Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. Shivam Jain # ENT Specialist Family Physician
HelloDox Care
Consult

Some fortunate women have painless periods, while others struggle with painful cramps (#dysmenorrhea)! Some even compare it to early labour contractions. What happens, is the muscle of the walls of your #uterus contract and a chemical called “#prostaglandin” is released from the lining of the uterus. This substance increases the strength of the contractions. The cramps can range from mild to unbearable & occur 1 or 2 days before your period, lasting for 2 to 4 during your period. Some women can experience #nausea, #vomitting, #diarrhoea and #dizziness.

>> For easing the menstrual cramps :-
- Apply heat rub to your lower abdomen and back to relax your muscles. A hot shower or bath and a hot water bottle/bag will help.
- Over-the-counter (OTC) medication can help. Stick to painkillers like #ibuprofen, #aspirin or #paracetamol.
- According to Medical Studies, #VitaminB1, #VitaminD, #VitaminE, #Magnesium, #Omega-3 fatty acids and #CalciumCitrate, can help with menstrual pain.
- Yoga and other stretching exercises can ease the cramps.
- #Bloating is a common problem during these days. Cut down on your salt, sugar, caffeine and alcohol for this time, as these are bloating triggers.
- Recommended #BirthControlPills can balance your hormones and lessen heavy flow.

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांना कोणतंही काम करताना त्रास होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना तुम्ही योगाभ्यास करून दूर करू शकता.

आपल्यापैकी अनेक जणींना याबाबत योग्य माहिती नसते. मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी मर्जरी आसन आणि वक्रासनाची मदत घेऊन दूर करू शकता. या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि क्रॅम्सचा वेदना दूर केल्या जाऊ शकतात.

मर्जरासन केल्याने मिळेल आराम

मर्जरासन करण्यासाठी सर्वात आधी गुडघ्यावर जमिनिवर बसा आणि आपले दोन्ही हात पुढे करून एखाद्या प्राण्याप्रमाणे उभे राहा. तुमचे हात आणि गुडघे एका सरळ रेषेमध्ये असणं आवश्यक आहे. तुमचे गुडघे एकत्र आणि त्यामध्ये थोडे अंतर असणं गरजेचं आहे. ही सुरुवातीची मुद्रा आहे. यानंतर श्वास घ्या आणि आपला चेहरा बाहेरच्या बाजूस घेऊन या. त्यानंतर श्वास सोडा आणि त्यानंतर तुमची हनुवटी छातीच्या दिशेला घेऊन जा. असं कमीत कमी 10 वेळा तरी करा.

फायदा

मासिक पाळीसंबंधातील सर्व समस्या आणि ल्यूकोरियाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी हे आसन केल्यामुळे आराम मिळतो. त्याचबरोबर हे या दिवसांत होणाऱ्या वेदना आणि क्रँम्प्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात.

वक्रासन देखील फायदेशीर

वक्रासन केल्यामुळे सर्वात आधी आपले पाय पसरून जमिनिवर बसून घ्या. त्यानंतर तुमचा उजवा पाय गुडघ्या दुमडून पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघअयाजवळ घेऊन जा. त्यानंतर श्वास घ्या आणि तुमचा डावा हात स्ट्रेच करा. श्वास सोडताना आपल्या डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन जा. त्यानंतर आपला उजवा हात मागे कंबरेवरती घेऊन जा. त्याचबरोबर आपल्या मानेलाही उजव्या बाजूला फिरवा. या मुद्रेमध्ये काही वेळ रहा आणि सामान्य श्वास घेत रहा. थोड्या वेळानंतर सामान्य मुद्रेमध्ये या. अशाचप्रकारे दुसऱ्या बाजूलाही करा.

फायदा

मासिक पाळीदरम्यान होणारं पाठ आणि कंबरेचं दुखणं दूर करण्यासाठी मदत करतं.

टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते.

भुजंगासन
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.

पवनमुक्तासन
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात.

वज्रासन
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.

अधोमुख शवासन
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.

सर्वांगासन
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

गर्भवती महिलांसाठी योगास चांगला व्यायाम म्हणून योगाची शिफारस केली जाते: ते शरीराचे अवयव, स्नायू स्नायू ठेवते आणि तणाव मुक्त करते. पण हे सावधानतेने येते, काही चेतावणी धोकादायक असू शकतात आणि सर्व योग हळूहळू केले पाहिजे. गर्भधारणेच्या शेवटच्या आठवडे योगायोगाने अनेक महिलांना भीती वाटते.

जर्नल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉकॉलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित आणि हार्वर्ड हेल्थ ब्लॉगमध्ये प्रकाशित केलेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की गर्भधारणेमध्ये बरेच उशीर होईपर्यंत बर्याच योगाचे पोझेस सुरक्षित असतात - ज्यांची पूर्वी शिफारस केलेली नाही.

नेपच्यून, न्यू यॉर्क येथील जर्सी शोर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधकाने केलेल्या संशोधनात, 25 निरोगी महिला होत्या ज्यात 35 ते 38 आठवड्याचे गर्भवती होते. दहा नियमितपणे योगाचे योग, आठ योगाशी परिचित होते आणि सातंना योगाचा अनुभव नव्हता. योग प्रशिक्षकांसह एक-एक सत्रांमध्ये, महिलांनी 26 योगाभ्यास केले. काही प्रकरणांमध्ये, महिलांना खुर्च्या किंवा भिंतीच्या मदतीने स्वतःला समतोल राखण्याची परवानगी देण्यात आली.

पोझात चार गोष्टींचा समावेश आहे की काही तज्ज्ञांनी गर्भवती स्त्रियांकडे गर्भधारणा केली आहे: श्वासोच्छ्वास, शोक बाळगणे, मुलाचे डोके आणि खाली डोके असलेला कुत्रा.

पण सर्व 26 दिवसांमध्ये, सर्व स्त्रियांकडे, आई आणि बाळ दोघांचेही सामान्य लक्षण सामान्य राहिले, स्त्रिया सुरक्षित आणि आरामदायक वाटल्या आणि खालील 24 तासांच्या आत संकुचन किंवा योनि रक्तस्त्राव यासारख्या कोणत्याही समस्या येत नाहीत. (तीन स्त्रियांना काही स्नायूंचा त्रास झाला परंतु अद्याप त्यांना अनुभव आवडला.)

हार्वर्ड लेखात असे आढळून आले आहे की बहुतेक महिलांना गर्भधारणेदरम्यान चिंता वाटते आणि 13 टक्के गर्भवती महिलांना नैदानिक ​​नैराश्याचा अनुभव येतो. "हे अभ्यासा ... वाढत्या वैज्ञानिक पुराव्यास जोडते की गर्भधारणेदरम्यान तणाव, चिंता आणि निराशा कमी करण्यासाठी योग एक उपयुक्त, सुरक्षित साधन आहे," असे मर्लिन वी यांनी लिहिले.

गोमुखासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे. नंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गायीच्या तोंडाच्या आकाराच्या दुमडलेल्या मांड्या एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली एकमेकांना गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. श्‍वसन संथ ठेवावे. अशा स्थितीत स्थिर राण्याचा प्रयत्न करावा. गोमुखासन हे जसे डाव्या बाजूने करतात तसेच ते उजव्या बाजूनेही करता येते. त्यावेळी उजवा हात खालून वर व डावा हात वरून खाली पाठीवर दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी केलेले गोमुखासन आपल्या हातापायांना चांगलाच व्यायाम देते. गुडघ्याचे सर्व आजार या आसनाने दूर होऊ शकतात. बगलेमध्ये जर गाठ आली असेल तर तीदेखील बरी होण्यास मदत होते. या आसनाने अतिरिक्‍त चरबी घटते. नाडी शुद्ध होते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, हातापायांचे स्नायू, दंड यामधील कार्य सुधारायला मदत होते. पहिल्यांदा दोन्ही हात पकडता येत नाही. या आसनामुळे स्त्री-पुरुषांचा लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित होतो. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार बरे होतात. पायांमध्ये ताकद येते. पोटऱ्यांचा मांसलपणा कमी होतो. आपल्या सीटवर चढलेली चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांना कमनीय बांधा टिकवायचा असेल तर त्यांनी रोज न चुकता गोमुखासन करावे.

स्थुलत्व प्राप्त झालेल्या लोकांना आपल्या जाडीमुळे हे आसन करायला त्रास होतो. पण तरीही त्यांनी जमेल तेवढे व जमेल तसे गोमुखासन नियमित करावे. पाय गुडघ्यात दुमडून नितंबाला असा काही लावावा की ज्याने नाभीचे कार्य कार्य योग्यप्रकारे चालू राहते व नाडी शुद्ध होते. आपल्या गुडघ्यांचा आकार पाय दुमडून गुडघे एकमेकांवर ठेवल्यामुळे अगदी गायीच्या तोंडासारखा होतो. हिंदूधर्मात गाईला पवित्र मानतात, योगामध्ये देखील हे आसन ध्यानासाठी पवित्र मानले आहे. फक्‍त ध्यान करताना मान सरळ ठेवावी. अनाहत चक्रावर या आसनात दाब पडतो.
पुरुषांनी हे आसन नियमित केल्यास अंडकोष आणि शुक्राणूंची वाढ होते. वीर्यविकारांना दूर करणारे गोमुखासन हातापायांच्या स्नायूंबरोबरच शरीराची स्नायूसंस्था मजबूत बनवते. मन एकाग्र करायचे असेल तर गोमुखासन रोज करावे. समागमाचा आनंद स्त्री आणि पुरुष दोघांनाही या आसनामुळे प्राप्त होतो म्हणून स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे आसन नियमित केले पाहिजे.

या आसनात जास्तीत जास्त मनामध्ये सावकाश वीस अंक मोजून स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. “स्थिरम्‌ सुखम्‌ आसनम्‌’ या योगातील उक्तीचा प्रत्यय हे आसन नियमित करणाऱ्यांना येतो. कालावधी हळूहळू वाढवावा. मूळव्याध व मधुमेह असणाऱ्यांनी हे आसन रोज करावे. ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहे अथवा पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा कृत्रिम हाड रोपण हातापायांमध्ये करण्यात आलेले आहे, अशांनी गोमुखासन करू नये. जेवढी स्थिरता वाढेल तेवढे या आसनाचे फायदे आपल्याला मिळतील. प्रवास करून करून शिणलेल्या हातापायांना शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यासाठी हे आसन करावे. मधुमेहाप्रमाणेच अंगावरील कोड जाण्यासही गोमुखासन मदत करते.

Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Jalpa Desai
Dr. Jalpa Desai
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 6 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Hellodox
x