Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

किटो डाएटने एका आठवड्यात कमी करु शकता ३ ते ४ किलो वजन!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट समोर येत आहेत. लोकही वाढलेल्या वजनाला वैतागलेले असल्याने फिट राहण्यासाठी या डाएटचा आधार घेत आहेत. आता केटोजेनिक डाएट वजन कमी करण्यासाठी फार चांगला पर्याय असल्याचं बोललं जात आहे. या डाएटला सामान्य भाषेत किटो डाएट म्हटलं जातं. मात्र किटो डाएट ही एक मेडिकल डाएट असून ही डाएट एखाद्या एक्सपर्टच्या देखरेखीत फॉलो केली गेली पाहिजे. जेणेकरुन कोणतीही आरोग्यदायी समस्या होऊ नये.

बॉडी मसल्सही होतात मजबूत

काही दिवसांपूर्वीच किटो डाएटची जोरदार चर्चा रंगली होती. कारण रणवीर सिंगने त्याच्या लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी किटो डाएट सुरु केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्याने हा डाएट प्लॅन फॉलो करुन ७ दिवसात ३ ते ४ किलो वजन कमी केलं होतं. किटो डाएटमुळे वजन तर कमी होतच, सोबतच बॉडी मसल्सही मजबूत होतात. चला जाणून घेऊ काय आहे किटो डाएट...

काय आहे किटो डाएट?

किटो डाएट करुन शरीराला किटोसिस स्थितीमध्ये आणलं जातं. किटोसिस ही शरीराची एक मेटाबॉलिक स्थिती आहे. ज्यात शरीर फॅटचा वापर ऊर्जेच्या रुपात करतं. त्यामुळेच हा डाएट प्लॅन फॉलो शरीराची गरज, उंची आणि वजन यानुसार प्लॅन केला जातो. या स्थितीत शरीर ब्लड ग्लूकोजऐवजी फॅटचे तुकडे तोडून ऊर्जेच्या रुपात वापरतं. याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते.

किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं दररोज २० ते ५० ग्रॅम सेवन करावं लागतं. म्हणजे या डाएटमध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त हाय फॅट पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र जेव्ह आपण फार जास्त कोर्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातो तेव्हा शरीरात ग्लूकोज तयार होतं. ग्लूकोजला शरीरा सहजपणे ऊर्जेत रुपांतरित करतं.

पण किटोजेनिक डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं जातं. ज्यामुळे शरीरात किटोसिसची स्थिती निर्माण होते. किटोसिस एक अशी स्थिती आहे, ज्यात जेवण कमी केल्यानंतरही आपल्याला जिवंत ठेवण्यास मदत मिळते. ज्यात शरीर ग्लूकोजऐवजी फॅटचा ऊर्जेसाठी वापर करतं.

हाय फॅट डाएट

लो कार्ब आणि हाय फॅट डाएट हाच किटो डाएटचा मुख्य आधार असतो. पण हा डाएट प्लॅन आणखी प्रभावी करण्यासाठी यासोबत काही ड्रिंक्स घेण्याची गरज आहे. याने तुम्ही तुमचं शेड्युल योग्यप्रकारे प्लॅन करु शकता.

बॉडी डिटॉक्स

लिंबू आणि मिंटचा ज्यूस तुमच्या वजन कमी करण्याच्या प्लॅनचा महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे रोज सकाळी हा ज्यूस आवर्जूज घ्यावा. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत मिळते. म्हणजे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात. याने तुमचा वजन कमी करण्याचा प्लॅनही वेगाने काम करु लागतो.

पालक-टोमॅटोची स्मूदी

पालक उकळून घ्या. नंतर ती मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये टोमॅटो टाकून बारीक करा. ही स्मूदी वजन करण्यास मदत करते. सोबतच याने तुमचं पोट साफ होण्यासही मदत मिळते.

फॅट क्रिम मिल्क

तुमचा डाएट प्लॅन हाय फॅट आणि लो कार्बची असेल तर तुम्ही फूल फॅट क्रिम असलेलं दूध सेवन करावं. सकाळी आणि सायंकाळी या दुधाचा समावेश डाएटमध्ये करावा. हवं असेल तर तुम्ही दुधाची स्मूदीही तयार करु शकता. यात तुम्ही रेड बेरीजही टाकू शकता. तसेच दुधात बदाम टाकूनही सेवन करु शकता.

Published  

महागडे उपाय विसरा, घरातील ही ६ कामे करुन तुम्ही राहाल स्लिम आणि फिट!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वाढलेलं वजन कमी करण्याचं आव्हान अनेकांसमोर उभं ठाकलं आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण तणावात येतात आणि वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय करतात. काही लोक तर वजन कमी करण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी वाट्टेल ते काम करतात. स्पेशल डाएटपासून ते जिममध्ये तासंतास घाम गाळण्यापासून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, घरातील काही खास कामे करुन कॅलजीज बर्न केल्या जाऊ शकतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. चला जाणून घेऊ घरातील काही कामे ज्याव्दारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीही बर्न करु शकता आणि घरातील कामेही पूर्ण होतील.

लादी पुसणे

घरातील लादी पुसणे हे फार मेहनतीचं आणि शारीरिक हालचाल अधिक होणारं असतं. या दरम्यान व्यक्ती स्क्वाट आणि क्रॉल करतो, या दोन्ही गोष्टी पायांसाठी व्यायामाप्रमाणे आहेत. लादी पुसताना कंबरेची सतत हालचाल होत असल्याने फॅट कमी करण्यासही मदत मिळते. दररोज घरात २० मिनिटे लादी पुसल्यास तुम्ही १५० कॅलरीज बर्न करु शकता.

कपडे धुणे

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे आजकाल जवळपास जास्तीत जास्ती घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. कुणी सेमी-ऑटोमॅटिक मशीनचा वापर करतात, तर काही लोक पूर्ण ऑटोमॅटिक मशीनचा वापर करतात. पण हातांनी कपडे धुण्याचे तुम्हाला फिटनेससाठी अनेक फायदे होतात. हाताने कपडे धुतल्याने तुम्ही १३० कॅलरी बर्न करु शकता.

भांडी घासणे

भारतात सध्यातरी डिश वॉशरची लोकप्रियता फार वाढली नाहीये. पण घराघरात धुणी-भांडी करण्यासाठी नोकर ठेवले जातात. पण याने नुकसान तुमचंच होतं. उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने तुम्हाला जवळपास १२५ कॅलजी बर्न करण्यास मदत मिळते. याचा दुसरा फायदा म्हणजे नोकर जशी भांडी घासतात त्यापेक्षा तुम्ही स्वत: चांगली आणि काळजीने भांडी स्वच्छ करु शकता.

स्वत: जेवण बनवणे

आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये पती-पत्नी दोघोही नोकरी करतात. अशात त्यांना स्वत:साठीही जेवण तयार करण्याचा वेळ नसतो. त्यामुळे त्यासाठीही नोकर ठेवले जातात. पण नोकर तुमच्या आरोग्याच्या डाएटची किंवा फिटनेसची काळजी घेऊन जेवण तयार करणं कठिण आहे. स्वत: जेवण तयार करण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर तुम्ही तुम्हाला हवं तसं आणि हवं ते तयार करु शकता. तसेच जेवण तयार करतानाच्या पूर्ण प्रक्रिये दरम्यान उभं राहिल्याने तुम्ही साधारण १०० कॅलरीज बर्न करु शकता.

घराची साफसफाई

घरात धूळ-माती होणे ही सामान्य बाब आहे. ही धूळ-माती कुणालाही न आवडणारीच असते. पण ती स्वच्छ करण्यासाठी नोकराची वाट बघू नका. याने तुमच्या आरोग्यलाही नुकसान पोहोचतं. त्यामुळे स्वत: जर तुम्ही हे काम केलं तर ते चांगलंही होईल आणि याने तुम्ही १२५ कॅलरी बर्न करु शकाल.

पीठ मळणे

चपात्या करण्यासाठी पीठ मळणे हे काम तसं कुणासाठीही कंटाळवाणंच आहे. पण पीठ मळण्याचा फायदा म्हणजे तुम्ही याच्या मदतीने कॅलरी बर्न करु शकता. पीठ मळताना लागणारी ताकद आणि हातांची क्रिया यामुळे तुम्ही ५० कॅलरी बर्न करु शकता.

Published  

जिर्‍याचा 'असा' कराल वापर तर 2 महिन्यात हमखास घटवाल वजन

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकजण सकाळी उठून जीममध्ये जायला कंटाळा करतात. कधी मुसळधार पाऊस तर कधी सकाळचा अल्हाददायक गारवा यामुळे गोधडी गुंडाळून झोपून जावं असं तुम्हांला वाटत असेल. पण सकाळच्या मुसळधार पावसामुळे जीममध्ये जाणं वारंवार घडत असेल तर तुमच्या वजनाचा काटाही वाढत राहणार. अशावेळेस काही घरगुती उपायांनी तुम्ही वजन घटवू शकता.

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ वजन घटवण्यास मदत करतात. अशापैकी एक म्हणजे जिरं. पचन सुधारण्यासोबतच शरीराच्या मेटॅबॉलिक रेटला चालना देण्यासाठी जिरं मदत करतं. त्यामुळे परिणामकारक आणि सुरक्षितपणे वजन घटवण्यासाठी जिरं फायदेशीर आहे. ...

वजन घटवण्यासाठी कसा कराल जिर्‍याचा वापर
दोन चमचे जिरे आणि कपभर पाणी हे मिश्रण एकत्र उकळा.

जिर्‍याचं पाणी उकळल्यानंतर ते गाळा.

हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरते.

हा उपाय नियमित आठ आठवडे किंवा तीन महिने सलग केल्यास परिणामकारकपणे वजन घटवण्यास मदत होते.

Published  

अचानक वजन घटते?

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.


मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

Published  

भेंडी करेल वजन कमी

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:

* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

*मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

*भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

*भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

Dr. Anup Gaikwad
Dr. Anup Gaikwad
BHMS, Family Physician Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Snehal  Charhate
Dr. Snehal Charhate
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Dr. Kamlesh Manikhedkar
Dr. Kamlesh Manikhedkar
BDS, Dental Surgeon, 9 yrs, Pune
Hellodox
x