Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आपण जे खातो त्यात जर मीठ नसेल तर त्या पदार्थांना काहीच चव लागत नाही. तसेच जर काही पदार्थांमध्ये जास्त मीठ झालं तर ते खाताही येत नाहीत. बरं जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याचही मोठं नुकसान होऊ शकतं. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते. अशात मिठाचं कमीत कमी सेवन केल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते, असं अमेरिकेतील अभ्यासकांनी साधारण २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका क्लिनिकल ट्रायल डेटाचं विश्लेषण करताना सांगितलं. रिसर्चमध्ये सोडियमचं अधिक सेवन केल्याने आतड्यांवर सूज आढळली. त्यासोबतच जास्त फायबर असलेला आहार घेणाऱ्या लोकांमध्ये कमी फायबर असलेला आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत आतड्यांवर अधिक सूज आढळली.

आतड्यांमध्ये सूज येण्याचं कारण

रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अमेरिकेतील साधारण एक तृतियांश लोकसंख्या आतड्यांवर सूज येण्याच्या समस्येचा सामना करत आहे. पोटात तयार होणारा गॅस हे याचं कारण सांगण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की, गॅस फायबरला पचवणाऱ्या बॅक्टेरियामुळे तयार होतो. अभ्यासकांनी सांगितले की, फायबर असलेल्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण वाढल्याने गॅसची समस्या वाढते. त्यामुळे अधिक फायबर असलेल्या आहारात मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे.

अल्सरची सुद्धा होते समस्या

या रिसर्चनुसार, जास्त मीठ खाल्ल्याने अल्सरची समस्या सुद्धा होऊ शकते. कारण शरीरात मिठाच्या अधिक प्रमाणामुळे हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणजेच एच पायलोरी बॅक्टेरिया सक्रिय होतात. याने पोटात अल्सरची समस्या होऊ शकते. रिसर्चमधून समोर आलं आहे की, जास्त मिठामुळे शरीरातील एच पायरोली बॅक्टेरिया घातक रूप घेतात आणि पचनक्रिया कमजोर करतात. यानेच अल्सरची समस्या होऊ शकते.

त्यासोबतच वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर, किडनीसंबंधी समस्या, शरीरात सूज आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका अनेक पटीने असतो.

पाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही जाणताच. पण पाण्यात मीठ घालून प्यायल्यास खूप फायदा होतो. पण रिफाईंड मीठ न वापरता नैसर्गिक मीठ वापरणे अधिक फायद्याचे ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. तर जाणून घेऊया मीठाचे पाणी पिण्याचे फायदे...

पचनशक्ती सुधारते

पोटासाठी मीठाचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. रोज सकाळी मीठाचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. पोटांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हाडे बळकट होतील

मीठाचे पाणी प्यायल्याने हाडे बळकट होतात. कारण मीठामुळे शरीराला कॅल्शियम मिळते.


बॅक्टेरिया होतील नष्ट

बॅक्टेरिया शरीरात आजार पसरवतात. मीठात अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम मीठाच्या पाण्यामुळे साध्य होईल.

त्वचा उजळेल

मीठाचे पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स दूर होतात. त्याचबरोबर त्वचा उजळ होण्यास मदत होते.

लिव्हर स्वस्थ राहण्यासाठी

लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करतं. आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मीठाचे पाणी उपुयक्त ठरतं.

नोट- गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मीठाचे पाणी पिणे नुकसानकारक ठरेल.

मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही. मात्र मीठ आहरात चव वाढवण्याचं काम करत नाही तर त्याचा आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापर करता येऊ शकतो. सौंदर्य खुलवण्यासाठीही मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

चेहर्‍यासाठी फायदेशीर मीठ
मीठामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. यामुळे चेहरा तजेलदार होतो. उन्हाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या हटवण्यासाठी मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

घरगुती स्क्रब -
मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑईल, बदामाचं तेल मिसळा. या स्क्रबरने चेहरा स्वच्छ केल्यास मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.


व्हिटॅमिन्सच्या कमीमुळे अनेकदा नखं कमजोर होतात. अशावेळेस चमचाभर मीठामध्ये, चमचाभर लिंबाचा रस, चमचाभर बेकिंग सोडा आणि कपभर कोमट पाणी मिसळा. ही पेस्ट नखांवर लावल्यास ते मजबूत आणि चमकदार होतात.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा मीठ, दोन चमचा बेकिंग पावडर मिसळा. ही पेस्ट टुथब्रशवर घेऊन लावा. यामुळे दात स्वच्छ होतात.

पदार्थात मीठ नसेल तर तो अगदी बेचव लागतो. त्यामुळे अन्नाचे मीठाचे आवश्यक ते प्रमाण असणे गरचेजे आहे. पण गरजेपेक्षा अधिक मीठ खाणे आरोग्यास हानीकारक ठरेल. काही लोकांना भाजी, सलाड, रायता यात वरुन मीठ घालून खाण्याची सवय असते. इतकंच नाही तर काही लोक फळांना देखील मीठ लावून खातात. त्यामुळे चव तर वाढते पण मीठातील सोडिअमच्या अधिक प्रमाणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अधिक मीठ खाल्याने शरीरावर ही लक्षणे दिसू लागतात. पाहुया काय आहेत ती लक्षणे...

शरीराच्या वेगवेगळ्या भागांना सूज
रात्रीच्या वेळी गरजेपेक्षा अधिक मीठ खाल्यास शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात. शरीरातील वेगवेगळ्या भागात विनाकारक सुज जडू लागते. यास इडिमा असे म्हणतात.

अधिक तहान लागते
मीठाच्या अधिक सेवनामुळे तहान अधिक लागते. शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढल्याने पाण्याची अधिक आवश्यकता भासू लागते. कारण सोडिअमचे वाढलेले प्रमाण शरीरातून बाहेर पडण्यासाठी शरीरात हे बदल होतात.


सुजलेले डोळे
सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले दिसत असतील तर हा तुम्ही अधिक मीठ घेत असल्याचा इशारा आहे. पण पफी आईजची समस्या विविध कारणांमुळेही उद्भवू शकते.

ब्रिघम आणि महिला अस्पताल द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या शोधात असा खुलासा झाला आहे की आहारात जास्त मीठ (सोडियम)चे सेवन केल्याने मृत्यूचा धोका वाढून जातो. शोधकर्ता नैंसी कुक यांनी म्हटले आहे की शरीरात सोडियमची मात्रा मापने फारच अवघड असते. कारण हे लपलेले असते आणि तुम्हाला माहीत पडत नाही की तुम्ही याचे किती सेवन करत आहे. ज्यामुळे याच्या अत्यधिक सेवनाची शक्यता वाढून जाते.

डायबिटीज पीडित गर्भवती महिलांच्या मुलांमध्ये आटिज्मचा धोका

शोधकर्तांचे म्हणणे आहे की, शरीरात सोडियम मापण्याचे बरीच पद्धत आहे, पण युरीन (मूत्र)च्या नमूचेचा अध्ययन करणे सर्वात योग्य पद्धत आहे. शरीरात सोडियमची मात्रेला एक स्पॉट टेस्ट करून मापली जाते, यामुळे हे निर्धारित होते की एखाद्या व्यक्तीच्या युरीनच्या नमुन्यात किती मीठ उपस्थित आहे. पण दिवसात युरीनमध्ये सोडियमच्या स्तरात चढ उतर होऊ शकत. म्हणून सटीक निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या 24 तासाच्या युरीनचे नमुने घ्यायला पाहिजे.

शोधकर्तांनी सांगितले की प्रत्येक दिवशी सोडियमचे सेवन बदलत, म्हणून काही दिवसांची टेस्ट करणे गरजे आहे. या शोधात उच्च रक्तदाबच्या रोकथामच्या परीक्षणात भाग घेणार्‍या 3000 लोकांनी भाग घेतलेल्या लोकांच्या परिणामांचे आकलन केले. ज्यात सोडियमच्या सेवनामध्ये वाढ झाल्याने अचानक मृत्यूचा सरळ संबंध बघण्यात आला आहे. हा शोध इंटरनॅशनल जरनल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Dr. Himanshu Verma
Dr. Himanshu Verma
Medical Student, General Physician, 3 yrs, Bhopal
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune
Dr. Arati Bayas-Pawar
Dr. Arati Bayas-Pawar
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 12 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Vijay Satav
Dr. Vijay Satav
MD - Allopathy, Clinical Pathologist, 23 yrs, Pune
Hellodox
x