू लागते. पण तुम्हाला माहित आहे का? तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे हे दुखणे अधिक वाढते. म्हणून मासिक पाळीच्या काळात चुकूनही करु नका या गोष्टी...

गोड आणि नमकीन खाणे
मासिक पाळीच्या काळात चमचमीत खाण्याची इच्छा होते. मात्र या काळात अधिक साखर खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. कारण साखरेमुळे शरीरातील सुज वाढते आणि अधिक मीठ शरीरात वॉटर रिटेंशनचे कारण बनते. त्यामुळे तुमचे दुखणे पूर्वीपेक्षा अधिक वाढते. त्यामुळे या काळात हलके अन्न घ्या. अधिक मसालेदार, गोड आणि नमकीन खाणे टाळा.

अपुरी झोप
या दिवसात तुम्हाला ८-९ तास पूर्ण झोप घ्यायला हवी. हॉर्मोनल बॅलन्स टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे. पूर्ण झोप न मासिक पाळीत होणारा त्रास अधिक वाढेल.

अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन
मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी घेतो. मात्र अधिक कॅफेनचे प्रमाण मासिक पाळीत होणारा त्रास वाढवते.

सिगरेट आणि अल्कोहोल
सिगरेट आणि अल्कोहोल आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे याचे सेवन विशेषतः मासिक पाळीच्या काळात यापासून दूर राहणे योग्य ठरेल. सिगरेट आणि अल्कोहोलच्या सेवनामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि त्रास वाढतो.

व्यायाम न करणे
मासिक पाळीत त्रास होत असल्याने आपण व्यायाम करणे टाळतो. मात्र असे करु नका. हलका व्यायाम करा. त्यामुळे रक्तसंचार सुरळीत सुरु राहील आणि दुखण्यावर आराम मिळेल.

मुंबई : सकाळी उठल्यावर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास शरीरास अनेक फायदे होतात. हळदीमध्ये अनेक महत्त्वाचे गुण असतात. मसाल्यापैकी महत्त्वाचा घटक असलेली हळद ही प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच. हळदीला आयुर्वेदातही महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचे सेवन शरीरासाठी चांगले मानले जाते. शरीरावर एखादी जखम होऊन रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर सगळ्यात आधी हळद लावली जाते. हळदीमुळे रक्तस्त्राव थांबतो. असे या हळदीचे एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने आरोग्यास मोठे फायदे होतात. सकाळी गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास होतील हे फायदे

१. अस्थमा, सायनोसायटिस आणि खोकल्यापासून सुटका

२. सतत तोंड येत असल्यास हे पाणी प्यावे

३. वाढत्या वयाच्या खुणा रोखणार हे पाणी

४. हे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित होते. मेटाबॉलिज्म नियंत्रित करुन शरीरातील जमा झालेले फॅट्स कमी करण्याचे काम करते.

५. रोगप्रतिकार क्षमता वाढते. ज्यामुळे वारंवार आजारी पडणारी समस्या दूर होते.

६. कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच ब्लॉक हटवतात. हृदयासंबाधित आजारांवर गुणकारी.

७. लिव्हरच्या आरोग्यसाठी हे पाणी लाभदायक आहे

मुंबई : फिट राहण्यासाठी ग्रीन टी घेण्याचा पर्याय अनेकजम निवडतात. सेलिब्रेटीही यात मागे नाहीत. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय.वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अतिशय फायदेशीर असल्याचे आपण जाणतोच पण त्याचबरोबर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ग्रीन टी पिणे उपयुक्त ठरेल. तुम्हाला आहे का ग्रीन टी घेण्याची सवय? नसल्यास ती लावून घ्या. कारण ग्रीन टी मुळे फक्त वजनच कमी होणार नाही तर आरोग्याच्या इतर अनेक समस्याही दूर राहतील. तर मग हे वंडर ड्रिंक्स घेण्यास कधीपासून सुरुवात करताय?

उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब असल्यास ग्रीन टी चे सेवन करा. यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

कोलेस्ट्रॉल
कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.

मधुमेह
शरीरात साखरेची पातळी वाढली असल्यास ग्रीन टी उपयुक्त ठरते. मधुमेहींनी जेवणानंतर ग्रीन टी चे सेवन करावे.

स्थुलता
ग्रीन टीच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होतो. ग्रीन टी घेतल्याने मेटाबॉलिझम सुधारते. परिणामी शरीरात फॅट्स जमा होत नाहीत.

कर्करोगाशी लढण्यासाठी
‘ग्रीन टी’ मध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीराला कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाशी अधिक सक्षमतेने लढण्यासाठी तयार करते. या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे शरीरात फ्री रॅडीकल्सचा प्रभाव कमी होतो. अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्या रॅडीकल्सचा वेळीच नाश करतात.

Dr. Ankita  Bora
Dr. Ankita Bora
MBBS, Adolescent Pediatrics Allergist, 2 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Sheetal Gulhane
Dr. Sheetal Gulhane
BAMS, Ayurveda Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Hellodox
x