Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

जेव्हा वजन कमी करण्याबाबत चर्चा होते तेव्हा तुम्ही फॅट बर्न आणि कॅलरी बर्न असे शब्द ऐकले असतील. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, फॅट बर्न आणि कॅलरी बर्नमध्ये नक्की फरक काय? किंवा वजन कमी करण्यासाठी फॅट बर्न फायदेशीर ठरतं की, कॅलरी बर्न? खरं तर या प्रश्नांची उत्तर जाणून घेतल्याशिवाय तुम्ही तुमचा वजन कमी करण्याचा निश्चय अजिबात पूर्ण करू शकत नाही. कारण फॅट बर्न आणि कॅलरी बर्न दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून या सर्वांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.

वजन कमी करण्यासाठी काय आहे आवश्यक?

फॅट बर्न असो किंवा कॅलरी बर्न दोन्ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने पाहत असाल तर, फॅट बर्न सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. परंतु, यासाठीही कॅलरीवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण जर आहारातून तुम्ही जास्त कॅलरी घेत असाल तर तुम्ही फॅट बर्न करण्यासाठी सफल होणार नाही.


फॅट आणि कॅलरी बर्न यांमधील मुख्य अंतर काय?

आपण जे काही खातो किंवा पितो, त्यांमधून मिळाऱ्या कॅलरी शरीर उपयोग करून खर्च करतो किंवा ज्या काही उरतात त्या उर्जेच्या रूपात संग्रहित होतात. शरीर आपल्या प्रक्रियेनुसार, अतिरिक्त कॅलरी ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करतात. जे फॅट्सच्या रूपात पेशींमध्ये जमा होत राहतं.

जेव्हा तुम्ही शारीरिक मेहनत किंवा शारीरिक कष्टाची कामं करता, तेव्हा शरीर लगेच कॅलरीचा उपयोग करतं. परंतु, जेव्हा कॅलरीची कमतरता असते, त्यावेळी शरीर फॅट बर्न करण्यास सुरुवात करतं.

जेव्हा तुम्ही कमी कॅलरी डाएट घेता आणि एक्सरसाइज वाढवता. त्यावेळी शरीरातील पेशींमध्ये जमा झालेल्या फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळेच तुमचा वेट लॉस प्लॅन व्यवस्थित काम करण्यास मदत करतो.

दोघांमध्ये असा साधा ताळमेळ...

वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी फॅट आणि कॅलरी बर्न करण्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक असतं. जर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केलं नाही तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

वजन कमी करण्याचा विषय निघाला की वेगवेगळे डाएट प्लॅन समोर येतात. वेगवेगळ्या एक्सरसाइज आठवू लागतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज निवडण्याची गरज असते. डाएटच्या वेगवेगळे पर्यायांपैकी एक चांगला पर्याय म्हणजे पालक. पालक भाजीच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे. याने तुमच्या कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेल.

पालक भाजीमध्ये कॅलरी नियंत्रित करणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे एक मुख्य तत्व आहे ज्याने वजन कमी करणं सोपं होतं. यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या रिसर्चमध्ये आढळले की, काही महिला तीन महिन्यांपासून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होत्या. यातील ज्या महिलांनी दररोज साधारण पाच ग्रॅम पालकाचं सेवन केलं, त्यांना वजन कमी करण्यास अधिक मदत मिळाली.

पालक भाजीचा फायदा कसा होतो?

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारातून कमी कॅलरी घेणं गरजेचं असतं. एक कप पालकमध्ये केवळ ७ कॅलरी असतात. तर फायबरमुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे सतत काहीना काही खाऊन शरीरात एक्स्ट्रा कॅलरीही जमा होत नाहीत.

पालकातून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळत, ज्याने कॅलरी नियंत्रित होतात. त्यामुळे पालक भाजीचा समावेश आहारात करा. तुम्हाला काही दिवसातच याचा फरक बघायला मिळेल.

पालक भाजीचे इतर फायदे

पालक ही आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी मानली जाते. एक कप पालकमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही कंट्रोलमध्ये राहतो. रक्तदाबाचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यास पोटॅशिअम महत्त्वाची भूमिका बजावतं.

फायबर असलेल्या पदार्थांमुळे पचनक्रिया चांगली होते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि यामुळेच आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसातून एक कप पालक तुमची पचनक्रिया मजबूत करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालक भाजीचा समावेश करून तुम्ही वजन करण्यासोबतच आरोग्यही चांगली ठेवू शकता.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ही डाएट सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला एकदा घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या डाएटचा प्रभाव पडत असतो.)

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्यांचा सामना करत आहात का? मग आता टेन्शन सोडा, आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपा उपाय सांगणार आहोत. आतापर्यंत तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असतील. पण हा उपाय अत्यंत सोपा आणि फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा देणाऱ्या डाएटची गरज असते. कारण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी डाएट घेत असाल तर ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. परंतु, या वेट लॉस डाएटमुळे तुम्ही तुमचं वजन अगदी सहज कमी करू शकता आणि ऊर्जेची कमतरताही भासणार नाही.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, वाढत्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डायबिटीस, हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर यांसारखे अनेक आजार जडण्याचाही धोका असतो. तरिदेखील आपण सर्वचजण आपल्या वाढणाऱ्या वजनाकडे दुर्लक्षं करतो. आम्ही येथे कोथिंबीर, लिंबू, काकडी, आलं या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या अशा वेट लॉस डाएटबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे काही आठवड्यातच वजन कमी होण्यासाठी मदत होते.

या पदार्थाचं सेवन कधी करणं फायदेशीर :

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज टिप्स फॉलो करत असता त्याचवेळी तुम्ही या पदार्थाचंही सेवन करू शकता. यासाठी तुम्हाला विशेष तयारीही करावी लागत नाही.

घरामध्ये अगदी सहज आढळून येणाऱ्या 4 पदार्थांचा वापर करून तुम्ही अगदी सहज हा पदार्थ तयार करू शकता. यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. वेट लॉस डाएट तुम्ही दररोज रात्री झोपताना घेऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासोबतही याचं सेवन करू शकता.

हा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :

- कोथिंबीर
- काकडी
- लिंबू
- कोरफडीचा ज्यूस

असं करा तयार :

- सर्वात आधी कोथिंबीरी धुवून त्याची पानं वेगळी करून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडीचे तुकडे घेऊन त्यामध्ये लिंबाचे पातळ स्लाइस एकत्र करा.
- 30 मिली ग्रॅम कोरफडीचा ज्यूस मिक्सरमध्ये एकत्र करा.
- सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्या.
- तुमचं वेट लॉस हेल्दी ड्रिंक तयार आहे.

वजन कमी करण्यासाठी करतं मदत :

- हे हेल्दी ड्रिंक वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कोथिंबीरीमध्ये आढळून येणारं बिटा कॅरेटिन आणि व्हिटॅमिन सी वजन कमी करतं.
- याव्यतिरिक्त ड्रिंक तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्व पदार्थ मेटाबॉलिज्म वाढवतात आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
- हे ड्रिंक तुम्हाला ओव्हर इटिंगपासून दूर ठेवतं. ज्यामुळे तुम्ही जास्त कॅलरीपासून दूर राहतात.
- या ड्रिंकच्या सेवनाने शरीरामध्ये जमा झालेले एक्स्ट्रा फॅट्स बर्न होण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि डाएटकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेकांना व्हिटॅमिन कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतोय. कोणत्याही प्रकारचं व्हिटॅमिन जर शरीरात कमी झालं जर त्या लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिनपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन एन(N) असतं. हे व्हिटॅमिन कमी झालं तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. शरीरात जर व्हिटॅमिन एनचं योग्य प्रमाण असेल तर अस्थमा आणि हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी असतो. तसेच व्हिटॅमिन एनच्या सेवनाने लठ्ठपणाही कमी होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे व्हिटॅमिन घ्यायला हवं.


शरीरात जर व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात राहिलं तर हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजार होत नाहीत किंवा या आजारांचा धोका कमी राहतो. पण हे व्हिटॅमिन शरीराला शुद्ध वातावरण आणि निसर्गातून मिळतं. चला जाणून घेऊ व्हिटॅमिन एनमुळे कोणकोणत्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो.

अस्थमापासून बचाव

व्हिटॅमिन एन जर तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर तुम्हाला अस्थमाचा धोका नसतो. जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यान घालवला तर लोकांचे फुप्फुसाचे रोगही कमी होतात.

वजन करा कमी

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जे लोक व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात घेतात, त्यांना लठ्ठपणा होण्याची समस्या होत नाही. जे लोक निसर्गाच्या जवळ जास्त वेळ राहतात त्यांचं आरोग्य फिट राहतं आणि त्यांचा मेंदूही चांगला काम करतो.

हृदय राहतं निरोगी

जसे की, तुम्हाला माहिती पडले की, व्हिटॅमिन एन निसर्गाच्या आजूबाजूला राहून मिळतं. जे लोक निसर्गाच्या जवळ राहतात त्यांना हृदयासंबंधी आजार फार कमी होतात. नैसर्गिक वातावरणात फिरणे, व्यायाम करणे आणि राहिल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं.

स्मरणशक्ती राहते चांगली

शुद्ध हवा आणि वातावरणात राहिल्याने मानसिक थकव्यापासून आराम मिळतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते. एका रिसर्चनुसार, साधारण ५० मिनिटांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणाऱ्या लोकांच्या व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली राहते.

अल्झायमरचा धोका कमी

स्ट्रेस आणि डिप्रेशनमुळे सध्याच्या लोकांना अल्झायमरचा धोका अधिक वाढतो आहे. अशात निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्ही या गंभीर आजाराचा धोका कमी करू शकता. अल्झायमर एक अशी समस्या आहे ज्यात जास्तीत जास्त एक्सरसाइज करणे आणि झाडांच्या सानिध्यात राहिल्याने फायदा मिळतो.

अर्थात हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन एन असेल. जर तुम्हालाही हे आजार दूर ठेवायचे असतील आणि वजन कमी करायचं असेल तर व्हिटॅमिन एनचं प्रमाण चेक करा.

वजन कमी करायचं असेल तर लोकांना जिम जाण्याचा सल्ला दिला जातो. वेट लॉस वर्कआउटची अशात सतत चर्चा सुरू असते. मात्र जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता. जिममध्ये तासंतास वर्कआउटचा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज योग्यप्रकारे करतो. तुम्ही घरीच वजन कमी करण्यासाठीची एक्सरसाइज करू शकता. अशात काही डाएट टिप्सही फॉलो कराल तर फायदा लवकर बघायला मिळेल.

जेव्हा तुम्ही कधी एखाद्या डाएट एक्सपर्टसोबत बोलता तेव्हा ते तुम्हाला हेच सांगतात की, केवळ डाएट बदलून फायदा होणार नाही. डाएटसोबतच तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्येही बदल करावा लागेल. जर तुम्ही लाइफस्टाईलमध्ये काहीच बदल करणार नाही तर तुम्हाला काही फायदाही होणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

घरीच करा एक्सरसाइज

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिमला जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरीच एक्सरसाइज केली पाहिजे. घरी एक्सरसाइज करताना तुम्हाला जिममधील कोणत्या उपकरणांची देखील गरज नसते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही हलक्या आणि सोप्या एक्सरसाइज करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. तुम्हाला घरीच एक्सरसाइज करायची असेल तर HIIT एक्सरसाइजबाबत जाणून घेतलं पाहिजे. याने तुम्हाला बराच फायदा होईल.

झोपेची वेळ निश्चित करा

जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या झोपेची वेळ निश्चित करायला पाहिजे. कारण वेळेवर न झोपण्याच्या कारणामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. खराब मेटाबॉलिज्म रेटमुळे लठ्ठपणा वाढतो. जेव्हा तुम्ही वेळेवर झोपता तेव्हा तुमची पचनक्रिया चांगली होते. याने तुम्हाला लठ्ठपणा दूर करण्यास मदत मिळेल.

वजन कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे?

जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. काही लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवं? पण असं सांगणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. मात्र, सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी थोड्या थोड्या वेळाने पित रहावे. पाणी पिताना याची काळजी घ्या की, एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये.

गरम पाणी आणि लिंबू

जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाले असाल तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करावं. तसा तर हा सर्वात प्रसिद्ध घरगुती उपाय आहे. गरम पाण्यासोबत लिंबाचा रस सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. सोबतच आतड्यांची सूजही कमी होते. जर तुमच्या पोटाचा घेर अधिक वाढला असेल याने तुम्हाला कमी करण्यास फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी चॉकलेट डाएट

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खायला पाहिजे. याचा अर्थ हा नाही की, एकाच दिवशी खूपसारे चॉकलेट खावेत. रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खावा. यानेही फायदा होईल.

ग्रीन टी

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, ग्रीन टीमुळे वजन कमी करण्यास मिळते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रक्रियेत असतात. रोज कमीत कमी २ कप ग्रीन टी सेवन करावी. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा पदार्थ असतो, ज्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते.

(टिप : वरील लेखात सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील कोणत्याही उपायाचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Dr. Sunil Ugile
Dr. Sunil Ugile
BAMS, Proctologist, 18 yrs, Pune
Dr. Prakash Dhumal
Dr. Prakash Dhumal
BHMS, Family Physician Dietitian, 5 yrs, Pune
Dr. Mahendra Sahu
Dr. Mahendra Sahu
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 5 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Hellodox
x