Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

रोज योगसाधना केल्यास शुक्राणूंचा दर्जा सुधारतो, त्यामुळे वंध्यत्वाच्या काही प्रकारांवर मात करता येते, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या एका अभ्यासात म्हटले आहे. नेचर रिव्ह्य़ू युरॉलॉजी या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे, की डीएनएतील बिघाडामुळे शुक्राणूंचा दर्जा घसरतो, त्यामुळे होणारी संतती आरोग्यसंपन्न असतेच असे नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या शरीरशास्त्र व युरॉलॉजी, ऑबस्टेट्रिक्स व गायनॅकॉलॉजी या शाखांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे.

प्रमुख संशोधक प्राध्यापक डॉ. रीमा दाडा यांनी सांगितले, की शुक्राणू जर दर्जेदार नसतील, तर वंध्यत्वाची शक्यता असते त्यामुळे वारंवार गर्भपात होतात, जन्मत: दोष निर्माण होतात. हे सगळे शुक्राणूचा डीएनए खराब असेल तर होते. डीएनए खराब होण्याचे कारण ऑक्सिडेटिव्ह ताण हे असते. ऑक्सिडेटिव्ह ताण हा मुक्त कणात वाढ व शरीराच्या ऑक्सिजन क्षमतेतील घट यामुळे निर्माण होतो.

पुरुषातील शुक्राणू पेशी या ताणाला बळी पडत असतात. प्रदूषण, कीटकनाशके, कीडनाशके, विद्युतचुंबकीय प्रारणे यांचा त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. हे सगळे घटक काही सुधारणांनी टाळता येतात. त्यात जीवनशैलीत बदल हा महत्त्वाचा घटक आहे. रोज योगसाधना केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. डीएनएची हानी कमी होते व टेलोमीअरची लांबी कमी होत नाही म्हणजेच आपले आयुष्य वाढण्याचे ते निदर्शक असते. २०० पुरुषांचा सहा महिने अभ्यास केल्यानंतर त्यांच्यात शुक्राणूंवरील ऑक्सिडेटिव्ह ताण २१ दिवसांनी कमी झाला व त्यांच्या डीएनएचा दर्जाही उंचावला. शुक्राणूंचे वहनही सुधारले. योगसाधनेमुळे वार्धक्याची प्रक्रिया कमी वेगाने होते. टेलोमीअरची लांबी कायम ठेवली जाते त्यामुळे दीर्घायुष्य लाभते.

मुंबई : आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. योग ही अशी साधना आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे भूक कमी लागण्याच्या समस्येवरही परिणाम करते. म्हणून जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर ही योगासने नक्की करा.

पवनमुक्तासन
हे आसन भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनात ४०-५० सेकंद रहा आणि ४-५ वेळा याची आवर्तने करा.

वज्रासन
रक्तप्रवाह, भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. या आसनात कमीत कमी मिनिटभर रहा आणि रोज करताना हळूहळू वेळ वाढवत न्या.

बद्धकोणासन
भूक न लागण्याची समस्या असेल तर हे आसन करणे फायद्याचे ठरेल. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन यावर आराम मिळतो. पण हे आसन आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करा. नियमित केल्याने त्यावर पकड येईल.

शशांकासन
या आसनामुळे पोट आणि पोट्याच्या स्नायूंना उत्तम मसाज मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

चिन्मय मुद्रा
या मुद्रेमुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. पचनतंत्र सुधारुन भूक वाढवण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. चिन्मय मुद्रा करताना २-३ मिनिटे श्वास घ्या आणि आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या.

मुंबई : अलिकडच्या काळात योगाबद्दल लोकांमध्ये चांगली जागृती झाली आहे. पण योगासनांमुळे तुम्ही फक्त फिट आणि हेल्दी राहत नाही तर ताणही कमी होतो. योगासनांचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. एक असे आसन आहे जे केल्यामुळे तुमची एनर्जी, स्टॅमिना वाढत नाही तर त्याचा ताण दूर करण्यासही फायदा होतो. या आसनाचे नाव आहे अधोमुख श्वानासन.

फायदे
तणाव दूर करण्यासाठी हे आसन अधिक परिणामकारक ठरतं. या आसनामुळे खांदे, हातांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो व ते मजबूत होतात. त्याचबरोबर मासिक पाळीत किंवा मेनोपॉजच्या वेळेस होणाऱ्या त्रासावर या आसनाने आराम मिळतो.

आसन करण्याची पद्धत
-सर्वात आधी पोटावर झोपा. त्यानंतर पाऊलं बोटांवर ठेवा.
-हात छातीच्या बाजूला घेत हात आणि पायांच्या बोटाच्या आधारावर संपूर्ण शरीर वर उचला. डोके दोन्ही हातांच्या मध्यातून खाली घाला.
-या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
-त्यानंतर हळूहळू आसन सोडा.

काय काळजी घ्यावी?
-प्रेग्नंसीमध्ये हे आसन करताना पायात थोडे अंतर ठेवा. काही त्रास होत असल्यास तज्ञांच्या मदतीने हे आसन करा.
-पाठ किंवा खांदेदुखी असल्यास हे आसन करणे टाळा.
-उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनीही हे आसन करु नये.
-हात, मनगटाचे काही दुखणे असल्यास हे आसन करणे टाळा.

Dr. Amit Gupte
Dr. Amit Gupte
BDS, Dentist, 18 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Dr.Rajendra  Chavat
Dr. Dr.Rajendra Chavat
MBBS, Family Physician, 35 yrs, Pune
Hellodox
x