Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळा संपत आला असला तरीही त्याचा तडाखा अजिबात कमी झालेला नाही. उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यां यांवर काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तात जास्त पाणी पिणे आवश्यक असते. मात्र याबरोबरच शहाळं पाणी, ताक, सरबते घेणेही आवश्यक असते. यात सर्वात उपयुक्त असे लिंबू सरबत उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास याची मदत होते. लिंबातल गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतातच मात्र साखर आणि मीठाचाही थकवा कमी होण्यासाठी चांगला उपयोग होतो. पाहूयात लिंबू सरबताचे आरोग्याला होणारे फायदे…

१. दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास लिंबूपाण्यामुळे मदत होते.

२. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वजन कमी करायचे असल्यास लिंबूपाणी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. साखर न घालता घेतलेले पाणी मधुमेहींसाठीही उपयुक्त असते. तसेच यामध्ये कॅलरीज नसल्याने शरीरात साठणारे फॅटस साठत नाहीत.

४. लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

५. दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

६. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.

हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. जिंजीवायटिस हा हिरड्यांसंबंधी एक प्रमुख विकार आहे. या आजारात हिरड्यांना सूज येते. बरचदा खाद्यकण अडकतात आणि हिरड्यांमध्ये साचून राहतात.
दररोज व्यवस्थित स्वच्छता न झाल्यास तोंडामध्ये संसर्ग उत्पन्न होतो आणि जिंजीवायटिसचा धोका बळावतो. गमलाईनच्या खाली हिरड्यांमधील पेशींना इजा होते आणि हिरड्या सूजतात. ही सूज प्राथमिक अवस्थेत असताना उपचार न झाल्यास प्रोडोन्टिटिस नामक गंभीर आजार उद्‌भवू शकतो. यामध्ये दात आणि जबड्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होते.

हिरड्या लाल होणे, सुजणे, ब्रश करताना रक्त येणे या लक्षणांवरुन जिंजीवायटिसचे निदान होऊ शकते. उपचारांना विलंब झाल्यास दात आणि हिरड्यांमध्ये एक पोकळी निर्माण होते. हिरडीची दातावरील पकड कमी होते. निर्माण झालेल्या या पोकळीत संसर्ग उत्पन्न झाल्यास मुखदुर्गंधीची समस्या उद्‌भवते. त्याचबरोबर जिभेची चव जाते.
ब्रश करताना दातांचीच नव्हे तर हिरड्यांचीही निगुतीने स्वच्छता व्हायला हवी. आहारात कॅल्शियमयु्क्त अन्नघटकांचे प्रमाण वाढवावे. दूध, पनीर यांच्या सेवनाने शरीराला कॅल्शियमचा योग्य पुरवठा होतो आणि दातांबरोबरच हिरड्या सुदृढ राहतात.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान वयातच शारीरिक दुखणी मागे लागतात. पाठदुखी, कंबरदुखी अशा प्रकारचे आजार सुरू होतात. या आजारांवर आता घरगुती उपाय करून ते बरे होऊ शकतात. ते कसे..?
रोज कमीत कमी वीस ते पंचवीस उठाबशा काढाव्या. त्यामुळे कंबरेचा घेर वाढत नाही.

जमिनीवर पालथे झोपून पाय एकमेकांना चिकटून ठेवावे. हात खालीच सरळ रेषेत ठेवावे. हळूहळू फक्त कंबरेचा भाग वर उचलावा व खाली करावा. ही क्रिया म्हणजेच अशा प्रकारचा व्यायाम केल्यासही कंबरदुखी थांबते.

हा व्यायाम तुम्हाला नियमित करावा लागेल.

तसेच दुसरी पद्धत म्हणजे पाठीवर झोपावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावे. पायांना हाताचा आधार देत एकदा डाव्या कुशीवर तर एकदा उजव्या कुशीवर वळावे. यामुळेही कंबरेचा घेर आटोपशीर राहतो.

जमिनीवर पाय फाकवून उभे राहावे. एकदा संपूर्ण शरीर उजवीकडे वळवावे तर काही वेळ त्या स्थितीत राहून नंतर डावीकडे शरीर वळवावे. हा व्यायाम हातात बॉल घेऊनही करता येतो. दोन व्यक्तीनी एकमेकांकडे पाठ करून वळून परस्परांकडे बॉल पास करण्याचा प्रयत्न केल्यास आपोआप हा व्यायाम होतो. त्यामुळेही कंबर सडपातळ राहते.

धू्म्रपान आणि मद्यपान करणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर एट्रियल फायब्रिलेशन (एएफ) नामक आजाराने ग्रस्त होण्याचा धोका असतो. या आजारामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात, त्यामुळे रुग्ण ह्रदयविकाराचा झटका, पक्षघात, स्मृतिभ्रंश आदींची शिकार ठरू शकतो.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अध्ययनानुसार, धू्म्रपान व मद्यपानामुळे 55 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये एट्रियल फायब्रिलेशन आजाराचा धोका सुमारे 37 टक्के जास्त असतो.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, आजाराच्या अल्पकाळ धोक्यासोबतच दीर्घकालीन धोक्याचा अंदाज बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे आजाराची जलद ओळख होण्यासोबतच जीवनशैलीमध्ये बदल करून तिला नियंत्रित करणे सोपे जाते.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 5 हजार लोकांच्या रक्तदाबाची आकडेवारी बॉडी मास इंडेक्स, मधुमेहासोबतच त्याचे धू्म्रपान व मद्यसेवानाची माहिती गोळा करण्यात आली.

डोळे हे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातला सर्वाधिक काळ आपण डोळ्यांनी विविध गोष्टी पाहत असतो. याच डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण, सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर येणारा ताण, अपुरी झोप ही डोळ्यांचे आरोग्य खराब होते. असे होऊ नये म्हणून आधीपासूनच काळजी घेणे आवश्यक असते. काही झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळे येणे, रांजणवाडी येणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. पाहूयात कोणते उपाय फायदेशीर ठरु शकतात.

कमी प्रकाशात काम करणे

अनेकदा रात्री अभ्यास किंवा ऑफीसचं काम करताना आपण कमी प्रकाशात काम करतो. मात्र कमी प्रकाशात लिखाण किंवा वाचन केल्याने तसेत लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांच्या शिरा ताणल्या गेल्याने डोळे थकल्यासारखे वाटतात. यामुळे डोकेदुखी तसेच डोळ्यांशी निगडीत इतर त्रास होण्याचीही शक्यता असते. अशाप्रकारे डोळ्यावर ताण आल्यास बघण्याचा केंद्रबिंदू अस्थिर होऊ शकतो.

रात्री उशीरापर्यंत जागरण

सध्या अनेकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ऑफीसमधून उशीरा येणे किंवा इतर कारणांनी रात्री उशीरापर्यंत जागरण होते. यामुळे कमी वयातच प्रिस्बियोपिया म्हणजेच जवळचं न दिसण्याची समस्या वाढते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास बळावण्याचीच शक्यता जास्त असते.

मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रिनमुळे उद्भवणाऱ्या समस्या

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांच्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या नाजून भागावर परिणाम होतो. या स्क्रीनच्या रेडिएशनमुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, कोरडे होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा तक्रारींमुळे अनेकांना चष्माही लागतो. परिणामी हा त्रास इतका वाढतो की डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या उपकरणांपासून योग्य ते अंतर ठेवूनच उपाय करणे आवश्यक आहे.

खाण्याच्या सवयी

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. जंक फूड आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा यांमुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते. या समस्यांमुळे रेटीनल डिजनरेशन तसेच वयस्कर लोकांमध्ये यामुळे मोतीबिंदू आणि लहान मुलांमध्ये मायोपिया यांसारख्या समस्या उद्भवतात.

डोळ्यांचा मेकअप

अनेक महिला आणि मुली जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी डोळ्यात काजळ घालतात, मस्कारा, आय लायनर अशा अनेक सौंदर्यप्रसाधनांचा दैनंदिन वापर करतात. पण ही प्रसाधने चांगली नसल्यास त्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले दिसणे महत्त्वाचे असतानाच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Amruta Siddha
Dr. Amruta Siddha
MBBS, ENT Specialist, 9 yrs, Pune
Dr. Suryakant Bhise
Dr. Suryakant Bhise
BAMS, Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Aradhana Patkar
Dr. Aradhana Patkar
Specialist, Gynaecologist Infertility Specialist, 4 yrs, Pune
Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune
Hellodox
x