Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सध्या फक्त पॅकेज्ड फूड आणि जंक फूडमध्येच नाही तर घरी तयार करण्यात येणाऱ्या सॅन्डविच आणि बर्गरमध्येही लोक मायोनिज (mayonnaise) वापरतात. फक्त एवढचं नाही तर, मुलांना आवडतं म्हणून काही लोक पराठ्यासोबतही मायोनिज (mayonnaise) खाण्यासाठी देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मायोनिजचा पांढऱ्या रंग संरक्षित करण्यासाठी त्यामध्ये फूड एडिटिव वापरण्यात येतं. पण हेच फूड एडिटिव कोलोरेक्टल कँसर (Colorectal Cancer) म्हणजेच मोठया आतडयाचा कर्करोग होऊ शकतो. एका रिपोर्टमधून संशोधकांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

काय म्हणतो रिपोर्ट?

फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून सांगण्यात आले आहे की, E171 फूड एडिटिवचा वापर करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच यामध्ये असलेल्या घातक तत्वांचा थेट आतड्यांवरही परिणाम होतो. परंतु याव्यतिरिक्त फूड एडिटिव्स आपल्या शरीरासाठी का घातक ठरतात? याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही.

काय आहे फूड एडिटिव्स?

दरम्यान, खाद्य पदार्थांमध्ये रूप, रंग किंवा गंध यांसारखे कोणतेही गुणधर्म संरक्षित करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी याचा वापर करण्यात येणाऱ्या घटकाला फूड एडिटिव असं म्हटलं जातं. च्युइंग गम किंवा मायोनिज यांसारख्या पदार्थांमध्ये व्हाइटनिंग एजंटच्या स्वरूपात वापरण्यात येणारे फूड एडिटिव्समुळे पोटामध्ये जळजळ, पोटाच्या इतर समस्या आणि कोलोरेक्टल कँसरचा धोका असतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला आहे.

व्हाइटनिंग एजंट म्हणून वापर

E171 ज्याला टाइटेनियम डाइऑक्साइड नॅनोपार्टिकल्स म्हणतात. हे एक फूड एडिटिव्स असून ज्याचा वापर व्हाइटनिंग एजंट म्हणून मोठ्या प्रमाणावर खाण्याच्या पदार्थामध्ये करण्यात येतो. फक्त पदार्थांमध्येच नाही तर औषधांमध्येही यांचा वापर करण्यात येतो. या फूड एडिटिव्सचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी उंदरांवर एक संशोधन करण्यात आले. E171 चा वापर 900 पेक्षा जास्त फूड प्रॉडक्ट्समध्ये होत होता आणि आपल्यापैकी प्रत्येकजण दररोज मोठ्या प्रमाणावर या फूड एडिटिव्सचं सेवन करतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

आता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. गरमीसोबतच वेगवेगळे आजारही होतात आणि त्वचेसंबंधी समस्याही होतात. पण जशी आपण त्वचेची काळजी घेतो तशी आरोग्याचीही घेतली तर तुमचाच फायदा होऊ शकतो. उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जास्त तापमान असल्याने वेगवेगळे पदार्थ लवकर खराब होतात. अशात जर तुम्ही उन्हाळ्यात शिळं अन्न खात असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

फळं कापल्यावर लगेच खा

डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सलाड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत. किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

फूड पॉयजनिंग

या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात.

डायरिया

या दिवसात लहान मुलं-मुली डायरियाचे अधिक शिकार होतात. लहान मुलांचं पचनतंत्र हे वयस्कांपेक्षा कमजोर असतं. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम बघायला मिळतो. डायरिया झाल्यावर पुन्हा पुन्हा संडास लागणे, उलटी आणि ताप येणे या समस्या होतात. तसेच या समस्येमुळे शरीरातील पाणीही कमी होतं. याने समस्या अधिक वाढू शकतं.

दुधापासून तयार पदार्थ

काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा.

कापून ठेवलेली फळं

उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जातात आणि बाहेर आधीच कित्येक तासांपूर्वी कापून ठेवलेली फळं खातात. पण ही आधीच बऱ्याच वेळापासून कापून ठेवलेली फळं खाल्ल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकते.

फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न नुकसानकारक

जर तुम्ही रात्रीचं किंवा दिवसा शिल्लक राहिलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि विचार करत असाल की, दुसऱ्या दिवशी हे खाऊ. तर तुमची ही सवय चुकीची आहे. फ्रिजमध्ये ताजी फळं आणि भाज्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही कापलेल्या नसाव्यात. पण शिल्लक राहिलेलं ठेवलं आणि ते नंतर खाल्लं तर पोटाची समस्या होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात. याव्यतिरिक्त जर उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याकडे लक्षं दिलं नाही तर टायफॉइडही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो बाहेरी पदार्थांचं सेवन करणं टाळा. आहारामध्ये पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यांचा उन्हाळ्यामध्ये आहारात समावेश करणं शक्यतो टाळावं. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत...

1. मसाले

अनेक लोकांना सर्वात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. मसालेदार अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानदायी ठरतात. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मिरची, आलं, काळी मिरी, जीरं आणि दालचिनी या पदार्थांचा मसाल्याच्या पदार्थांमध्ये समावेश होतो. हे पदार्थ उष्ण असतात. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढतं.

2. तेलकट पदार्थ आणि जंक फूड

जास्त तेलकट पदार्थ आणि जंक फूडपासून दूर रहा. ऑयली आणि जंक फूड कोलेस्ट्रॉल लेव्हल, फॅट इत्यादी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याच्या सेवनाने पौट खराब होतं आणि फूड पॉयझनिंग होण्याचीही शक्यता असते.

3. चहा किंवा कॉफी

अनेक लोक अशी असतात जी उन्हाळ्यामध्ये ऑफिसमध्ये सतत चहा किंवा कॉफीचं सेवन करत असातात. असं केल्याने शरीरातील उष्णता वाढते. यामध्ये अस्तित्वात असणारं कॅफेन आणि शुगर यांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यातही हेल्दी राहण्याची इच्छा असेल तर यांपासून दूर रहा.

4. चिकन किंवा मासे

चिकनचं अधिक सेवन करणं टाळा. तसेच फिश ग्रेवी, तंदूरी चिकन किंवा सीफूड खात असाल तर उन्हाळ्यामध्ये यापासून थोडं लांब रहा. यामुळे पचनशक्ती कमजोर होते. तसेच डायरियाही होण्याची शक्यता असते. मांसाहारी पदार्थ शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळावं.

5. ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये यांचंही सेवन कमी करावं. या पदार्थांमध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. जे शरीराची उष्णता वढविण्याचंकाम करतात.

6. सॉस कमी प्रमाणात खा

उनहाळ्यामध्ये चीज सॉसचं सेवन करणं शक्यतो टाळा. काही सॉस तयार करताना त्यामध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असतं.जे आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्याऐवजी तुम्ही घरीच तयार केलेल्या चटणीचं सेवन करा. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आवळा, हिरवी मिरची यांपासून तयार करण्यात येणारी हिरवी चटणी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

7. आइसक्रीम आणि कोल्ड ड्रिंक

खरं तर हे पदार्थ थंड असतात पण बॉडी वॉर्मिंग फूड आहेत. हे पदार्थ खाल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी बरं वाटेल परंतु तुमच्या हृदयासाठी हे नुकसानदायी असतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

गोवा सरकारने माशांच्या आयातीवर 15 दिवसांसाठी निर्बंध घातल्याने मासेप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. फार्मेलिनयुक्त मासे बाजारात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर होणारा धोका लक्षात घेता सरकारने सतर्कचा आदेश दिला आहे.

फार्मेलिन म्हणजे काय ?

फार्मेलिन हे मेथॉनल गॅसचा एक प्रकार आहे. माशांना ताजं दिसावं म्हणून त्याचा वापर केला जातो. पेशी डिकम्पोज्ड होऊ नयेत म्हणून फार्मेलिनचा वापर केला जातो. मासे जेव्हा बाहेर पाठवले जातात तेव्हा अधिक काळ ताजे दिसून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हे केमिकल वापरले जाते. मात्र आहारातून मानवी शरीरात हे केमिकल गेल्यास किडनी, श्वासनलिकेवर, मेंदूवर त्याचा परिणाम होतो.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, फार्मेलिन घटकाचा शरीरावर दूरगामी परिणाम झाल्यास त्यामधून कॅन्सरचा धोका बळावू शकतो. सोबतच त्वचा, फुफ्फुस आणि किडनीचं आरोग्यदेखील बिघडतं.

फार्मेलिनचा आरोग्यावर होणारा परिणाम
फुफ्फुसांच्या आरोग्यावर फार्मेलिनचा परिणाम दिसून येतो. यामुळे अनेक फुफ्फुसांच्या आजारांना आमंत्रण मिळू शकते.


पोटामध्ये अल्सर वाढण्याचा धोका असतो. पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.

फार्मेलिन घटकामुळे अनेक त्वचाविकारांचा धोका बळावतो.

खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी कोणते केमिकल वापरत असल्यास

त्याचा पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो.

आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, नाश्त्यापेक्षा कमी परंतू आवश्यक इतके दुपारचे जेवण आणि त्याहून कमी रात्रीचे जेवण असा आहार असावा हे डाएटचं गणित सांगितले जाते. मात्र आजकल धावपळीच्या झालेल्या आयुष्यात हे चक्र अगदी उलटं झालं आहे. अनेकांना सकाळी नाश्ता करायला वेळच नसतो, दुपारचं जेवण अत्यल्प आणि त्यानंतर रात्री आल्यानंतर पूर्ण जेवलं जातं. मात्र आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीर होतो हे आपण विसरतो.

जेवण्याच्या चूकीच्या सवयी आणि वेळा यामुळे वजन वाढतं. मग तुम्हीही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर रात्रीच्या जेवणाच्या या चूका टाळा.

रात्रीच्या जेवणात 'या' चूका नकोच !

1) रात्री झोपण्यापूर्वी भरपूर जेवणं

रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असणं आवश्यक आहे. अन्न नीट पचलेले नसले तर यामधून अपचन, पित्त, गॅस, ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री 10 वाजता झोपणार असाल तर किमान संध्याकाळी 7.30 - 8
वाजेपर्यंत जेवण आवश्यक आहे.

2) अति खाणं

रात्रीच्या जेवणात फ्राईड राईस, बिरयाणी, छोले पराठे असे पचायला जड पदार्थांवर ताव मारणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. आहरात सार्‍या पोषकघटकांचा तोल सांभाळणं गरजेचे आहे. त्यामुळे रात्री फार जड पदार्थ खाणं टाळा. रिफाईन्ड फूड्सचा पर्याय टाळा.

3) वेळेत रात्रीचं जेवण तयार न होणं

तुमचा रात्रीचा मेन्यू आधीच प्लॅन करणं आवश्यक आहे. अनेकजण रात्री जेवन बनवण्याचा कंटाळा करतात मग हॉटेलमधून ऑर्डर केलेले पदार्थ खाल्ल्यने वजन वाढते. आठवडाभर पुरेल इतक्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आठवडाभर काय काय बनवू शकता ? याचं प्लॅनिंग करू शकता.

4) अल्कोहल आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळा

अल्कोहल, कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोपेचं चक्र बिघडू शकते. साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोप कमी होते. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा वाढतो.

Dr. Amol Sonawane
Dr. Amol Sonawane
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 21 yrs, Nashik
Dr. Nitin Dongre
Dr. Nitin Dongre
MBBS, General Physician, 37 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Hellodox
x