Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

जाणून घ्या: तेल लावताना केस का गळतात?

केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी होतात. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण यापासून केसांचे संरक्षण होते, असे आपण आई-आजीकडून ऐकत आलो आहोत. परंतु, जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा प्रत्येक वेळी केस गळतात. असे का होते? हे जाणून घेण्यासाठी आम्ही Marvie Ann Beck Academy च्या हेयर आणि ब्युटी एक्स्पर्ट नंदिनी अग्रवाल यांच्याशी संवाद साधला.

तेलामुळे केस मजबूत होतात. त्यांचा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस तुटण्याला आळा बसतो. पण यामुळे केस गळू देखील लागतात. एका हेयर फॉलिकलमधून १-६ वर्ष केस वाढू शकतात. म्हणून जुने केस गाळून नवीन येणे ही सातत्याने होणारी प्रक्रीया आहे.

म्हणून जेव्हा तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा काही वेळ केसांना मसाज करा. अशावेळी केस गळले काहीसे स्वाभाविक असते. परंतु, केस गळण्याचे प्रमाण अधिक असल्यास हे काळजीचे कारण ठरेल. केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कारण केसात तेल राहिल्याने धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे स्काल्फजवळील पोर्स बुजतात आणि हेयर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात.

तेलकट स्काल्फमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. तसंच खूप तेल लावल्याने स्काल्फमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ लागतात.

टीप: केसांना मसाज करताना स्काल्फला हळुवार मसाज करा. कारण खूप जोरजोरात मसाज केल्याने केस गळू लागतील. त्याचबरोबर अधिक प्रमाणात तेल लावू नका आणि केसातील तेल निघून जाईल अशापद्धतीने स्वच्छ केस धुवा.

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्‍या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. आहारात नारळ असावा का? याबाबत अनेक समज -गैरसमज आहेत. नारळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नारळाचा अधिक फायदा होतो. टाळूचं आरोग्य जपण्यासाठी, केसांना नैसर्गिकरित्या चमक आणि मजबुती देण्यासाठी तसेच केसगळतीची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी नारळ फायदेशीर आहे हे तुम्हांला ठाऊक आहे.

केसगळतीचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये हमखास आढळतो. मग यावर मात करायची असेल तर नारळाचं दूध तुम्हांला फायदेशीर ठरू शकतं. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत

कसं ठरते फायदेशीर ?
नारळाची मलई आणि दूध केसांसाठी फायदेशीर आहे. टाळूचं पोषण करण्यासोबत नारळाच्या दूधातील प्रोटीन्स घटक, फॅट्स, मिनरल्स केसांना अधिक मजबूत करतात. नारळाच्या दूधामुळे केस मूळासकट मजबूत होण्यास मदत होते. परिणामी केसगळतीवर त्याचा गुणकारी उपाय म्हणून समावेश करणं उपयोगी ठरते.

कसा कराल वापर?

नारळाच्या मलईसह थोडं दूध घ्या. या मिश्रणाचा टाळूवर मसाज करा. तासभर हे मिश्रण टाळूवर तसेच ठेवा. त्यानंतर मिल्क शाम्पूचा किंवा सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवावेत. दर पंधरा दिवसांनी हा उपाय करणं केसगळती रोखण्यासाठी तसेच टाळूचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मुंबई : केसगळतीची अनेक कारणं आहेत. काही जणांना केसगळतीचा त्रास पोषक आहाराच या अभावामुळे होतो तर काही जणांमध्ये हा त्रास अनुवंशिक किंवा लाईफस्टाईलमधील काही चुकांमुळे बळावतो. केसगळतीबाबत अनेक समज - गैरसमज आहेत. अशापैकी एक म्हणजे हेल्मेटचा वापर केल्याने केसगळतीचा त्रास वाढतो. तुमच्या मनातील या प्रश्नाला एक्स्पर्टनी दिलेला खास सल्ला नक्की जाणून घ्या.

खरंच हेल्मेटच्या वापरामुळे केस गळतात का?
अनेकांना असे वाटते की, हेल्मेटच्या वापरामुळे केसांची मूळं श्वास घेऊ शकत नाहीत. ऑक्सिजनच्या अभावामुळे केस मूळांपासून कमजोर होतात परिणामी केसगळतीचा त्रास वाढतो. हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्टच्या मते, केसांच्या मूळांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी बाहेरील हवेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. रक्तातूनच केसांच्या मूळांना आवश्यक ऑक्सिजन मिळतो.

हेल्मेटचा अतिवापर त्रासदायक
हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, हेल्मेट अति घट्ट असल्यास त्याचा डोक्यातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यामुळे केसगळतीचा त्रास वाढू शकतो. सोबतच हेल्मेट नीट स्वच्छ केलेले नसल्यास त्यामधून टाळूवर इंफेक्शन पसरू शकते. केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्ट्सचा खास सल्ला
हेल्मेट किंवा टोपी वापरताना त्याची स्वच्छता तपासून पाहणं आवश्यक आहे. त्यामधील अस्वच्छता केसांमध्ये अस्वच्छता पसरण्याचे कारण ठरू शकते.

हेल्मेट घाई-घाईत घालू किंवा काढू नका. असे केल्यास तुमचे केस तुटण्याची दाट शक्यता असते.

लंडन : संशोधकांनी केस गळतीवर संभाव्य उपचार पद्धत शोधली आहे. हे औषध प्रामुख्याने ऑस्टियोपोरोसिस या रोगावर उपचार करण्यासाठी विकसित केले होते. या रोगामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात.

हा अभ्यास पीएलओएस बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या केसांच्या ग्रंथीवर या औषधामुळे वाढीस चालना मिळत असल्याचे आढळून आले. सद्य:स्थितीत पुरुषांमध्ये होणाऱ्या केस गळतीवर केवळ मिनोक्सिडील आणि फिनास्टेराइड ही दोन औषधे उपलब्ध आहेत, परंतु या दोन्ही औषधांमुळे काही प्रमाणात दुष्परिणाम होत असून केसांची वाढ अपेक्षितरित्या होत नसल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना केस प्रत्यारोपण हा एकच उपाय राहतो.

त्यामुळे संशोधकांनी केस गळतीवर नव्या प्रकारचे उपाय शोधण्याची सुरुवात केली. यासाठी प्रथम इम्युनोसप्रेसिव औषध (सायक्लोस्पोरिन) आण्विक कार्यप्रणाली शोधण्यापासून केली.

सायक्लोस्पोरिन हे १९८०पासून प्रत्यारोपण अस्वीकार दडपणे आणि स्वयंप्रतिकारक रोगावर वापरले जात आहे. परंतु यामुळे गंभीर दुष्परिणाम होत असून अवांच्छित ठिकाणी केसांची वाढ होते. संशोधकांनी सायक्लोस्पोरिनने उपचार केलेल्या डोक्यावरील केसांच्या ग्रंथींचे विश्लेषण केले. येथील ठरावीक जीवनसत्त्व अनेक ऊती त्याचप्रमाणे केसांच्या ग्रंथींच्या वाढीत अडथळा निर्माण करतात.

यामुळे हे औषध वापरल्यामुळे अवांच्छित केसांची वाढ का होते हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ऑस्टियोपोरोसिस रोगाच्या उपचारासाठी तयार केलेले औषध याच कार्यप्रणालीला लक्ष्य करते. यामुळे केसांच्या ग्रंथींची वाढ होत असल्याचे आढळून आले.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. अशातच चटणीपासून भाजीची चव वाढवायला मदत करणार्‍या पुदीन्याचाही आहारात, पेयांमध्ये समावेश केला जातो. चवीला पुदीना जितका स्वादिष्ट असतो तेवढेच त्याचे तेल अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. पुदीन्यामध्ये 'व्हिटॅमिन ए' घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पोटाचे आजार आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही पुदीना फायदेशीर ठरतो.

केसगळतीवर पुदीना फायदेशीर
केसगळतीची कारणं ही प्रत्येक मनुष्यागणिक वेगवेगळी असतात. काही वेळेस पोषक आहाराच्या अभावामुळे केसगळती होते. केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पुदीन्याचे तेल फायदेशीर ठरते.

कसा कराल वापर
केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी टाळूवर पुदीन्याच्या तेलाने मसाज करा. या तेलाच्या मसाजाने टाळूवरील रोमछिद्र खुली होतात. त्याजागी नवे केस उगवण्याची प्रक्रिया सुरू होते.
पुदीन्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सुल उघडून मिसळा.हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी टाळूला लावल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. सोबतच केसांची वाढ सुधारण्यास मदत होते. नवे येणारे केसदेखील मजबूत होतात.

Dr. Himanshu Verma
Dr. Himanshu Verma
Medical Student, General Physician, 3 yrs, Bhopal
Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 24 yrs, Nashik
Dr. Nitin Dongre
Dr. Nitin Dongre
MBBS, General Physician, 37 yrs, Pune
Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Vivek Patil
Dr. Vivek Patil
MDS, Dentist Pediatric Dentist, 13 yrs, Pune
Hellodox
x