Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.गिळण्याच्या क्रियेत सुरुवातीचा भाग संवेदनशील असतो. एकदा अन्न किंवा पाणी गिळल्यानंतर अन्ननलिकेत खाली सरकले तर त्याची आपणाला जाणीव होत नाही. परंतु जेव्हा काही कारणाने अन्न पुढे सरकले नाही तर घशात अडकल्याची जाणीव होते.घसा व अन्ननलिकेच्या सुरुवातीचे स्नायू यांचे योगदान गिळण्यामध्ये खूप महतत्त्वाचे असते. परंतु हे स्नायू जर कमजोर झाले तर गिळताना त्रास होतो. त्यास मोटेलिटी डिसआर्डर म्हणतात. तसेच पातळ पदार्थ गिळताना ठसका लागतो. मेंदूचा काही आजार असेल तरीसुद्धा गिळताना त्रास होतो व ठसका लागू शकतो. कधी-कधी पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणाºया रेबीज या आजाराचे सुद्धा हे एक प्रमुख लक्षण मानले जाते.

घशातील आजारामुळे गिळणे खूपच कठीण असते. आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण करणाऱ्या काही ग्रंथी असतात; परंतु काही कारणाने जर पुरेशी लाळ तयार झाली नाही तर जीभ कोरडी पडून अन्न गिळण्यास अडचण निर्माण होते. मानेतील विकाराकरिता करण्यात येणाऱ्या एक्स-रे मुळे सुद्धा लाळ तयार करणाºयाऱ्या ग्रंथीवर दुष्परिणाम होऊ शकतो.

थायराइड ग्रंथीत गाठी निर्माण झाल्यास गिळताना त्रास होतो. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास घशातून अन्ननलिकेत अन्न जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. गिळण्यास त्रास होतो. लोहाची कमतरता स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. अशा लोहाच्या अभावामुळे घशातून अन्ननलिकेत अन्न जाण्याच्या मार्गात एक पडदा तयार होतो. आहारामध्ये लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्याकरिता पालेभाज्या, मूग, रंगीत गर असणारी फळे (चिकू, कलिंगड, आंबा, जरदाळू) यांचा समावेश असावा.

अन्ननलिकेच्या आजारात, अन्ननलिकेत सूज किंवा जखमा झाल्यास गिळण्याचा त्रास होतो. पातळ पदार्थ जरी सहज गिळता येत असतील परंतु घट्ट अन्न गिळण्यास त्रास होत असेल, छातीत अडकल्यासारखे वाटणे, अन्ननलिका अरुंद होणे हे यामागचे मुख्य कारण असू शकते. प्रौढ वयात अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. काही दिवसातच रुग्णाला गिळता येत नाही.

आजाराचे निदान लवकर होणे व शस्त्रक्रिया होणे आवश्यक असते. त्यासाठी अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे तपासणी होणे आवश्यक आहे. याला एंडोस्कोपी म्हणतात.

बायोप्सी, एंडोस्कोपीचा उपचार
एंडोस्कोपीमध्ये एक छोटीशी दुर्बिण तोंडातून पोटात टाकल्या जाते. ते सर्व टी. व्ही. च्या मोठ्या स्क्रीनवर स्पष्टपणे बघू शकतो. त्यामध्ये घसा, अन्ननलिका, जठर व खालच्या आतडीचा सुरुवातीचा भाग दिसतो. अन्ननलिका व घशामध्ये काही गाठ व कॅन्सरसारखे काही दिसल्यास डॉक्टर एंडोस्कोपीद्वारे त्याचा छोटा तुकडा तपासणीसाठी घेतात. त्याला बायोप्सी म्हणतात. घेतलेला आतडीचा तुकडा पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी जातो. रुग्णांचे शंभर टक्के निदान होते. काही वेळेस रूग्णांची अन्ननलिका अरूंद झाल्याचा त्रास होत असेल तर एंडोस्कोपीद्वारे उपकरणे टाकून रुग्णांची अन्ननलिका पूर्ववत केल्या जाऊ शकते. अन्न व काही पातळ पदार्थ गिळताना होणारा त्रास गंभीर आजारामुळे होऊ शकतो. त्यासाठी एंडोस्कोपी ही तपासणी आहे.

घसा दुखू लागला, खवखवू लागला, घास गिळण्यास त्रास होऊ लागला की, सुरू झाला टॉन्सिल्सच्या त्रास असं म्हटलं जातं. ब-याचदा टॉन्सिल्स काढून टाकले पाहिजेत, असेही सल्ले दिले जातात. प्रत्यक्षात शरीराची ‘संरक्षक भिंत’ म्हणून टॉन्सिल्स या ग्रंथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करणा-या विषाणूंना अटकाव करण्याचं काम या ग्रंथी करतात.

मानवी शरीरात श्वसनमार्ग आणि अन्नमार्गाच्या द्वारापाशीच ग्रंथी असतात. या ग्रंथी म्हणजे टॉन्सिल्स. नाकामागे, घशात आणि जिभेच्या मुळाशी या ठिकाणी अशा ग्रंथींचं जाळं पसरलेलं असतं. नाकामागे आणि घशाच्या मधे असणा-या ग्रंथींस नाकामागचे टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथींचं शास्त्रीय नाव आहे अ‍ॅडिनॉइड्स टॉन्सिल्स. घशातील ग्रंथीस म्हणजे पडजिभेच्या दोन्ही बाजूंना असणा-या ग्रंथीस पॅलाटाइन टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथी फॉसिल टॉन्सिल्स म्हणूनही ओळखल्या जातात. कान आणि नाक यांच्यामध्ये टॉन्सिल्स असतात. त्यांना क्युबल टॉन्सिल्स म्हणतात. जिभेच्या मागच्या बाजूलाही लिंग्वल टॉन्सिल्स असतात. नाकामागील आणि जिभेतील टॉन्सिल्स आपल्याला दिसत नाहीत. मात्र घशातील टॉन्सिल्स तोंड उघडताक्षणी दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे टॉन्सिल्सचा उल्लेख घशातील टॉन्सिल्स असा होतो.

या ग्रंथींची उपयुक्तता काय आहे?
नाक आणि घशामागे या ग्रंथींचं जाळं असतं. श्वसनामार्फत घेतलेली हवा आणि मिळणा-या अन्नाचा घास हे टॉन्सिल्स या ग्रंथीच्या संपर्काशिवाय शरीरात जाऊच शकत नाही. यातील रोगजंतूंवर टॉन्सिल्सकडून प्रक्रिया केली जाते. रोगजंतूंपासून शरीर संरक्षण करण्याच्या प्रक्रियेत टॉन्सिल्समधून प्रतिद्रव्यं तयार होतात. ही प्रतिद्रव्यं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. लहान मुलांमध्ये वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा वेळी टॉन्सिल्सचं कार्य महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तर डॉक्टर टॉन्सिल्सचं ऑपरेशन करत नाहीत.

टॉन्सिल्स सुजतात म्हणजे काय होतं?
नाक-तोंडावाटे शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. हे विषाणू शरीरात आले की, ते हृदय, फुप्फुसं, जठर आणि मूत्रपिंड यांवर परिणाम करतात. या परिणामांपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी प्रतिद्रव्यं, प्रतिकारशक्ती तयार करण्याचं काम टॉन्सिल्समधल्या लिम्फॉइड उतींमुळे होतं. प्रतिकारशक्ती तयार करण्याच्या नादात टॉन्सिल्सचं आकारामान वाढतं तेव्हा टॉन्सिल्सना सूज येते. टॉन्सिल सुजण्याची इतरही कारणं आहेत. ते म्हणजे अतिथंड पाणी पिणं, कोल्डड्रिंक्समध्ये वापरलेले कृत्रिम रंग. यांचा परिणाम टॉन्सिल्समधल्या उतींवर होतो. कुठल्याही खाण्याचा पदार्थ रंध्रांमध्ये अडकल्यास तिथे पू होतो. त्याला क्रिप्टायटिस म्हणतात.

टॉन्सिल्समुळे घसा दुखतो म्हणजे काय होतं?
टॉन्सिल्सवर असलेल्या फटी आणि छिद्रांमध्ये अन्नकण अडकून राहतात. अडकलेले अन्नकण सडले तर त्या भागात जंतू घर करतात. त्यामुळे घसा दुखू लागतो. तापही येतो. टॉन्सिल्सच्या गाठी लालबुंद होतात. त्यात पूसुद्धा होतो. जबडय़ाच्या मागे मानेकडील टोकाखाली गाठी येतात. त्या दुखू लागतात. त्यालाच टॉन्सिलायटीज म्हणतात. यामुळे कधी कधी कानही दुखतो. टॉन्सिल्समध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव झाला की, सांधेही दुखून येतात. अशा वेळी प्रतिजैविकं देऊन आजार बरा करावा लागतो.

या ग्रंथींचं ऑपरेशन करावं का?
वारंवार टॉन्सिल्सचा अटॅक आलं तर करावं लागतं. डॉक्टर प्रतिजैविकं देऊन आजार बरा करतात.

यावर काही घरगुती उपाय आहेत का?
रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तोंड धुवून झाल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. थंडगार पाणी पिण्यापेक्षा साधं नाहीतर माठातलं पाणी प्यावं. घसा कोरडा पडणे

काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया…

घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.

ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.

> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.

> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.

> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.

> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.

> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.

> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षणे

> सर्दी, सायनसमुळे

> तोंडाच्या कॅन्सरमुळे

> घसा कोरडा पडल्याने

> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास

> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास

> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने

> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे

काय काळजी घ्याल?

> घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर सर्वप्रथम थंडगार पदार्थ किंवा पेये घेणे पूर्णपणे थांबवा. आंबट आणि तेलकटही कमी खा.

> पालेभाज्या, भाज्यांचे सुप्स घ्या. सोयाबीन, राजमा, नाचणी वगैरेंचा समावेश आहारात ठेवाल तर उत्तम.

> इन्फेक्शन कमी करण्यासाठी मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हे जेवणाच्या आधी करा.

घशाच्या इन्फेक्शनची लक्षणे

> सर्वप्रथम लक्षण म्हणजे घसा खवखवणं.

> घशाला लालसरपणा येणं, घशाला पुरळ येणं.

> सतत कफ येणं, घसा दुखणं.

> टॉन्सिलचा आजार.

> वारंवार सर्दी होणं, दमा असणं.

> सतत ताप येत असेल तर…

> काही वेळा अचानक उलटय़ा व जुलाब होतात.

घसा दुखत असल्यास…

> सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात थोडे मीठ घालून दिवसातून तीनवेळा गुळण्या करा.

> घसा कोरडा पडल्यामुळे तो खवखवतो. त्यासाठी मोठय़ा भांडय़ात गरम पाणी घेऊन त्याची वाफ घ्यावी लागेल.

> आले आणि लवंगांमुळे घशाचा संसर्ग दूर होऊ शकतो. एक कप पाण्यात आल्याचा रस घालून उकळा. ते पाणी कोमट झाले की त्यात थोडे मध मिसळून ते दिवसातून तीनवेळा प्या.

> काळीमिरी आणि बत्ताशे एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी हळूहळू चावणे. त्याशिवाय एक कप पाण्यात ४ ते ५ काळीमिऱ्या आणि तुळशीची पाने घालून त्याचा काढा बनवून प्या.

> थोडय़ा पाण्यात ५ अंजीर घालून ते उकळवून घ्या. मग ते गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ गरमागरम प्या.

> गळ्याचा संसर्ग दूर करायचा तर सकाळ-संध्याकाळ थोडय़ा मनुका खायच्या. असे १० दिवस केल्याने घशाची खवखव दूर होते.

> रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते प्या. गळा ओलसर राहील.

रोगनिदान

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.

> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.

> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.

> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.

>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.

प्राथमिक उपचार

> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.

> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.

> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.

अचलसिया कार्डिया म्हणजे काय?

अचलासिया कार्डिया अज्ञात एटिओलॉजीचा प्राथमिक एसोफेजॅल मोटर डिसऑर्डर आहे, ज्यामुळे एसोफॅगसच्या भिंतीमध्ये न्यूरॉन्सची कमतरता झाल्यामुळे, पेरिस्टॅलिसिसचा अभाव आणि कमी एसोफेजल स्पिंकिटर (एलईएस) कमी होण्याची शक्यता कमी होते. हे डिसफॅगिया, अवांछित अन्न, छातीत वेदना आणि वजन कमी होणे यांचे वर्णन आहे. रेडियोलॉजिकल पद्धतीने, एपीरिस्टॅलिसिस, एसोफेजेल डिलीशन कमीतकमी एलईएस उघडणे आणि बेरियमची खराब एसोफेजेल रिक्त असल्याचे दर्शविले जाते.

अचलासिया ही दीर्घकालीन स्थिती आहे जी एलईएसच्या दाबांना कमी करण्याचा उपचार पर्याय आहे. हे फार्माकोलॉजिकल पद्धती (नाइट्रेट्स आणि कॅल्शियम चॅनेल अवरोधक), बोट्युलिनम विषारी इंजेक्शन, न्यूमॅटिक बुलून डिलाटेशन, शल्यक्रिया हेलर मायोटॉमी आणि अलीकडे पेरेरल एंडोस्कोपिक मायोटॉमी (POEM) द्वारे प्राप्त केले जाऊ शकते. मर्यादित आणि अल्पकालीन प्रतिसाद दरांमुळे फार्माकोलॉजिकल पद्धती आणि बोट्युलिनम विषारी पदार्थांचे पालन कमी होते. न्युमेटिक बुलून डिलाटेशन आणि सर्जिकल मायोटॉमीला दीर्घकालीन उपचार प्रतिसाद म्हणून मानले जाते, पीओईएम पूर्वी अयशस्वी एन्डोस्कोपिक किंवा सर्जिकल उपचार आणि इतर स्पास्टिक एसोफॅगेल मोटालिटी डिसऑर्डरसह दीर्घकालीन अकालियास, सिग्मोइड एसोफॅगससाठी उदयास येणे उपचार पर्याय मानली जाते. तथापि, पीडीएमच्या तुलनेत उच्च खर्च, तांत्रिक कौशल्य, उपलब्धता, दीर्घकालीन डेटाचा अभाव आणि जटिलता दरांमुळे मर्यादित आहे. एका महत्त्वपूर्ण अभ्यासातून, पीडी सह उपचारात्मक यश दर 9 0% फॉलो-अप नंतर 1 9% आणि 2% नंतर 86% होता, 93% आणि 90% हेलरसह फॉलो-अपनंतर 1 आणि 2 वर्षांच्या तुलनेत मायोटॉमी जरी या उपचार पद्धतीमुळे एलईएस दाबांची ढाल कमी होते आणि यामुळे रुग्णांच्या लक्षणे कमी होते, ते रोगी नसतात आणि रोगाचा पुनरावृत्ती अपरिहार्य आहे.

बहुतेक केंद्रांमध्ये न्यूमॅटिक डिलाटेशन (पीडी) प्रथम-श्रेणी कार्यक्षम आणि सुरक्षित नॉनसर्जिकल थेरेपी मानले जाते. स्पीन्टीरच्या जवळ रेडियल फोर्स तयार करून एलईएसला कमकुवत करणे या प्रक्रियेचा सिद्धांत आहे. एलईईसला 30-40 मि.मी. व्यासाच्या व्यासपीठावर बांधायला डिझाइन केलेले उच्च व निम्न अनुपालन बालन डिलायटर्स आहेत ज्यामुळे स्पींटेरिरिक स्नायूंना व्यत्यय येतो. रेजिफ्लेक्स बुलून, ज्यामध्ये कॅथेटरच्या दूरच्या भागावर पॉलीथिलीन बुलून आहे, तो सर्वसाधारणपणे वापरलेला प्रकार आहे. बहुतेक अभ्यासांमध्ये पीडी सह 54%-9 1% स्वीकार्य क्लिनिकल रिमिशन रेट दर्शविला गेला आहे. पीडीशी संबंधित जटिलतांमध्ये इंट्रामरल हेमेटोमा, गॅस्ट्रिक कार्डिया, डायकोर्टिक्युला, गॅस्ट्रिक कार्डिया, म्यूकोसल अश्रू, दीर्घकालीन पोस्टप्रोसेसर छातीच दुखणे, रेफ्लक्सचे लक्षणे आणि क्वचितच छिद्र पडणे समाविष्ट असते, जे सर्वात 0.3% -3.3% मध्ये सर्वात गुंतागुंतीची समस्या आहे. लिंग, वय आणि पोस्टडीलायटेशन एलईएसचे दाब पीडी खालील यश दर ठरविणारे महत्वाचे ज्ञानी घटक आहेत. बर्याच अभ्यासांमध्ये सिंगल सेटिंग पीडीचा वापर केला जातो आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर रीड्यूल्युएशन केले जाते आणि एकार्ड्सच्या लक्षणांचे स्कोरिंग होते. तथापि, पीडी नंतर दीर्घकालीन उपचारात्मक परिणामांवर मिश्रित परिणाम आहेत. आमच्या अभ्यासासाठी 3 वर्षांच्या कालावधीत पीडीच्या तात्काळ आणि दीर्घकालीन परिणामांचे संभाव्य मूल्यमापन करण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.


साहित्य आणि पद्धतीः
जानेवारी 2013 आणि डिसेंबर 2015 दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय, कोझिकोड येथे हा अभ्यास घेण्यात आला. सर्व रुग्णांना क्लिनिकल वैशिष्ट्यांमुळे अकालियाया कार्डियाचे निदान झाले, बेरियम गळती, एंडोस्कोपिक, आणि / किंवा मोनोमेट्रिक वैशिष्ट्यांसह अचलियाच्या सूक्ष्मदर्शीचे लक्षण जे रेजिफ्लेक्स बुलून डिलायटर्ससह होते संभाव्यपणे अभ्यास केले होते. स्ट्रक्चरल एसोफेजियल घाव असलेल्या रुग्णांमधे सिक्योर, मालिगेंन्सी (प्सूडोआलालियासिया), सर्जरीचा मागील इतिहास, पीडी किंवा पीओईएम या अभ्यासातून वगळण्यात आले.


आरंभिक मूल्यांकन आणि फॉलो-अप
रुग्णाच्या प्री-ट्रीटमेंट मूल्यांकनात लक्षणे मूल्यांकनाची तपासणी, स्यूडोआलालिया आणि इतर स्ट्रक्चरल कारणे, बेरियम गळती, आणि मनोमिती उपलब्ध असल्याबद्दल एंडोस्कोपिक मूल्यांकन. एकार्डर्ड स्कोअरचा वापर करून लक्षणे काढली गेली आहेत, ज्यामध्ये 0 ते 3 (0 = अनुपस्थित, 1 = अधूनमधून, 2 = दररोज आणि 3 = प्रत्येक जेवण) च्या प्रमाणात स्किअर्स, डिसफॅगिया, रीगर्जिटेशन आणि छातीत वेदना होतात. वजन कमी (0 = वजन कमी, 1 ≤ 5 किलो, 2 = 5-10 किलो, आणि 3 ≥10 किलो). सुरुवातीच्या उपचारानंतर 1 महिन्यांनी, त्यानंतर 6 महिन्यांत आणि लक्षणांच्या पुनरावृत्तीच्या वेळी 1 9. फॉलो-अप दरम्यान नियमित अंतरांवर एकार्डट स्कोअरसह लक्षणेंचे मूल्यांकन केले गेले. लक्षणे पूर्णपणे गायब झाल्यास किंवा कमीतकमी दोन गुणांनी सुधारणा झाल्यास आणि एकॉर्डर्ड स्कोअरवर 3 गुण मिळविल्यास रुग्णांना चांगला नैदानिक ​​प्रतिसाद मानला जात असे. ज्या रुग्णांना लक्षणे पुन्हा आवृत्त होते त्यांना उपचार अपयश मानले गेले.


एसोफेजेयल मॅनेमेट्री
हाय-रिझोल्यूशन मॅनेमेट्री (एचआरएम) 16 चॅनेल वॉटर परफ्युज्ड कॅथीटरसह करण्यात आदेगलुटीशन ले. या प्रक्रियेमध्ये 3 मिनिटांसाठी बेसल एलईएस दाबण्याची रेकॉर्डिंग, त्यानंतर 10 5 एमएल ओले गिले. निदान वेळी एचआरएम केले होते.अचलसिया डीगलुटीशन(Achalasia deglutition) (अर्थ एकत्रीकरण विश्रांती दाब ≥15 मिमीएचजी) आणि एसोफेजल शरीराच्या एपिरिस्टॅलिसिस वर एक अशक्त LES विश्रांती म्हणून निदान झाले.

ऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अ‍ॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.

सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. मीठाच्या पाण्यामुळे नाक, घसा मोकळा होण्यास मदत होते.

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. यामुळे तोंडातील इंफेक्शानचा धोकादेखील कमी होतो.


मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अ‍ॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

घशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीदेखील मीठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरू शकतात. मीठाच्या पाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन कमी होण्यास सहज मदत होते.

Dr. Vishnu Nandedkar
Dr. Vishnu Nandedkar
MBBS, Joint Replacement Surgeon Orthopaedics, 9 yrs, Pune
Dr. Dr Amrut Oswal
Dr. Dr Amrut Oswal
Specialist, Orthopaedics Joint Replacement Surgeon, 29 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Sandeep Patil
Dr. Sandeep Patil
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Hellodox
x