Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

Swine Influenza

What is Swine Influenza?

Swine influenza (swine flu) is a respiratory disease of pigs caused by type A influenza viruses that regularly cause outbreaks of influenza in pigs. Swine flu viruses can cause high levels of illness in swine herds, but usually, cause few deaths. Common signs in sick pigs include fever, depression, coughing (barking), discharge from the nose or eyes, sneezing, breathing difficulties, eye redness or inflammation, and going off feed. However, influenza-infected pigs also may not appear ill or be only mildly ill. Swine influenza viruses may circulate among swine throughout the year, but most outbreaks occur during the late fall and winter months similar to outbreaks of seasonal influenza in humans.

What is a variant influenza virus?

When an influenza virus that normally circulates in swine (but not people) is detected in a person, it is called a “variant influenza virus.” For example, if a swine influenza A H3N2 virus is detected in a person, that virus will be called an “H3N2 variant” virus or “H3N2v” virus.

Can humans be infected with swine influenza viruses?

Yes. Swine flu viruses do not normally infect humans, however, sporadic human infections with influenza viruses that normally infect swine have occurred. When this happens, these viruses are called “variant viruses.” Most commonly, human infections with variant viruses have occurred in people exposed to infected pigs. In addition, there have been documented cases of multiple persons becoming sick after exposure to one or more sick pigs. Also, cases of limited person-to-person spread of variant viruses have occurred.

Why are human infections with variant viruses of concern?

Influenza viruses that infect pigs may be different from human influenza viruses. Thus, influenza vaccines made against human influenza viruses are generally not expected to protect people from influenza viruses that normally circulate in pigs. In addition, because pigs are susceptible to avian, human and swine influenza viruses, they potentially may be infected with influenza viruses from different species at the same time. If this happens, it is possible for the genes of these viruses to mix and create a new virus. This type of major change in the influenza A viruses is known as antigenic shift. If this new virus causes illness in people and can be transmitted easily from person-to-person, an influenza pandemic can occur.

What symptoms do people have when they are infected with variant viruses?

People who have been infected with variant viruses have had symptoms similar to the symptoms of regular human seasonal influenza. These include fever, lethargy, lack of appetite and coughing. Some people also have reported runny nose, sore throat, eye irritation, nausea, vomiting and diarrhea.

How are variant influenza viruses spread?

Influenza viruses can be directly transmitted from pigs to people and from people to pigs. These infections have most commonly been reported after close proximity to infected pigs, such as in pig barns and livestock exhibits housing pigs at fairs. Infected pig cough or sneeze and droplets with influenza virus in them can spread through the air. If these droplets land in your nose or mouth, or are inhaled, you can be infected. There also is some evidence that you might get infected by touching a surface with the virus on it and then touching your mouth or nose. A third way to possibly get infected is to inhale droplets or dust containing influenza virus. Scientists aren’t really sure which of these ways of spread is the most common. Human-to-human transmission of variant flu viruses also has occurred, though this method of spread has been limited. This kind of transmission is thought to occur in the same way that seasonal flu transmits in people, which is mainly through coughing or sneezing by people who are infected. People also may become infected by touching something with flu viruses on it and then touching their mouth or nose. It’s important to note that in most cases, variant flu viruses have not shown the ability to spread easily and sustainably from person to person

How can human infections with variant influenza viruses be diagnosed?

To diagnose variant influenza A virus infection, a respiratory specimen would generally need to be collected within the first 4 to 5 days of illness (when an infected person is most likely to be shedding virus). However, some people, especially children, may shed virus longer. H1N1 pandemic, state health departments have the ability to test for novel (non-human) influenza viruses. However, if a variant influenza virus is suspected, it is sent for further testing.

What medications are available to treat variant flu infections in humans?

There are three different antiviral drugs that are recommended for the treatment of influenza: oseltamivir, peramivir and zanamivir.









स्वाइन इन्फ्लुएन्झा :
स्वाइन इन्फ्लुएन्झा यास स्वाईन फ्लू असेही म्हटले जाते.

आजाराची कारणे
स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झाली होती.

संसर्ग
स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

आजाराची लक्षणे
ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.

टॅमी फ्ल्यू याा गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?
१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.

उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान, विषाणू तपासणी
स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार
कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरु केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस
या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे.

पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. खरं तर पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे अनेक घातक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका आणखी वाढतो. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया या आजारांसोबत स्वाइन फ्लू देखील वेगाने पसरतो. H1N1 व्हायरसमुळे पसरणारा हा आजार सध्या हळूहळू आपलं डोकं वर काढताना दिसत आहे. देशभरामध्ये काही ठिकाणी स्वाइन फ्लूने पीडित रूग्ण आढळून आले असून काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. वेळेनुसार, या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. जाणून घेऊया या आजाराचची लक्षणं, उपाय आणि कारणांबाबत...

काय आहे स्वाइन फ्लू (Swine Flu)?

स्वाइन इन्फ्लूएंजा हा एक संसर्गजन्य श्वसनाचा विकार आहे. जो साधारणतः डुकरांमध्ये आढळून येतो. हा आजार स्वाइन इन्फ्लूएंजा ए हा व्हायरस H1N1 स्ट्रेंसमुळे होतो. दरम्यान H1N2, H3N1 आणि H3N2च्या रूपामध्ये इतर डुकरांमध्ये हा व्हायरस अस्तित्वात असतो. खरं तर लोकांना स्वाइन फ्लूची लागण होणं हे सामान्य नाही. डुकरांच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.

स्वाइन फ्लूची लक्षणं (Symptoms of Swine Flu)

ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. यांपैकी कोणतंही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

असा पसरतो स्वाइन फ्लू :

- स्वाइन फ्लूच्या व्हायरसचा हवेमध्ये संसर्ग होतो.

- खोकला, शिंका येणं, थुंकणं यांमुळे हा व्हायरस हवेमार्फत इतर लोकांमध्ये पोहोचतो.

आराम करणं ठरतं फायदेशीर :

स्वाइन फ्लू पासून बचाव करणं हे रोखण्याचा उत्तम उपाय आहे. तसेच स्वाइन फ्लूवर योग्य ती औषधंही अस्तित्वात आहेत. आराम करणं, खूप पाणी पिणं, शरीरामध्ये पाणी कमी होऊ न देणं हा स्वाइन फ्लूवरील सर्वात उत्तम उपाय आहे.

सुरूवातीला पॅरासीटामॉलसारखी औषधं ताप कमी करण्यासाठी देण्यात येतात. जर समस्या आणखी वाढल्या तर टॅमी फ्लू आणि रेलंजा यांसारखी औषधं देण्यात येतात. परंतु ही औषधं डॉक्टरांच्या सल्लाने घेणं फायदेशीर ठरतं. स्वतःहून कोणतंच औषध घेऊ नये.
स्वाइन फ्लूमध्ये होणारे सर्दी-खोकला यांसारख्या लक्षणांवर उपाय म्हणून तुम्ही काही घरगुती उपायही ट्राय करू शकता. तुळस, कापूर, लसूण, कोरफड, आवळा यांसारखे आयुर्वेदिक उपायही स्वाइन फ्लूवर परिणाकारक ठरतात.

स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा :

- सतत साबण आणि पाण्यावे आपले हात स्वच्छ करा.

- जेव्हा खोकला किंवा शिंका येतील त्यावेळी तोंड आणि नाक टिश्यूच्या मदतीने झाकूण घ्या.

- वापरलेले टिश्यू लगेच टाकून त्या. पुन्हा वापरू नका. एका बॅगमध्ये व्यवस्थित टाकून त्याची विल्हेवाट लावा.

- ज्या वस्तूंना तुम्ही दररोज स्पर्श करता, त्या व्यवस्थित स्वच्छ ठेवा.

स्वाइन फ्लूपासून बचावासाठी काही घरगुती उपाय :

1. तुळस

तुळशीमध्ये अ‍ॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅन्टी-व्हायरस गुणधर्म आढळून येतात. यांमध्ये इम्युनिटी सिस्टम मजबुत करण्यासाठी मदत करते. याचा अर्थ असा नाही की, स्वाइन फ्लू एकदम बरा करण्यासाठी तुळस मदत करते. परंतु, 'एच1एन1' व्हायरसशी लढण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला दररोज तुळशीची पानं चावून खाणं फायदेशीर ठरतं. तसेच तुळशीचा काढा किंवा चहा पिणंही फायदेशीर ठरतं.

2. गुळवेल

आयुर्वेदामध्ये गुळवेलीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. याचा काढा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. याची एक फांदी तुळशीच्या काढ्यासोबत 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यावी. थंड झाल्यानंतर यामध्ये थोडी काळी मिरी, खडी साखर, सैंधव मीठ किंवा काळं मीठ एकत्र करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

3. लसूण

लसणामध्ये अ‍ॅन्टी-व्हायरल गुणधर्म असतात. जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या दररोज सकाळी अनोशापोटी कोमट पाण्यासोबत घेणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

हा उपाय करा

कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.

दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.

या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.

दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.

Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Vijay Jagdale
Dr. Vijay Jagdale
BHMS, Homeopath, 10 yrs, Mumbai
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Hellodox
x